Skip to main content

कैच्च नै

((((((सहज मात्र))))))

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शुक्रवार, 16/10/2026 16:30 या दिवशी प्रकाशित केले.

पेरणा

https://www.misalpav.com/poem/54130

तू सहजच घालून येशी  
लाल सदरा लाल तुमान   
मी मौनात घुसमटते अन्
शोधत राहते शब्द मात्र...

सहज खाशी  कुठे कुठेही 
अन विचारशी "खाशील का गं"?
मनपाखरू झेपावतं पण ...
हायजीन पाहून थिजते मात्र...

सहज गाशी गाणे तेव्हा 
भेसूर  रेकून जाशी 
त्या गर्दभ रुदना मध्ये मी 
डोके दाबत राहते मात्र ...

सहज फेकिशी कपडे
खुर्ची न पलंगावर
मी आवरत राहते सारे
घर दिसतच नाही मात्र...

सो ने

लेखक मितान यांनी सोमवार, 17/08/2015 09:57 या दिवशी प्रकाशित केले.

सोशल नेटवर्किंग साइट्स ! यातही प्रामुख्याने फेबु न कसंकाय !!!

खरोखर उबग आलाय !