Skip to main content

बालकथा

जात जात जात

लेखक रमताराम यांनी मंगळवार, 29/05/2012 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
जिथे तिथे चहुकडे आम्हा लिहावी लागते जात. जन्म घेतल्याक्षणीच आमच्या मागे लागते जात. जन्म नोंदणी करतेवेळी लिहावी लागते जात. शाळेत दाखल करताना लिहावी लागते जात. फी भरतानाही शाळेत पुन्हा पाहिली जाते जात नोकरीसाठी वणवणताना लिहावी लागते जात. ब्राह्मण, मराठा, महार चांभार असो तुमची जात. नालायकांच्या नालायकीची आधार असते जात. अपयशाला नि न्यूनाला पण लपवून ठेवते जात लायकीला पण बंधन नसते, नसते कुठली जात बढतीसाठी हापिसात रांगा, सांगा पुन्हा जात तुमची आमची रांग वेगळी, वेगळी तुमची जात दहावी, बारावीत बोर्ड सांगतं, वेगळी तुमची जात सैनिकांच्या पलटणीतूनही दिसून येते जात इलेक्शनच्या फडी उतरता, लिहावी लागते ज
काव्यरस

पफ आणि कस्टर्ड ड्रॅगन

लेखक शुचि यांनी सोमवार, 14/05/2012 02:58 या दिवशी प्रकाशित केले.
पफ द मॅजिक ड्रॅगन नावाचे लहान मुलांचे धमाल सुश्राव्य गाणे मध्यंतरी ऐकले. गाणे खूप आवडले. लहान मुलांना तर खूपच आवडेल अशी चाल आणि शब्द आहेत. या गाण्यात पफ नावाचा अक्राळ-विक्राळ ड्रॅगन आहे ज्याचे हृदय मात्र लोण्याहूनही मऊ आहे :). मैत्रीमधील निष्ठा आणि कोमल हृदय हे गुण या शक्तीशाली ड्रॅगनमध्ये आहेत. ज्याला मोठे मोठे राजे महाराजे वाकून कुर्नीसात करतात, ज्याच्या गगनभेदी गर्जनेपुढे , थरथर कापून खुद्द समुद्री चाचे आपल्या जहाजाचा झेंडा उतरवतात अशा या ड्रॅगनचा एक लहान मुलगा जिगरी दोस्त आहे. त्याचे नाव "जॅकी पेपर". पफचे, जॅकीवर खूप प्रेम आहे.

अंगणात बाप, दारात माय,

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी रविवार, 13/05/2012 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
अरे अंगणात बाप अन दारात माय, घरला तुज्या यायला मी खुळा हाय की काय, येड्या, रानात गेला बाप अन बाजारला माय, एकली हाय घरला, आता येतो का नाय, घराकडे आलो तर काय काय देशील घराकडे आलो तर काय काय देशील गरम गरम पीठल अन भाकर तू खाशील सोताच्या हातानी भरवणार हाय, रानात गेला बाप अन बाजारला माय, एकली हाय घरला, आता येतो का नाय, पोटभर खाल्यावर लै झोप येते पोटभर खाल्यावर लै झोप येते दोघांसाठी खोलीत गोधडी घालते खोलीच दार आतुन लावनार हाय, रानात गेला बाप अन बाजारला माय, एकली हाय घरला, आता येतो का नाय, काय हुईल बाजारन जर आली आई काय हुईल बाजारन जर आली आई सांगेन आई ह्यो तुजा जावई, मागन मला घालायाला येनार हाय

ज्यु. अर्धवटराव

लेखक अर्धवटराव यांनी गुरुवार, 26/04/2012 03:01 या दिवशी प्रकाशित केले.
गणपा भाऊंच्या लेकीचे "तारे जमीं पर" वाचताना आमच्या चिरंजीवांचा, अर्थात ज्यु. अर्धवटरावांचा एक किस्सा आठवला. किस्सा तसा साधाच, पण मला एका क्षणात अपरंपार सुख देणारा. मागच्याच आठवड्यातील गोष्ट. मी १०% वेळ ऑफीसचं काम आणि ९०% वेळ मिपावर पौराणीक विमाने, धर्म, वगैरे बौद्धीके पचवून थोडा वैतागलेल्या अवस्थेत संध्याकाळी घरी परतलो. ज्यु. अर्धवटराव खेळण्यात दंग होते. त्यांची मला वेलकम करायची एक खास स्टाईल आहे. त्यानुसार आमचे आगत-स्वागत झाले आणि मी स्थानापन्न झालो. डोक्यात या निष्ठूर-पापी-व्यवहारी वगैरे वगैरे दुनीयादारीचे तसलेच काहि व्यवहारी विचार घोळत होते.

तारे जमीं पर.

लेखक गणपा यांनी गुरुवार, 26/04/2012 00:55 या दिवशी प्रकाशित केले.
काल फोन वर बोलताना लेकीचा मुड छान होता. शक्यतो तिच्या गप्पा ३-४ वाक्यातच संपतात. पण सध्या मे महिन्याच्या सुट्टीचे डोहाळे चालु झालेत. त्यामुळे स्वारी खुशीत होती. शाळेतल्या गमती जमती सांगायला आतुर झाली होती. परवा म्हणे इंग्रजीच्या तासाला बाई 'अ‍ॅबस्ट्रॅक्ट' आणि 'काँक्रिट' नाउन शिकवत होत्या. तिसरीतल्या मुलांना समजेल अश्या शब्दात समजवण्याची बाईंची कसरत चालु होती. तरी जमेल तितकी व्याख्या सोप्पी करत बाई म्हणाल्या की अ‍ॅबस्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे ज्या गोष्टीं आपल्याला पहाता येत नाही वा वास घेता येत नाही किंवा स्पर्शही करता येत नाहीत त्या. उदा. ब्युटी, हॅप्पीनेस.

मिथक विरूद्ध चिऊ आणि काऊ : एक तौलनिक अभ्यास

लेखक संजय क्षीरसागर यांनी शनिवार, 14/04/2012 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
`मिथक' हे `चिऊ आणि काऊ' वरून सरळसरळ उचलंय असं अवलोकन आहे तरी जाणकारंनी योग्य तो पाहुणचार करावा अशी नम्र विनंती मिथक : चहाचा कप समोरच्या टेबलावर ठेवत त्याने आवरायला सुरूवात केली. शर्ट चढवला, मोजे घातले, यांत्रिकपणे पँट चढवली. मानेभोवती टाय अडकवून तो आरशात पाहत उभा राहिला.

मला समजलेले चिऊ आणि काऊ

लेखक संजय क्षीरसागर यांनी गुरुवार, 12/04/2012 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ प्रेरणादायी लेख http://www.misalpav.com/node/21326 प्रथम हे लक्षात घ्यायला हवे की ही कथा केवळ चिऊ आणि काऊची नाही, ती आदीम `मानवप्रेमाची ' प्रतिकात्मक करूण कहाणी आहे. काऊचा अर्थ चिऊचा पती इतकाच नसून `कावलेला' किंवा मनातून कावलेला पण बाहेरून काऊ (इथे इंग्रजीतील `काऊ' म्हणजे `गायीसारखा गरीब' असा अर्थ आहे,....

बोंबा मारुक ह्यांचो आक्खो आयुष्य जाय...

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 02/04/2012 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा :- ज्यांना गरज आहे त्यांनी शोधावी. (मालवणी भाषेचा गंध देखील नसल्याने काही शब्दांमधून मालवणीचा बट्ट्याबोळ झाल्यास लेखक जबाबदार नाही. मालवणी माणसे व भाषीक ह्यांच्याविषयी कुठलाही रोष नाही.
काव्यरस

<गोवरी>

लेखक यकु यांनी गुरुवार, 15/03/2012 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
खोपडीच्या मुळाशी किती जोर देशी उगाच्या उगाची किती कुंथीशी मानवाची नसे कोणतीही स्थिती चूर्णे खा जराशी ठेवी ती उशीशी जात जातीत भेदे अशी ती कशी जळेना कळेना मढी जाळीशी बाबारे कोरडे तरी तेच आहे लिहिशी कविता तू ती कशाने अशी यात ना काही तरी तू तोच आहे पिसारा कशाला उगा दाविशी करावे भरावे उणे तूच पाहे खपावे मरावे गोवरी जाळताहे (कविवर्यांशी ओळख नसल्याने धार मुद्दाम थोडीशी कमी केली आहे. ओळख असती तर लोकशिक्षण, मुक्त अभिव्यक्ती आणि लोकरंजन वगैरै वगैरै वगैरे सर्वव्यापी फालतूपणासाठी काही शब्द बदलता आले असते )

मि .पा. करांची कविता......

लेखक पियुशा यांनी बुधवार, 14/03/2012 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
मि .पा. करांची .... भाग -२ हाय हेल्लो नमस्कार चमत्कार ,सबकु अपना राम - राम , अपुन बना रैले एक कविता लेके मि. पा.