Skip to main content

नोटबंदी

मान लो वो अब कागज के तुकडे है!! (खरंच??)

लेखक बाजीप्रभू यांनी मंगळवार, 22/11/2016 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
काल खुप विचार करत होतो कि नवीन धागा काढावा? कि नोटबंदीच्या इतर धाग्यात प्रतिसादात लिहावं? कि खरडफळ्यावर टंकावं?. शेवटी म्हटलं धागाच काढावा. इतक्या छत्र्या उगवल्यात त्यात माझी अजून एक. काय होईल जास्तीत जास्त? धागा उडवला जाईल किंवा शून्य प्रतिसाद येईल हरकत नाही. तर, काल मिसेसचा भारतातून मेसेज आला "अहो टिंब टिंब भाऊ तुम्हाला आठ-साडे आठला कॉल करणार आहेत, प्रकरण गंभीर आहे. काय आहे म्हाईत नाही पण तुम्ही या भानगडीत पडू नका".