पेरणा
बघ मळतो कसा? चिमटीने घेत माप...
सख्या चुन्यासवेच, आज मळ गायछाप!
अजूनही न पाहिली, गोळी ती हातातली
हळूच ठेवतो गालात, एक चिमुट गायछाप !
केशरी चुन्या वरुन, हात एक फेरला
उद्या खाउ विलायती, आज मळ गायछाप !
शशीसम दंत तुझे, राहती कसे प्रिये?,
मम वदनी पहा कशी, काळीभोर गायछाप !
कुरकुरीत चुर्यावरी, पिठूर चूर्ण पांघरु...
उधाणला मस्तकात, तो जहाल गायछाप!
तनू-मन झणाणता, पिसा समान वाटते
हळूच वेच कण कण, मौल्यवान गायछाप !
पहाट उगवताच हात, शोधती पुडी तुझी
कळ ही बसे रुसून, संपताच गायछाप !
पैजारबुवा,
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
12646
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
:):):) किक वाली कविता.;)
दं ड व त
माताय.. =))
विडंबन
In reply to माताय.. =)) by प्रचेतस
नाखु काका
In reply to विडंबन by नाखु
जबराट...अखिल मिपा "झुरळ चालत
In reply to विडंबन by नाखु
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mersalaayitten... :- I [ A.R. Rahman | Vikram, Amy Jackson | Shankar ]खतरनाक विडंबन !
पैअजारबुवा सुटलेत...
हणतीज्यायला,
ही घ्या पुडी...
In reply to हणतीज्यायला, by अभ्या..
घ्या पुढचा विषय पैजारबुवा
मिपा कविलोक हैकी मानते नही ! :)
पहाट उगवताच हात, शोधती पुडी
हा हा हा ! आधी मुळ कविता
धमाल :)
पैबु काका
वाह!!