(पाहिजे)
पेरणा
हे पाहिले आणि म्हटले आपणही जाहिरात देउनच टाकावी.
ऑफिस मध्ये कामा साठी कष्टाळू मुलगा पाहिजे
त्याच्या कडे स्वत:चे दुचाकी वहान असले पाहिजे
गाईच्या धारा काढण्यासाठी हवा एक अनुभवी गडी
गायीच्या लाथा गोड मानण्याची त्याची तयारी पाहिजे
घरकामासाठी हवी आहे एक मोलकरीण
घरात पडेल ते काम तिने केले पाहिजे
शेतात काम करण्यासाठी मजूर हवे आहेत
उन पाउस चिखलात राबण्याची त्यांची तयारी पाहिजे
तसेच एक माळी, फिटर, प्लंबर, सुतार व गवंडी तसेच,
हापिसात कामाला एक अनुभवी रिसेप्शनिस्ट पाहिजे
वारजे किंवा सिंहगड रोड परिसरात १ किंवा २ बीएच के फ्लॅट
कार पार्किंग सकट विकत किंवा भाड्याने पाहिजे,
वृध्दाश्रमासाठी सेविका (८ जागा), व्यवस्थापिका,
ड्रायव्हर व स्वयंपाकी पाहिजे,
नामांकित बँकेच्या कामा साठी, १० वी १२ वी पास / नापास
मुले मुली, व टिमलिडर पाहिजे,
आणि शेवटी....
लग्न करायचे आहे, एक सुस्वरूप आणि संस्कारी मुलगी पाहिजे
बाकी ती कशी असावी याची चर्चा खाजगीत करू, इकडे नको,
इकडे (स्वयंघोषित) सुधारणावाद्यांना दुसर्यावर हल्ला करायचे काहीतरी निमित्त पाहिजे
पैजारबुवा,
मिळतेच मिपावर दादही भन्नाटशी
=))
नेहमीचेच यशस्वी... पैजाराबुवा
जमतंय जमतंय! :)
कविता भन्नाट जमलीये,
तुम्ही काही म्हणा उस्मानशेठ