मिसळपावावर येत असलेल्या सूक्ष्म/दिर्घ वगैरे कथा, पीजे वाचून एक जुनी ऐकलेली गोष्ट आठवली, जरा चढवून लिहीत आहे...
विक्रमादित्याने हट्ट सोडला नाही. त्याने झाडाजवळ जाऊन वेताळास खांद्यावर घेतले आणि परत मौनव्रतात पादक्रमण करू लागला. वेताळ विक्रमादित्यास परत पाठीवर उताणा पडलेल्या अवस्थेत राहून गोष्ट सांगू लागला...
देव प्रसन्न झाल्यामुळे सुखाने राहात असलेल्या लाकूडतोड्याच्या बायकोने आपल्या नवर्यास (म्हणजे त्याच लाकूडतोड्यास) कुर्हाड पडलेली आणि देव प्रसन्न झालेली विहीर दाखवण्याचा हट्ट केला. लाकूडतोड्या पण मोठ्या गर्वाने तिला घेऊन गेला.