Skip to main content

घनकचरा

(मिपावर रामराज्य का बरे अवतरू शकत नाही?)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शुक्रवार, 04/09/2020 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा

मिपावर रामराज्य का बरे अवतरू शकत नाही?

मटा, सकाळ, लोकसत्ता इत्यादी इ पेपरांचे व इतर इ-मंचावचे वाचक बरेचदा खोटेपणा, बेरकीपणा इत्यादी 'गुणांचा' आधार घेत प्रतिक्रीया लिहिताना दिसतात. मिपावर मात्र बरेचदा प्रामाणिक, प्रांजळ,अभ्यासपूर्ण प्रतिक्रियां मधून सदस्यांचा एकमेकांबद्दल आदर वात्सल्य भाव आणि विषय समजून घेण्याची तळमळ दिसून येते. त्यामूळेच कदाचित नवकवी नवा लेखक इथे मोकळे पणाने लिहू शकतात.