मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

श्री. भावेश भाटिया: एक अवलिया

मी ओंकार ·

मी ओंकार 19/10/2015 - 19:11
महाबळेश्वर येथील त्यांच्या कंपनी मधे तुम्ही त्यांच काम पाहु शकता, याच बरोबर महाबळेश्वर येथे वैक्स म्युझियम देखील भाटिया यांनीच घडवले आहे ते सुध्दा ७ ही दिवस खुले असते. अतिशय नम्र आणि प्रेरणादायी व्यक्तीमत्व.

In reply to by मी ओंकार

बॅटमॅन 23/10/2015 - 12:50
लेख तर मस्तच. शिवाय वॅक्स म्युझियमबद्दल वाचूनही छान वाटले. पुढे कधी जाईन तेव्हा हे पाहण्यात येईल, धन्यवाद!

लेख आवडला ! म्हणून ही खास पोच. अजून एक. धुमश्चक्रीच्या धाग्यांवर येणारे शतकी प्रतिसाद इथे येणार नाही पण तरीही लिहित रहा.

चतुरंग 19/10/2015 - 20:28
श्री. भाटिया यांची माहिती करुन दिल्याबद्दल धन्यवाद. चित्रफीत नंतर बघेनच. अधून मधून अशा माणसांची गाठ पडणे आवश्यक असते कारण त्यामुळे आपल्या अडचणी या कितपत खर्‍या आहेत याचा लेखाजोखा घेता येतो. माझ्या चुलत मामाच्या फॅक्टरीमध्ये एक संपूर्णपणे अंध व्यक्ती कामाला होती. बँकेत पैसे भरण्यापासून ते ५-५ लाखाची कॅश नेणे आणणे इतकेच नव्हे तर पुण्याहून मुंबईला जाऊन संपूर्ण, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल गोष्टींचे परचेस तुद्धा तो मनुष्य करुन येत असे एका पैशाचीही चूक न होऊ देता किंवा कोणतीही गफलत न होऊ देता! मामा सांगायचा की त्याला स्पर्शाने नोट कितीची आहे हे समजत असे. पाचशेचा गठ्ठा मोजताना मधेच शंभराची नोट सरकवून दिली तर तो मोजताना तिथे थांबे आणि नोट बाजूला काढून ठेवत असे! :)

जबरदस्त व्यक्तिमत्व. जबरदस्त लेख. एका चांगल्या व्यक्तिचि ओळख करुन दिलित. पुढील लिखानासाठी शुभेच्छा.

प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची ओळख करून दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. आजवर कधी महाबळेश्वरला गेलो नाही. जेव्हा जाइन तेव्हा भावेश यांच्या वॅक्स म्युझियमला आवर्जून भेट देईन.

In reply to by श्रीरंग_जोशी

नाखु 20/10/2015 - 11:08
सहमत अश्या मुझीयमला भेट देणे नक्कीच आनंददायी असेल. लेखाबद्दल धन्यवाद.

वेल्लाभट 20/10/2015 - 14:48
अशा लोकांसमोर साष्टांग घालणं इतकंच मी करू शकतो... याहून अधिक काही बोलण्याची वगैरे माझी पात्रताच नाही असं मानतो. जिद्दीचं मूर्तिमंत उदाहरण आहे हे !

नीलमोहर 20/10/2015 - 16:14
प्रेरणादायी, कर्तृत्ववान व्यक्तिमत्व. त्यांच्या जिद्दीला आणि दुर्दम्य इच्छाशक्तीला सादर प्रणाम. लेखासाठी धन्यवाद.

पिशी अबोली 20/10/2015 - 16:25
प्रेरणादायी आहे. कॉलेजला असताना बरेच अंध मित्र-मैत्रिणी होते. त्यांच्या ग्रुपसोबत वेळ घालवणे, त्यांच्यासोबत अभ्यास करणे हा निव्वळ आनंद होता. अजूनही काही लोकांसोबत संपर्क आहे आणि ते प्रचंड धडपड करून खूप यशस्वी झालेले आहेत. अशा लोकांना पाहिलं की स्वतःच्या आळशीपणाची प्रचंड लाज वाटते.

अजया 20/10/2015 - 16:25
या लेखाद्वारे या आदरणीय व्यक्तिमत्वाची ओळख करुन दिल्याबद्दल अनेक आभार.त्यांच्या फॅक्टरीला नक्की भेट देणार आणि म्युझियमलाही.

मी ओंकार 20/10/2015 - 16:33
कॉलेज ला असताना श्री. भाटिया यांनी सायकल वर नेपाळ पर्यंतचा प्रवासही आपल्या डोळस मित्रासोबत केला आहे. पिशी अबोली होना, त्यांना भेटुन कधीकधी आपल्या आळशीपणाची खरच लाज वाटते! अवांतरः ह्या लेखात काही बदल करायचे असल्यास काय करायला लागेल. माझा पहिलाच लेख आहे हा त्यामुळे हा ईंटरफेस जुळवुन घ्यायला वेळ लागतोय.

चित्रगुप्त 21/10/2015 - 06:35
कमाल आहे या माणसाची. अतिशय प्रेरणादायी लेख. आम्हा दिल्लीत राहणाऱ्या मराठी लोकांना सुरुवातीला पंजाबी लोक अजिबात आवडत नाहीत, परंतु नंतर हळूहळू कळत जाते की असे काही नसते. त्यांच्यात अतिशय थोर लोक आहेत.

चतुरंग 21/10/2015 - 07:08
काय कणखर आहे हा माणूस!! केवळ पोलादी जिद्द!! लाचारी, सहानुभूती, दया यांची जराही शिकार न होता असली स्वप्ने पूर्ण करणे येरागबाळ्याचे काम नोहे! येथे कर माझे जुळती!! _/\_ (साष्टांग्)रंगा

बोका-ए-आझम 21/10/2015 - 08:07
अशा माणसाला अंध कोण म्हणेल? ज्याने इतरांना दिसत नसलेली संधी शोधून काढली आणि एवढा मोठा उद्योग उभा केला, तो माणसापुढे _/\_.

आनंदराव 21/10/2015 - 12:00
अशा या लोकांमुळे आपले खुजेप ण अधिकच अधोरेखित होते. आपण फारच निरर्थक आयुष्य जगतोय असे वाटायला लागते पण काही चांगले करण्याची प्रेरणा पण मिळते. या गोष्टी खुप महत्वाच्या आहेत असे वाटते.

प्रचंड ऊर्जादायी व्यक्तिमत्व.....आमच्या सौ नॅबमधेच काम करीत असल्याने त्यांच्याबरोबर जवळपास अख्खा दिवस घालवला आम्ही.... आवर्जून भेट द्यावी असे म्युझियम आहे त्यांचे ! काही कारणवश माझा हा लेख लिहायचे मात्र राहून गेले होते....जुन्या आठवणी ताज्या केल्याबद्दल धन्यवाद मी ओंकार !

कपिलमुनी 21/10/2015 - 14:52
महाबळेश्वरला बर्‍याचवेळा जाउन ही माहिती नव्हती. पुढील भेटीमध्ये फॅक्टरीला भेट देउन खरेदी करण्यात येइल

मी ओंकार 21/10/2015 - 15:49
वेळेअभावी किंवा काही कारणास्तव महाबळेश्वर बाहेरील लोकांची गैरसोय होउ नये म्हणुन सनराईज कॅन्डल्स ह्या श्री. भाटिया यांनी आंतरजालावरही विक्रीसाठी उपलब्ध केल्या आहेत. http://sunrisecandles.co.in/

वयाच्या १५ व्या वर्षी अचानक आंधळेपण आले तर तुम्ही काय कराल? आणि सोबतच आई कर्करोगाने आजारी आणि वडिलांची तुटपुंजी कमाई ही संकटे ह्याच काळात उभी ठाकली तर? एकुन कदाचीत धक्का बसेल पण ही खरी गोष्ट आहे अश्याच एक अवलियाची ज्याला वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी या अस्मानी संकटांचा सामना करावा लागला, आणी त्यातुन खचुन न जाता जोमाने उभा राहुन आज करोडा रुपयांचा व्यवसाय आणी सोबत शेकडो अंध लोकांना रोजगार देउन त्याने आपले जिवन सार्थकी लावले. अशा या अवलियाचे नाव आहे श्री. भावेश भाटिया. श्री. भाटिया यांचा जन्म झाला महाबळेश्वर हया थंडहवेच्या गावी.