चक्रव्युह
अनुभव नंबर एक...
एक ऐंशी वर्षाचे सहनिवासी,या जगात एकटेच,यांना तो धोकेबाज विज बिलाचा मेसेज भ्रमणध्वनीवर आला.विज कापल्यानंतर होणाऱ्या संभाव्य पायपीट पासुन वाचण्या साठी त्यांनी प्रतीसाद दिला.काही क्षणातच त्यांच्या बँकेतील चारलाख रूपये धोकेबाजांनी (फ्राॅडस्टर) गायब केले.
अनुभव नंबर दोन...
आमचं पाणी शुद्धीकरण यंत्र खराब झालं,कंपनीला तक्रार केली. याच कामा करता काही अनोळखी नंबर वरून फोन आले पण धोकेबाज असतील म्हणून प्रतीसाद दिला नाही. कपंनीचा प्रतीसाद लवकर न आल्याने दुसर्या सर्व्हिस केंद्रावर तक्रार नोंदवली. त्वरीत प्रतीसाद व तंत्रज्ञ दारात उभा.
मिसळपाव