Skip to main content

बगाड

बगाड परंपरा आणि परंपरेतील वगळण्याजोगे अमानुष अंश

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 02/10/2015 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
भारत आणि जगभरच्या काठीपूजेचा शोध घेता घेता मेपोल - एक आनंदोत्सव हा लेख मिपावर लिहिण्याचा योग आला. मिपा सदस्यांनी बगाड नावाच्या पश्चिम महाराष्ट्रातील परंपरे बद्दल माहिती दिली ज्यात थोडक्यात लाकडाची क्रेन बनवून त्या क्रेनने चक्क माणुस/माणसे उंच उचलली आणि फिरवली जातात. हे सर्व देवाच्या नावाने नवस करून केले जाते अर्थात अजून थोडा शोध घेतल्या नंतर हे केवळ महाराष्ट्रात नाही प्रथा पश्चिमबंगाल ते महाराष्ट्र आणि मधात येणारा आदीवासी पट्ट्यातून किंमान इंग्रजांच्या आधी पासून वेगवेगळ्या नावाने प्रचलित असावी असे दिसते आहे.