अनपेक्षित धक्का! (कथा)
धक्का देणाऱ्या काही छोट्या कथा
1
त्या दिवशी पाच वर्षाचा मुलगा एलेक्स हा त्याचे वडील डेव्हिड यांच्या सोबत एकटाच बेडवर खेळत बसलेला होता, तो म्हणाला, "पप्पा बेडखाली कुणीतरी आहे, बघा ना!"
"अरे कुणी कशाला येईल बेडखाली?"
"बघा ना, मला हालचाल जाणवतेय!"
"ठीक आहे, तुझ्या समाधानासाठी बघतो", असे म्हणून डेव्हिडने बेडखाली वाकून पाहिले, बघतो तर काय घाबरून पाय दुमडून थरथरत अलेक्स बेड खाली बसला होता आणि घाबरत हळू आवाजात म्हणाला,
"पप्पा बेडवर कुणीतरी आहे!"
2
मी त्या दिवशी घरी एकटाच होतो. रात्री सगळी दारं खिडक्या बंद करून बसलो.