मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अर्थव्यवहार

शेअर गुंतवणुकीला जुगार म्हणणे योग्य आहे का?

मार्मिक गोडसे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझे बाबा घरूनच ऑनलाईन शेअर ट्रेडिंग करतात. एके दिवशी बाबांबरोबर मी शेअर ट्रेडिंगचे लाइव ट्रेनिंग घेत असताना बाबांचा मित्र घरी आला, माझ्या डोक्यात टपली मारली व म्हणाला जुगाराचे ट्रेनिंग चाललेय वाटत ? बाबा गालातल्या गालात हसले, त्यांनी आपली खुर्ची स्क्रीनपासून बाजूला घेतली व ट्रेडिंगची सूत्रे माझ्याकडे दिली. मित्राला बसावयास खुर्ची दिली. (बाबांचे हे मित्र विज्ञानाचे पदवीधर होते परंतू गावाकडे वडिलोपार्जित २५-३० एकर शेती होती व शेतीची आवड असल्यामुळे त्यांनी शेती हाच व्यवसाय स्वीकारला आज ते यशस्वी बागायतदार म्हणून ओळखले जातात.) बाबांनी आपला मोर्चा मित्राकडे वळवला.

देवास

जयंत कुलकर्णी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या तथाकथित पुढार्‍यांनी हा व्हिडिओ जरुर पहावा. नुसतेच राजकारण करुन सरकारच्या नावाने गळा काढून पॅकेज मागणे सोडून असे काहीतरी करावे म्हणजे शेतीमुळे आत्महत्येची वेळ येणार नाही. यावर कोणी म्हणेल की येथेही शेततळी आहेत पण प्रमाण बघा व ती चळवळ बघा. पण आपल्या पुढार्‍यांना (जे शेतकरीच आहेत) त्यांना हे नको आहे कारण मग यांच्या पदरात काय पडणार ? उरला प्रष्न अतीवृष्टीचा. जर या व्हिडिओत दाखवलेली शेती असेल तर मला नाही वाटत शेतकरी एकदुसर्‍या संकटाने डगमगून जाईल. नुसतीच आंदोलने करणार्‍या संघटनांपासून शेतकर्‍यांना वाचव ही प्रार्थना करण्याची वेळ आता आली आहे हे निश्चित.

मरायचं नाय बे...!!

आयुर्हित ·
मरायचं नाय बे...!! कुणब्याचं पोरं सालं भित्रच हाय , फासावर जाय नाहीतर औषध खाय , लय बेनं इपितर बायलच हाय..

आणि यांनी घडविली अमेरिका! .. २) जॉन डी रॉकफेलर

अमित खोजे ·
लेखनप्रकार
या पूर्वी . . . आणि यांनी घडविली अमेरिका! .. १) कोर्नेलिअस व्हँडरबिल्ट कोर्नेलिअस व्हँडरबिल्ट हा जगातील सर्वात मोठ्या रेलरोड कंपनीचा मालक होता. अन त्याला याची कल्पना होती कि रेलरोड आता अमेरिकेत सगळीकडे झालेले आहेत. आता पैसा रेलरोड बांधून नाही तर त्यावर मालाची आणि उतारूंची वाहतूक करून येणार. त्यासाठी तो एका चांगल्या मालाच्या शोधात होता ज्याची वाहतूक संपूर्ण देशभर करून तो पैसा कमवू शकेल आणि असा माल आणि अशा कंपनीचा मालक त्याला लवकरच मिळाला. जॉन डी. रॉकफ़ेलर आणि त्याचे केरोसीन (रॉकेल)! पुढे चालू . . .

ऑक्टोबर मध्ये होणारे ३ कट्टे.....

मुक्त विहारि ·
ह्यावेळी डोंबोली, ठाणे आणि पुणे इथे ३ कट्टे होणार आहेत. डोंबोलीतला कट्टा नक्की झाला आहे. ठाण्यातील आणि पुण्यातील कट्या संदर्भातील इतर माहिती लवकरच कळवण्यात येईल. डोंबोली कट्ट्याची माहिती खालील प्रमाणे... १. ठिकाण ===> नंदी पॅलेस २. दिनांक ===> १८-१०-२०१४ ३. वेळ ====> संध्याकाळी ७:३० ४. संपर्काचे माध्यम ===> व्य.नि. करणे. डोंबोली कट्टा झाला की मग ठाणे कट्टा आणि मग पुणे कट्टा असा बेत आहे.

बनावट नोटा एक अब्ज रुपयांच्या

शशिकांत ओक ·
लेखनप्रकार

बनावट नोटा एक अब्ज रुपयांच्या छापायचा उद्योग!

बनावट नोटा एक अब्ज रुपयांच्या *shok* Shock भारतीय अर्थिक गंगाजळीच्या नाड्या ढिल्या करणाऱ्या कुटिरोद्योगाच्या दानी मालदारांनी मालदा मुक्कामी एका वर९-९शून्ये इतक्या नोटा छापायचा उद्योग केल्याची बातमी वाचली असेल. *smile* इतक्या हिरीरीने विदेशातील नोटाछपाई तज्ज्ञांनी चालवलेला प्रयास व नंतर तो भारतीय चलनाच्या गंगाप्रवाहात हलके हल्के सोडायची कसोशी व अथक कोशिश पाहून मन धन्य पावले.

आज पाहुणे घरात घुसले, तुझ्यामुळे -

विदेश ·
काव्यरस
. (चाल: आज चांदणे उन्हांत हसले, तुझ्यामुळे-) आज पाहुणे घरात घुसले, तुझ्यामुळे नात्यातून बघ अंतर पडले, तुझ्यामुळे ... घाव अंतरी बसतच होते घर खरोखर सुखात होते खर्चातून हैराण जाहले, तुझ्यामुळे ... उसनवारीचे द्रव्य जमविले व्याजच होते भारी कसले द्र्व्यास्तव ते सर्व भांडले, तुझ्यामुळे ... उगाच माझी होती दैना खाली पाकिट मार्ग सुचेना वादातून दाताड विचकले, तुझ्यामुळे ... सदनि या जरी होती शांती पाहुणे परंतु येता बोंब ती आज शंख तरि मीच ठोकले, तुझ्यामुळे ... .

मला आवडलेली शेअर ट्रेडिंग पद्धत....

ज्ञानव ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
ट्रेडिंगला सुरुवात कशी करावी? त्याला साधा सोपा अभ्यास काय ? तांत्रिक (आणि त्या मागील मांत्रिक )विश्लेषण बाजूला ठेऊन जर सुरवात करायची असे असेल तर एक सोपी पद्धत खालील प्रमाणे :- कंपनी : बँक ऑफ इंडिया वर्ष : २०१३ महिना ------- उच्च पातळी (हाय) ............ नीचतम पातळी (लो) जानेवारी ------- ३९३ ............ ३३२.४०(अ) फेब्रुवारी ------- ३५८.५० ............ ३१२.१० मार्च ------- ३३०.७० ............ २८१.९० एप्रिल ------- ३४५.८० ............

लाभांश मिळवा.....मिळवतच राहा.

ज्ञानव ·
लेखनप्रकार
सध्या शेअर मार्केट निपचित पडले आहे. पण जे dividand साठी शेअर घेत असतात त्यांना त्याचा फारसा परिणाम होत नाही. उलट आताच्या पडलेल्या मार्केटमध्येच हे शेअर खरेदी करण्याची उत्तम वेळ म्हणावी लागेल. पण मी इथे एक वेगळ्या कारणाने अश्या कंपन्यांची लिस्ट देत आहे जिचा लाभांश घोषित झालेला आहे आणि दोन चार दिवसात त्याची रेकॉर्ड डेट आहे.

नायक क्रमांक एक

ज्ञानोबाचे पैजार ·
आमच्या आगामी " नायक क्रमांक एक" या चित्रपटातले शिर्षक गीत खास आमच्या चाहत्यांसाठी. या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीते आम्ही स्वतः लिहिली आहेत याची वाचकांनी कॄपया नोंद घ्यावी. (कंसातल्या सुचना दिग्दर्शकासाठी असुन, नायक नायिकेने कंसाबाहेरच्या शब्दांचे गायन करत नॄत्य करायचे आहे. चित्रीकरण सुरु करण्या आधी कॅमेरामॅनच्या कॅमेर्‍याची बॅटरी चार्ज आहे कि नाही ते तपासावे) (ज्याच्या कडे बर्‍यापैकी कपडे असतील त्यालाच नायक म्हणुन घेण्यात यावे. नायिका आम्ही आधिच निवडली आहे.