मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गरम पाण्याचे कुंड

( वरपरीक्षा )

रातराणी ·
आमची प्रेरणा वरपरीक्षा ........................... नव्हते मनांत तरीही, नाव नोंदवून आलो कांदेपोहे जिरले सारे, नकार पचवून आलो * होती एक परी, स्वप्नात तिच्या फसलो वर परीक्षेस मी, उगीच टाळत राहिलो * अशी नको तशी नको, कारणे शोधत राहिलो बोहल्यावर चढले मित्र, मी एकटाच राहिलो * बोलण्यास मागता वेळ, सांगे ती असते व्यस्त सकाळसायंकाळ जणू, मी पसरतो अस्ताव्यस्त * आवडलो ना तुला?,कितीदा तिला पुसावे येईल का होकार,म्हणुनी किती झुरावे * येता होकार तिचा,मन सैरभैर व्हावे वाघाची होऊन शेळी, पिंजऱ्यात बंद व्हावे * नव्हते मनात माझ्या,मग का असे

(डोलकरांचे मनोगत)

ज्ञानोबाचे पैजार ·
(डोलकरांचे मनोगत) पेरणा अर्थातच शतदा भरला एक प्याला शेवटचा मी तृप्त पाहुनी खंबा हा टिचर्सचा रिचवले हजारो पेग मी उदरात सदैव राहो, दरवळ हा गोल्ड फ्लेकचा चखण्याची देउन आहुती पोटाला मी किंचित पिळले अलगद त्या लिंबाला नसता जेवण व्यर्थ मानले असते मज आहे कारण आज घरी जाण्याला धडपडत लटपटत रिक्षात पाय ठेवियले कुठे जायचे ते अडखळत सांगितले जरी घरी आल्यावर पडली उपेक्षा पदरी निळकंठा सम ते अमृत मानूनी प्राशीयले !! हे विजय मल्या थोर तुझे उपकार तू दिली आम्हाला रम व्हिस्की बीयर गायबला जरी तू बँकांना देउन तुरी सदैव राहिल तुझी

(मुलिंनी धरु नये अबोला)

ज्ञानोबाचे पैजार ·
आमचे परम मित्र व मिपावरचे जगप्रसिध्द कवीवर्य मा रा रा संदिपचंद्र रावजी चांदणे साहेब यांची क्षमा मागुन माझे हे काव्य पुशप रसिक वाचकांच्या चरणी सविनय सादर करतो. पेरणा अर्थातच (मुलिंनी धरु नये अबोला) मुलिंनी मुलांशी अबोला धरुन बिचार्‍यांना अडचणीत आणू नये त्यांच्या मनात विराटच्या झंजावाती खेळी बद्दल विचार चालू असतो आपली आधाशी नजर दुकानात दिसणार्‍या (आणि न दिसणार्‍या) प्रत्येक वस्तूवरुन फिरवू नये मुलांच्या खिशात असलेल्या एकमेव शंभराच्या नोटेचे हिशेब ढासळू लागतात मोबाईलची रिंग वाजली की आपली जागा

(कोरडी भाकर)

ज्ञानोबाचे पैजार ·
मागच्या वेळी पेर्णा दिली नव्हती तर नाखुकाकांनी माझा कान धरला होता, त्यामुळे यावेळी न विसरता - ही पेर्णा फार धावाधाव झाली, सकाळी खरोखर जेवणा तरी सुधा, नाराज नसे मी तुझ्यावर मी किती दडवून ठेवले या ढेरीला कुत्सित नजरा घाव घालती.. या..!

(लिहितो विडंबन स्वतःच साठी)

ज्ञानोबाचे पैजार ·
लिहितो विडंबन स्वतःच साठी समोर दिसता कच्चा माल शब्द कल्पना यमके सारी आपसुक धरती त्यावर ताल विषय निवडीचा नसे विकल्प चारोळी, गजल की पोवाडा, जो कविने विषय मांडला त्यावरी केवळ तुटून पडा वाचून किंवा दुर्लक्षूनही डोळ्यांपुढती नाचत राही मग डोक्याची होते मंडई लेखणी खुपसून फाडून खाई लिहा लिहा तुम्ही लिहा कविता धीर जराही मनी न धरा! जोरात चालूदे गिरणी तुमची पिठही पाडा भराभरा विषय सत्वरी ना मिळतो जर तर उघडा गालीब किंवा ग्रेस उडवा धुरळा यमकांचा की वाचन करता यावा फेस पुन्हा अवेळी आली कळ जर पोट दाबुनी ठेउ नका पाडून टाका मळमळ सारी विचार कधिही करु नका पैजारबुवा,

(काळी असे कुणाची)

ज्ञानोबाचे पैजार ·
लैच दिवसांनी मिपावर आलो आणि पहिल्याच धाग्यावर हात शिवशिवायला लागले.... काळी असे कुणाची, आक्रंदतात तेची, मज पांढरी स्फुरावी, हा दैवयोग आहे, सांगू कसे कुणाला, मी ब्यांकेत गेलो नाही, ही सवय डेबीट कार्डची, हीतकारी ठरत् आहे, काही करु पहातो, नसतात लोक तेथे, पूसता कळे असे की, तो लायनीत आहे, परीर्वतन जहाले, रात्रीत काय ऐसे, की भर सायंकाळी, हा बार रिक्त आहे, -(पैजारबुवा) आनंदीआनंद

(हूं)

रातराणी ·
लेखनविषय:
आमची प्रेरणा आशा मनात तुझी धुसर धुसर, मागताना आवाज कातर कातर, स्मरता जुन्या त्या आठवणींना, दरवळलो मी अत्तर अत्तर !!१!! क्लायंट कायम करतो काशी, म्हणतो पगार कसा छापाल छापाल मुहूर्त काढता सणासुदीचा रिलीजला शिव्या अपुर्या पडतील पडतील !!२!! डिजाइन टीमची असते बोंब रिक्वायरमेंट नाही क्लियर क्लियर, क्यूएची आहे नसती कटकट मागे , बग सापडलेत बघा शंभर शंभर!!३!! जरी प्रोजेक्टची अवस्था दीनवाणी हवीच आहे मला सुट्टी सुट्टी असेल जरी क्रिटिकल एरर आता काम दिवाळी नंतर नंतर !!४!!

(*गणे कसेच होते)

स्पा ·
लेखनविषय:
पेर्रणा -लाडका बुव्या *गणे कसेच होते? येथे बघून गेलो पाणी जराच होते, थोडा *गून गेलो टमरेल टांगलेले, मी घेतले हातात परसाकडील दारी, मी लगबगून गेलो लागून आली तेव्हा,कळ कालच्या कटाची अतिशुभ्र धोतराला, पीतांबरुन गेलो तो रोग जन्मपंथी, भिती मनात दाटे अन भोगता तयाला, मी सरबरुन गेलो ह्या सांगतो जुलाबा, जा होऊनि अता तू आटोपलेच होते, पुन्हा *गून गेलो *गणे कसेच होते. .

रे गझलाकारा, आवर तुझे दुकान...

मोदक ·
लेखनविषय:
गेले काही दिवस सरसकटीकरणाचा तडका आणि अभंग वाचून आमच्या शहरी असंवेदनशील मेंदूच्या झुडुपाला एक कवितेची डहाळी उगवली. ती डहाळी त्याच्यासोबतच्या पालापाचोळ्यासकट येथे चिकटवत आहे...