Skip to main content

वीज चोरी

वीज चोरी

लेखक शेर भाई यांनी बुधवार, 09/12/2020 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
अस्मादिक एका सहकारी गृहनिर्माण संस्थेत अध्यक्ष आहेत. आमच्याकडे संस्थेत ‘सहकार’ फक्त नावातच आहे. तस बघाल तर हि करोना पूर्व काळात सुरु झालेली गोष्ट आहे. सगळ्या सहकारी गृहनिर्माण संस्थेत ज्याप्रमाणे वीज वापर नोंदणी करता कर्मचारी येतात त्याप्रमाणे आमच्या संस्थेत देखील वीज कंपन्या त्यांचे कर्मचारी दर महिन्याला पाठवतात. मार्च २०२० मधील गोष्ट आहे, वीज कंपनीने नवीन नियुक्त्यांवर पाठवलेल्या कर्मचार्‍यांनी संस्थेच्या कार्यकारिणीला कळवले कि, तुमच्या संस्थेत मीटर पेक्षा DP जास्त आहेत, तरी तपासणी करून घ्या. त्या प्रमाणे आम्ही तपासणी केली असता असे आढळले कि एका सदस्याचा मीटरच गायब आहे.