Skip to main content
लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शुक्रवार, 16/10/2026 16:30 या दिवशी प्रकाशित केले.

पेरणा

https://www.misalpav.com/poem/54130

तू सहजच घालून येशी  
लाल सदरा लाल तुमान   
मी मौनात घुसमटते अन्
शोधत राहते शब्द मात्र...

सहज खाशी  कुठे कुठेही 
अन विचारशी "खाशील का गं"?
मनपाखरू झेपावतं पण ...
हायजीन पाहून थिजते मात्र...

सहज गाशी गाणे तेव्हा 
भेसूर  रेकून जाशी 
त्या गर्दभ रुदना मध्ये मी 
डोके दाबत राहते मात्र ...

सहज फेकिशी कपडे
खुर्ची न पलंगावर
मी आवरत राहते सारे
घर दिसतच नाही मात्र...

सहज बसोनी समोर
बोलतोस काही बाही 
दिवस जातो कसा तरी पण 
संताप सरतच  नाही मात्र...

सहज मोबाईलमध्ये तू
रमतोस तासन् तास
मी काही सांगायला जावे
तर वेळ नसतो मात्र...

तू चार चौघा मध्ये 
सरकविशी अपान वायू 
मैत्रिणी कुजकट हसती 
मी खजील होते मात्र....

तू खोदशी अजिंठा लेणी 
तर्जनीसव नासिके मध्ये 
समर्थशी त्या चाळ्याला 
मी भकास होते मात्र....

तू निष्पाप पणाने म्हणशी,
का उगाच करते त्रागा? 
तुझ्या सहजपणाचा हिशेब
मांडता येतच नाही मात्र...!!

अशा अनेक सहज गोष्टी
सहजपणेच केल्या असशील
त्यानंतर जगणे माझे
मुश्किल जाहले मात्र...!!

 पैजारबुवा,

लेखनविषय:

वाचने 37
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया