Skip to main content

संवाद

लेखक हेरंब यांनी रविवार, 27/04/2008 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
काही बोधपर व मनोरंजक संवाद
: - भटो भटो : - ओ : - कुठे गेला होता ? : - प्रवेश घ्यायला : - मिळाला ? : - नाही. : - का ? : - कोटा आडवा आला : - बरं झालं, आम्ही खातो गरे, तुम्ही खा आठळ्या! : - आठळ्याही तुम्हीच खा, मी जातो 'तिकडे'. : - भटो भटो : - ओ : - कधी आला ? : - परवाच : - काय आणलं ? : - चॉकलेटं : - उभी कापू का आडवी ? : - नका कापू, तुमच्यासाठीच आणलीयेत. : - मजा आहे ना तिकडे ? : - मजा नाहीये, पण सजा पण नाही. : - भटो भटो : - ओ : - कुठे गेला होता ? : - 'तिकडे', मुलाकडे. : - काय केलेत तिकडे ? : - नेहेमीचेच, आराम केला, फिरलो, मुलं सांभाळली. : - मग पुढे काय ? : - त्यांत काय ? सहा महिने इकडे, सहा महिने तिकडे! : - मजा आहे बुवा : - मजा कसली ? सजा आहे सजा!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3662
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

मस्त लिहिलं आहे! :) आपला, तात्या भटो.

पूर्ण नाही समजले :( (पाचवी पास से तेज नसलेला) देवदत्त

सुरेख! अड्मिशन्,विद्यार्थ्याचे अमेरिका गमन ,कोटा,आरक्शण सगळ्यावर वरच भारी कॉमेन्ट केलित की राव!(तेही प्रत्यक्षात कशाचच नाव न लिहिता!) "उपक्रमा"वरचा राज ठाकरे/मुम्बै तील "पर प्रांतीय" प्रश्ना वरचा लेखही अगदि ह्याच शैलीत आहे. साठ्यांचे नाठाळ कार्टे.

लै भारी लिवलेय

संवाद #१ आणि #२ एकदम रिअलिस्टिक वाटले. #३ कदाचित अप-डाऊन करणार्‍यांना रिअलिस्टिक वाटत असेल. इथेच रहात असल्याने आम्हाला त्याची गंमत कळली नाही.. हे अजून वाढवता येईल काय, हेरंबजी?

: - भटो भटो : - ओ : - 'इकडे' परत कधी? : - 'इकडे'? आता कशासाठी? : - का हो, का नाही? : - नेहेमीचेच, भ्रष्टाचार, बेशिस्त, ट्रॅफिक, धूळ, कोटा. : - मग पुढे काय ? : - त्यांत काय ? वर्षभर 'इकडे', सुट्टीला 'तिकडे'! : - माज करताय राव! : - माज कसला? नाईलाज आहे, राजा! चतुरंग

एक संवाद नांवाचा धागा बघितला. त्यावरुन 'याची' आठवण आली.