✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

विश्वास श्वासावरचा

श — शब्दानुज, Wed, 05/06/2015 - 09:28
रोज पुन्हापुन्हा तो बाहेर पडतो संगे फक्त कोरडा उःश्वास घेतो हजारो वर्षापासुन तो तिला शोधतो ती अजुनही असल्यावर विश्चास ठेवतो प्रत्येकाच्या शरीरात जावुन तो पाहतो तिच्या अोळखीच्या खुणा शरीरात शोधतो पवनाच्या रुपातुन तो मला रोज भेटतो पुन्हापुन्हा तिचे कुशल मला विचारतो प्रत्येक श्वासातुन मी समजावु पाहतो श्वासाशिवायच्या शरीरास मी तरी नाकारतो तो मात्र अजुनही विश्वास ठेवतो तिच्या श्वासहिन शरीरास शोधत राहतो श्वासाशिवाय तो तरी भटकत राहतो श्वासावरच्या विश्वासास ठोकरु पाहतो.....

प्रतिक्रिया द्या
2447 वाचन

💬 प्रतिसाद (4)

.

शब्दानुज
Wed, 05/06/2015 - 09:32 नवीन
तुम्ही कोणता अर्थ लावाल हे वाचायला आवडेल
  • Log in or register to post comments

कविता अवघड वाटली,

गणेशा
Wed, 05/06/2015 - 11:24 नवीन
कविता अवघड वाटली, अर्थ वाचायला आवडेल असे म्हंटल्याने म्हणुन आपला साधासा अर्थ घेतलेला सांगतो... ----- येथे तो म्हणजे 'आत्मा' मी म्हणजे 'प्राण' आणि ती म्हणजे 'प्राणहिन प्रेयशी' प्राण .. आत्म्या बद्दल बोलत आहे त्यांचे बोलण्याचे माध्यम 'श्वास'
  • Log in or register to post comments

_/\_

शब्दानुज
Wed, 05/06/2015 - 12:03 नवीन
विरहाची ही कथा आहे वाहणारा वारा हा पियकर आहे असे मानले आहे तो वारा तिला शोधण्यासाठी फिरतो आहे अशी कल्पना आहे बाकी माझ्याहुन तुमचीच कल्पना चांगली आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

तुमच्या अर्थाने कविता

गणेशा
Wed, 05/06/2015 - 12:44 नवीन
तुमच्या अर्थाने कविता वाचल्यावर कविता लगेच कळाली. .मस्त आहे. मी उगाच उलट क्लिष्ट करुन ठेवला होता अर्थ.. असो पण मज्जा आली.. माझ्या अर्थाने एकदा कविता वाचुन बघा बरे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दानुज

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा