श्रद्धावंतांचे "तत्त्व"ज्ञान - विडंबन
माझ्या परिचयाचे एक गृहस्थ नास्तिक आहेत. ते मला सोमवारी (दि.१६ ऑक्टो 2017) रस्त्यात भेटले. "कुठे जात आहात?" असा थेट प्रश्न त्यांना विचारू नये याची मला कल्पना आहे. कारण, "राइट टू प्रायवसी" या संविधानात्मक वचनावर त्यांचा हक्क असतो. असा प्रश्न कोणाला विचारला तर त्याचे खासगीपण भंग होते, असे त्यांना वाटते. म्हणून त्यांना आडवळणाने विचारले. "काय? कुठपर्यंत फेरी?"
" भाजीवाल्याकडे जात आहे."
" पण आज तर बाजारचा दिवस नाही. रविवार आहे."
" अहो, आज वांग्याचे भाव पडलेत. तुम्हा दोडके खाणारांना त्याचे काय म्हणा !
मिसळपाव