Skip to main content

वैद्यकीय सल्ला

साखरेचे पर्याय

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 23/09/2020 22:55 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार सर्वप्रथम सांगतो, मला मधुमेह नाही. मी लठ्ठही नाही (उंची ५'६" वजन ६७ किलो). पण एकतर साठीकडे वाटचाल, दुसरं म्हणजे पोट कमी करायचं तर गोड कमी केल्याशिवाय नुसतं चालुन उपयोग नाही असा सर्रास मिळणारा सल्ला आणि गोडाची आवड. शिवाय असं वाचनात आलं की पिष्टमय पदार्थांमधुन मिळणार्‍या शर्करे पलिकडे दिवसाला जास्तीत जास्त ३०-३५ ग्रॅम पलिकडे थेट साखर निषिद्ध. मी बिनसाखरेचा चहा पीतो, रात्री कॉफीमध्ये मात्र आवर्जुन साखर घालतो.

वैद्यकीय सल्ला हवा आहे.

लेखक shashu यांनी मंगळवार, 06/02/2018 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
वैद्यकीय सल्ला हवा आहे. (प्रश्नोत्तरे मध्ये लिहावयाचे होते परंतु Access denied असा संदेश प्रकट होत आहे त्यामुळे चर्चे मध्ये लिहीत आहे. क्षमा असावी). माझ्या भावाच्या मुलीला (वय वर्षे ५) गेले १ ते दीड महिना कोरड्या खोकल्याचा त्रास होत आहे. दिवसा जास्त खोकला नसतो परंतु रात्री विशेषतः झोपताना खोकला उफाळून येतो. आठवड्यातून ३-४ दिवस तरी असा त्रास होतोच. २-३ वेळेस खोकल्यामुळे उलटी सुद्धा झाली. जेवणामध्ये सुद्धा बदल करून पहिले. २ स्पेश्यालिस्ट DR. दाखवून झाले आहे. निदान सापडत नाही आहे. २ आठवढ्यापूर्वी आयुर्वेदिक उपाय चालू केले होते थोडा फरक पडलेला पण अजून खोकला पूर्णपणे जात नाही आहे.

वैद्यकीय सल्ला

लेखक ताल लय यांनी रविवार, 26/03/2017 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
वैद्यकीय सल्ला माझ्या ९ वर्षीय मुलाला गेले आठ दिवस ताप असून उपचार चालु आहेत. तीन दिवसांपूर्वी हॉस्पिटल मधे एडमिट केले आहे. आता ताप आटोक्यात असून खोकला आहे. drनी xrey रिपोर्ट पाहून सिटी स्कैन सांगितले आहे. (नुएमोनिआ निदान) साठी. काय करावे. मी २nd ओपिनियन साठी आज डिस्चार्ज घेणे ठरवले आहे. तरी तज्ञानी मार्गदर्शन करावे pl.