Skip to main content

(सख्या चुन्यासवेच, आज मळ गायछाप!)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शुक्रवार, 18/05/2018 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा बघ मळतो कसा? चिमटीने घेत माप... सख्या चुन्यासवेच, आज मळ गायछाप! अजूनही न पाहिली, गोळी ती हातातली हळूच ठेवतो गालात, एक चिमुट गायछाप ! केशरी चुन्या वरुन, हात एक फेरला उद्या खाउ विलायती, आज मळ गायछाप ! शशीसम दंत तुझे, राहती कसे प्रिये?, मम वदनी पहा कशी, काळीभोर गायछाप ! कुरकुरीत चुर्‍यावरी, पिठूर चूर्ण पांघरु... उधाणला मस्तकात, तो जहाल गायछाप! तनू-मन झणाणता, पिसा समान वाटते हळूच वेच कण कण, मौल्यवान गायछाप ! पहाट उगवताच हात, शोधती पुडी तुझी कळ ही बसे रुसून, संपताच गायछाप ! पैजारबुवा,

वाचने 12646
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

__________/\____________ हृदयाच्या अंमळ जवळ असलेल्या शौकाला असली दर्दी सलामी. मजेदार आहे राव.

माताय.. =)) बाकी तुम्ही सह्यांचं विडंबन न करण्याचं भलतंच मनावर घेतलंत ब्वा.

In reply to by प्रचेतस

जबराट ता क विडंबकाने ऑल आउट वापरण्यापेक्षा लक्ष्मण रेखा बाळगावी अखिल मिपा "झुरळ चालत नाही सरळ" या भूछत्री संघाच्या निवेदनातून साभार टपाली दूरस्थ नाखु

In reply to by नाखु

काय जबरा प्रतिसाद ... या प्रतिसादासाठी तुम्हाला काटाकीरची मिसळ आणि दोन ग्लास मस्तानी पैजारबुवा,

In reply to by नाखु

जबराट... अखिल मिपा "झुरळ चालत नाही सरळ" या भूछत्री संघाच्या निवेदनातून साभार

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Mersalaayitten... :- I [ A.R. Rahman | Vikram, Amy Jackson | Shankar ]

खतरनाक विडंबन ! डबल आर घ्या पैजारबुवा =))))

हणतीज्यायला, जय हो मालपाणी सेठ, जय हो चत्त्यापट्टयांची चड्डी घालून गायीची धार काढणारा इसम. पण ती गाय जर्दा छाप असते बरका.

हा हा हा =)) , तेवढ्या रम्य काव्य कल्पनेकडुन अशा विडंबनावर पोहचू शकला याचीही कौतुकास्पद कमाल वाटते. :)) मिपा कविलोक हैकी मानते नही ! :)

पहाट उगवताच हात, शोधती पुडी तुझी कळ ही बसे रुसून, संपताच गायछाप या वाक्यासाठी कडाडून १५ मिनिटे टाळ्यांचा मान

हा हा हा ! आधी मुळ कविता वाचून ईथे आलो ते बरं झालं. नाही तर मुळ कविता वाचताना बरंच काही डोळ्यासमोर आले असते. ;-)

पैबु काका नेहेमीप्रमाणे धमाल सादरीकरण . मज्जा आली .