Skip to main content

जाहिराती

जाहिराती

लेखक उपाशी बोका यांनी सोमवार, 23/05/2022 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना: बरेच दिवस या विषयावर लेख लिहायचा विचार होता. पण आळसामुळे जमत न्हवते. शेवटी आज ठरवले की याबद्दल लिहूयाच. आपल्या सर्वांना सतत जाहिरातींचा भडिमार कळत-नकळत सहन करावा लागतो. कधी कधी त्याचा खूप त्रास पण होतो, पण शेवटी पर्याय काय म्हणून आपण गप्प बसतो आणि तो त्रास मुकाट्याने सहन करतो. पुढे पुढे अशी वेळ आली की विविध कंपन्यांना आपला माल विकण्यासाठी, ग्राहकांबद्दल जास्तीत जास्त माहिती गोळा करायची आणि त्यानुसार आपल्या जाहिराती सतत बदलत ठेवायची सवय लागली.