मुखवट्यांमागचे चेहरे- डायना आणि चार्ल्स
डायना जेव्हा तिच्या प्रियकरासोबत (दोडी अल फयाद) कार अपघातात वारली, तेव्हा तिच्याबद्दल साऱ्या जगभरात हळहळ व्यक्त झाली होती. एका करारी बेधडक राजस्नुषेचा मृत्यू चटका लावणारा होता. विचार करा, जिच्या साम्राज्यावर कधीही सूर्य मावळत नव्हता अशी ख्याती असलेल्या इंग्लडच्या राणीची सून होणं किती कठीण गोष्ट असेल. राजघरण्याची प्रतिष्ठा सांभाळणं आणि ते टिकवण्यासाठी कित्येक मुखवटे राजघराण्यातील व्यक्तींना चढवावे लागतात. पण आपल्याला जे दिसतं ते सारंच खरं नसतं, अश्याच राजेशाही चेहऱ्यांची करुण कहाणी म्हणजे मीना प्रभूंचं 'मुखवट्यांमागचे चेहरे- डायना आणि चार्ल्स' हे पुस्तक !