पेरणा
बघ मळतो कसा? चिमटीने घेत माप...
सख्या चुन्यासवेच, आज मळ गायछाप!
अजूनही न पाहिली, गोळी ती हातातली
हळूच ठेवतो गालात, एक चिमुट गायछाप !
केशरी चुन्या वरुन, हात एक फेरला
उद्या खाउ विलायती, आज मळ गायछाप !
शशीसम दंत तुझे, राहती कसे प्रिये?,
मम वदनी पहा कशी, काळीभोर गायछाप !
कुरकुरीत चुर्यावरी, पिठूर चूर्ण पांघरु...
उधाणला मस्तकात, तो जहाल गायछाप!
तनू-मन झणाणता, पिसा समान वाटते
हळूच वेच कण कण, मौल्यवान गायछाप !
पहाट उगवताच हात, शोधती पुडी तुझी
कळ ही बसे रुसून, संपताच गायछाप !
पैजारबुवा,
यक्क!!! =))
पैजारबुवा _/\_
=))
हेच समजले.
=))
मस्त.
मूळ कवितेत नाही इतका दर्द
एक नंबर झालीय पैंबू काका ..
.
In reply to . by शब्दानुज
विडंबारिष्ट
वाह !!
वा बुवा!
तळव्यांपेक्षा गळवं भारी !