Skip to main content

बालकथा

कहाणी बालपण हरवलेल्यांची ...

लेखक गणेशा यांनी बुधवार, 15/12/2010 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
समाजातील काही चित्रण अशीही आहेत .. तेच देतो आहे, कविता विभागात देत होतो पण ह्या कविता नाहितच कदाचीत हे आहे चित्र आपल्या आजुबाजुचे .. यातुन एका जरी मुलाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन बदलला तरी छान वाटेल .. कहाणी .. १.

ती का पडली...

लेखक ५० फक्त यांनी रविवार, 12/12/2010 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
ती का पडली... आज दुपारी दुरदर्शनच्या असंख्य चॆनल पॆकी एकावर तो चित्रपट लागला होता. खरंतर त्याच वेळी दुसरी कडे हरे रामा हरे क्रुष्णा लागला होता, पण स्त्रीहट्टापुढे (स्वस्त्री, परस्त्री नव्हे) नाईलाज झाल्याने तो चित्रपट पाहात होतो. त्यातच या अतिशय महत्वाच्या सीननंतर माझ्या ४ वर्षाच्या मुलानं वरील प्रष्ण विचारला. ती का पडली ? त्या संपुर्ण चित्रपटाला कलाटणी देणारा असा प्रसंग,माझी बायको अतिशय गुंग झालेली आणि अचानक हा प्रश्ण, ती का पडली ? बायकोचाच एकदमच मुड्च गेलाच होच. या चित्रपटाविषय़ी माझे व बायकोची स्वतंत्र व टोकाची व भिन्न (नेहमीप्रमाणे) मते आहेत.

महाराष्ट्र दर्शन - भाग ३/ "वेरूळ "

लेखक स्पा यांनी सोमवार, 22/11/2010 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ - http://www.misalpav.com/node/15474 भाग २ - http://www.misalpav.com/node/15500 अर्ध्या तासात वेरूळ आले सुद्धा ...... मला नुकतीच झोप लागली होती.... परत बस मधून उतरा.... तेसुद्धा १ च्या रणरणत्या उन्हात...... जीवावर आलं होत.... "पण" वेरूळ ला जाण्याचीच एवढी ओढ होती, कि बाकीचे त्रास त्यापुढे नगण्य वाटत होते..... एका मोठ्या "उद्यानासमोर" बस थांबली .......समोरच वेरुळच्या जगप्रसिद्ध लेण्या दिसत होत्या.... बघूनच मन "प्रसन्न" झालं.... आमच्या गाईड ची पीर पीर सुरु झाली . इथे एकूण ३४ लेण्या आहेत .

चिरंजीव चिंटू-२

लेखक डावखुरा यांनी रविवार, 21/11/2010 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
दि : २१.नोव्हें.२०१०; आज आपल्या सगळ्यांचा लाडका "चिंटू" एकोणिस वर्षे पूर्ण करून विसाव्या वर्षात पदार्पण करतो आहे. प्रचंड लोकप्रियता लाभलेली ही चित्रमालिका तब्बल १९ वर्षापासुन सकाळच्या वृत्तपत्रमालिकेतुन प्रसिद्ध होउन लहानांपासुन मोठ्यांपर्यंत ईतर कोणत्याही बातमी कडे कटाक्ष टाकण्यापुर्वी चिंटू कडे जायला भाग पाडतो...ह्यातच ह्या मालिकेचे यश सामावलेय.. सतत दोन दशके वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा चिंटू २० व्यात पदार्पण करणार. चारुहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर यांचा मानसपुत्र असलेला

चिरंजीव चिंटू

लेखक डावखुरा यांनी गुरुवार, 18/11/2010 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
आजचा "चिंटू" वाचला का !? ह्या प्रश्नाने आमची सकाळ होते... chintoo अहो येत्या रविवारी म्हण्जे २१ तारखेला आपल्या सगळ्यांचा लाडका "चिंटू" एकोणिस वर्षे पूर्ण करून विसाव्या वर्षात पदार्पण करतो आहे. प्रचंड लोकप्रियता लाभलेली ही चित्रमालिका तब्बल १९ वर्षापासुन सकाळच्या वृत्तपत्रम

भाषिक संपत्ती

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 26/10/2010 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
भाषिक संपत्ती - लहानपणापासुन आवडता असलेल्या विषयावर लिहायला घ्यावे असा विचार केला त्यावेळेस याहुन जास्त समर्पक शीर्षक नाही सुचले. सध्या शिव्या (किंवा मराठीत ज्याला आपण स्लँग म्हणतो) मर्दानगीचे प्रतिक आहेत असे मौलिक ज्ञान मला नुकतेच मिळाले आहे. त्यामुळे या संपत्तीचे मोलही प्रचंड वाढले आहे. असे म्हणतात की कुठल्याही भाषेवर प्रभुत्व मिळवायचे असेल तर प्रथम त्या भाषेतल्या शिव्या शिकुन घ्याव्यात. आमच्यासाठी ही प्रक्रिया फार लवकर सुरु झाली. मायबोलीतल्या काही "मर्दानी" शब्दांवर आम्ही खुप लवकर प्रभुत्व मिळवले. कोल्हापुरात असताना (माझा लेख सुपरहिट्ट होणार.

कित्ती कित्ती छान!

लेखक लिखाळ यांनी मंगळवार, 26/10/2010 17:14 या दिवशी प्रकाशित केले.
परवाचाच अनुभव आहे. म्हणावे तर साधासाच. पण खूप काही शिकवून जाणारा. असे अनुभवच आपले जीवन खुलवत असतात, फुलवत असतात. आयुष्याचे निराळेच पैलू अवचित आपल्या समोर आणून आपले भावविश्व कुठेतरी समृद्ध करत असतात. झालं असं की मी बस मधून एके ठिकाणी निघालो होतो. आत गेल्यावर बसायला जागा मिळाल्याने स्वारी थोडी खुष होती. एक दोन स्टॉप गेल्यावर अचानक एक मध्यम वयीन काकू आल्या आणि ओरडूनच म्हणाल्या की मला बसू द्या..स्त्रीयांचा काही मान ठेवत नाहीत.. नियम पाळत नाहीत वगैरे वगैरे.. मी खरेतर स्त्रीयांसाठी राखीव जागेवर बसलो नव्हतो. माझा चेहरा एकदम गोरामोरा झाला.

शाळेतले दीवस - माझा अभिनय

लेखक शानबा५१२ यांनी शुक्रवार, 22/10/2010 01:51 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या शालेय जीवनातल्या अनुभवांवरुन एखादा (छोट्या मुलांचा) चित्रपट निघेल असे ते अनुभव!

लहान मुलांच्या जर्मन पुस्तकांतील चित्रांचे प्रदर्शन

लेखक चिंतातुर जंतू यांनी शुक्रवार, 08/10/2010 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
तोच तोच काथ्या पुन्हा पुन्हा कुटून, फुटक्या कौलांवर पुन्हा पुन्हा दगड मारून कंटाळा आला असेल आणि वीकेंडला थोडा रुचिपालट हवा असेल तर हा घ्या... Sybille Hein सध्या पुण्यात पुस्तकांशी संबंधित एक गोड प्रदर्शन सुरू आहे. त्याविषयी माहिती देण्यासाठी हा धागा. शक्य असल्यास आपापल्या (किंवा इतरांच्याही) बच्चेमंडळीसह जरूर भेट द्यावी असं हे प्रदर्शन आहे. लहान मुलांच्या पुस्तकांत चित्रं हा फार महत्त्वाचा भाग असतो.