श्वास आहे घास नाही कोरडे नि:श्वास केवळ
भाकरीचा चंद्र नाही, चांदण्याचा भास केवळ
साव म्हणती, चोर म्हणती, ढोरही म्हणती कुणीसे
माणसाची जात माझी, दांभिकांचा फास केवळ
मिरग गेला हस्त गेला पांढरीला ओल नाही
धान नाही पेरणीला, पावसाची आस केवळ
प्राक्तनी सगळ्या जिवांच्या शेवटी मातीच आहे
मोह संपे ना तरीही, खेळ 'त्याचा' ख़ास केवळ
खोल नांदे जखम ओली वेदनेला अंत नाही
मोकळा आहे तरी ना मुक्त मी... आभास केवळ
अंतरीचा रामराया शोधिसी का एकट्याने?
सोड आता नाद वेड्या, वेच थोडे श्वास केवळ
विशाल ५/०९/२०१५
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3505
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह!!!!
वाह!!!!
आवडली१
आवडली१
आवडली!
आवडली!
यावरून..
साव म्हणती, चोर म्हणती, ढोरही म्हणती कुणीसे
माणसाची जात माझी, दांभिकांचा फास केवळ
या ओळी आवडल्या
अंतरीचा रामराया शोधिसी का एकट्याने?
सोड आता नाद वेड्या, वेच थोडे श्वास केवळ
या शेवटच्या ओळीत फारच निराशा दिसते.
यावरून कवी ज्ञानेश वाकुडकरांची शेतकर्यास आत्मविश्वास देऊ इच्छित एक कविता अलिकडेच वाचली नाव आठवत नाहीए आठवले की देतो.
अंतरीचा रामराया शोधिसी का
In reply to यावरून.. by माहितगार
अंतरीचा रामराया शोधिसी का एकट्याने?सोड आता नाद वेड्या, वेच थोडे श्वास केवळ
या शेवटच्या ओळीत फारच निराशा दिसते.
धन्यवाद. पण त्या ओळीत निराशा नाही तर स्वत्वावर, स्वतःवर विश्वास ठेवण्याचा सल्ला आहे. सगळे काही रामभरोसे न सोडता 'जगण्याचे' काही क्षण वेच. अशी आशावादी मागणी आहे. :)
आवडली कवीता !
आवडली कवीता !
कविता भेदक आहे.
कविता भेदक आहे.
_/\_
_/\_
निव्वळ अप्रतिम विशाल दा
निव्वळ अप्रतिम
विशाल दा
धन्यवाद मंडळी _/\_
धन्यवाद मंडळी _/\_
मस्त
मस्त
सुपर्ब ! क्लास
सुपर्ब ! क्लास
धन्यवाद श्रेष्ठी _/\_
धन्यवाद श्रेष्ठी _/\_
छान आहे
अंतरीचा रामराया शोधिसी का एकट्याने?
सोड आता नाद वेड्या, वेच थोडे श्वास केवळ
आवडली
प्राक्तनी सगळ्या जिवांच्या
खलास!!!
सुंदर, नादमय रचना
वाचनखूण साठवली आहे.
+१
In reply to सुंदर, नादमय रचना by बहुगुणी
मीही
धन्यवाद _/\_
धन्यवाद _/\_