गर्भार सातव्या महिन्याची

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
1 Aug 2018 - 10:28 am

जिच्यासाठी झटून दिनरात
दिली परीक्षा प्रीतीची
आज भेटली ती, होऊन
गर्भार सातव्या महिन्याची!

मावळला ध्यास, गळाली आस
गळ्यापाशी कोंडला श्वास
म्हणतील मामा, तिची लेकुरे
भीती मला त्या नात्याची!

क्षण पदोपदी झुरण्याचे
नकळत मागे फिरण्याचे
आता आठवती ते खर्च
आणि उसनवार मित्रांची!

आता काय, शोधू दुसरी
तीही नसेल तर तिसरी
करणार काय, मुळातच
आहे, बागेत गर्दी फुलांची!

- संदीप चांदणे

eggsmiss you!अनर्थशास्त्रअविश्वसनीयआता मला वाटते भितीकविता माझीकाहीच्या काही कविताकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडगाणेजिलबीनागपुरी तडकाप्रेम कविताफ्री स्टाइलभूछत्रीमाझी कवितारतीबाच्या कविताभयानकहास्यकरुणशांतरसकविताप्रेमकाव्यविनोदमौजमजा

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

1 Aug 2018 - 10:36 am | जव्हेरगंज

=))))))

जव्हेरगंज's picture

1 Aug 2018 - 10:39 am | जव्हेरगंज

वास्तववादी कविता!!

किसन शिंदे's picture

1 Aug 2018 - 2:36 pm | किसन शिंदे

=))

सद्य परिस्थितीचे वास्तव !!

प्रचेतस's picture

1 Aug 2018 - 4:18 pm | प्रचेतस

लै भारी

खिलजि's picture

1 Aug 2018 - 4:35 pm | खिलजि

हाय रे कर्मा

असं कसं झालं

भ्रमर होऊनि जिथे पिंगा घातला

त्याच फुलाने गळा कापला

मिटुनी घेतल्या साऱ्या पाकळ्या

शोधत आहे नवनवीन कळ्या

बाग फुलांनी जरी आली बहरून

तिला बघुनी आले गहिवरून

ज्ञानोबाचे पैजार's picture

1 Aug 2018 - 7:27 pm | ज्ञानोबाचे पैजार

चांदणे पैलवानांच काही खर दिसत नाही. जुन्या आठवणी लैच उफाळून बाहेर आलेल्या दिसतात.
पैजारबुवा,

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Aug 2018 - 8:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

=))

तुषार काळभोर's picture

1 Aug 2018 - 9:33 pm | तुषार काळभोर

कविताप्रेमकाव्यविनोदमौजमजाeggsmiss you!अनर्थशास्त्रअविश्वसनीयआता मला वाटते भितीकविता माझीकाहीच्या काही कविताकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडगाणेजिलबीनागपुरी तडकाप्रेम कविताफ्री स्टाइलभूछत्रीमाझी कवितारतीबाच्या कविताभयानकहास्यकरुणशांतरस

हे सर्व ठीक.
गरम पाण्याचे कुंड आणि अंडी???!!!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Aug 2018 - 9:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

त्यामागे मोठा मिपा-इतिहास आहे ! =))

चांदणे संदीप's picture

1 Aug 2018 - 9:54 pm | चांदणे संदीप

हिंदकेसरी, लैच्च विचार केला... ठीकाय... संदर्भासहीत स्पष्टीकरण नाही पण लॉजिकचा लाडू देतो.

कवितेचा नायक आपली नायिका 'त्या' अवस्थेत बघेपर्यंत नक्कीच अंडी घालत होता म्हणून मीही काव्यरसात ती तश्शीच उचलून घातली.
आणि गरम पाण्याच्या कुंडाला मला बाहेर ठेववेना म्हणून तेही उचलून घेतले. ;)

लोल!

Sandy

संजय पाटिल's picture

5 Aug 2018 - 11:02 am | संजय पाटिल

=)))

टवाळ कार्टा's picture

2 Aug 2018 - 1:49 am | टवाळ कार्टा

=))

नाखु's picture

2 Aug 2018 - 7:52 am | नाखु

माणसं आणि आपलीच माती

दूरून दर्शन नाखु

मित्रहो's picture

2 Aug 2018 - 9:28 pm | मित्रहो

जबरदस्त

दुर्गविहारी's picture

11 Aug 2018 - 1:44 pm | दुर्गविहारी

हा हा हा. भारी लिवलय. ;-)