दिल से सलूट....

dipak bhutekar's picture
dipak bhutekar in जनातलं, मनातलं
14 Feb 2016 - 12:29 pm

नुकताच 26 जानेवारीला गणराज्य दिना निमित्त झालेल्या पुरस्कार सोहळ्या मध्ये महाराष्ट्राच्या चार शुर मुलाना "भारत पुरस्कार" या सर्वोच्य राष्ट्रिय बाल शौर्य पुरस्कार साठी गौरवण्यात आले त्यात वैभव घंगारे (वर्धा) , नीलेश भिल्ल (जळगाव), मोहित दळवी (मुंबई) ह्याची शौर्य पुरस्कार साठी निवड करण्यात आली आहे. तर, नागपुरच्या गौरव सहस्त्रबुध्दे (वय15) ह्याला मरणोत्तर शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे गौरवने आपल्या जीवाची काळजी न करता आपल्या चार मित्रांना वाचवन्या साठी आपला जिव धोक्यात घातला मित्राचे प्राण तर त्याने वाचवले पण स्वतःचा जिव मात्र त्याला गमवावा लागला. ह्या गोष्टीच् दुःखहि आहे की हा पुरस्कार स्विकारण्याणसाठी गौरव ह्या जगात नाही. पण त्याच्या कामगिरी साठी त्याला "दिल से salute"... .ह्या चारही मुलांनी आपल्या जीवाची परवा न करता कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता निस्वार्थी पने समोरच्या व्यक्तिचि मदत केलि आणि त्यासाठी ते शौर्य पुरस्काराचे परिपूर्ण हक़दार झाले....

पण मित्रानो काय शिकतो आपन या सर्व गोष्टीन (लहान मुलांन कडून) मधून कधीच आपन विचार करत नाही. की, ही लहान मुले लोकांची मदत करू शकतात तर मी का नाही करू शकत??? लांब कशाला आता हेच उदाहरण घ्या ना, काहि दिवसान पूर्वी नागपुर मध्ये एक लहान मुलगा कटलेली पतंग पकड़त असताना त्याला विद्युत् तारेचा शॉक लागला तो त्याच आवस्तेत तड़फडत होता पन काही लोक त्याची मदत करण्या ऐवजी त्या मुलांची त्यांच्या मोबाइल मध्ये त्याची फित बणवन्यात व्यस्त होते . हीच का आपल्या भारताची संस्कृति??? एकीकडे आनंद होतो की, माझ्या महाराष्ट्रातील चार मुलाना त्याच्या चांगल्या कामगिरी साठी शौर्य पुरस्कार मिळाला आणि दुसरीकडे हे सर्व पाहून खुप वाइट वाटत. जर एकीकडे 15 वर्ष्याचा गौरव हा लहान मुलगा स्वताची काळजी न करता चार मुलाना वचउ शकतो मग दुसरीकडे हे मोबाइल मधे फीत घेणारे चार लोक एका शॉक लागून तड़फडणार्या मुलांची मदत करू शकत नवते ?? पण त्यानी तस नाही केल. मित्रानो तुम्हाला नाही वाटत काही तरी चूकतय?? आपल्या देशाला जगभरात सांकृतिक देश म्हणून ओळखले जाते हेच का ते संस्कार??? अविश्वसनीय सौंदर्यानि नटलेल्या भारताला पाहायला जगभरातुन लोक येतात . "अतिथि देवो भवः" म्हणणाऱ्या आपल्या भारतात आज काल त्याच अतिथ्यांची मदत करण्या ऐवजी लूट केलि जाते. ही मानसिकता कितपत योग्य वाटते.? आज आपल्याच देशातील स्रियांची खुलेआम भरदिवसा छेड़ काढली जाते. हेच का ते आपले संस्कार जे जगभरात गाजले आहेत? रोज आपल्या नजरे समोर कित्तेक accident होतात पण "कशाला कोणाच्या लफड्यात मध्ये पड़ायच" अस म्हणून आपन त्याची मदत करायला टाळतो. खुप लोक करतात ही मदत. पण, बरेच लोक याला अपवाद आहेत मला वाटतंय चुकतोय आपन.

आज बर्याच लोकानी आपल आयुष्य जनसेवे साठी वाहून घेतल मी हे नाही म्हणत की तुम्ही पण अस करा पण ह्या जनसेवा साठी लढणाऱ्या लोकांची मदत म्हणून आपली मानसिकता तर बदलू शकतो जरी आपन आर्थिक व शैक्षणिक प्रबळ नसलो तरी आपन दुसर्याना त्रास देने टाळु तर शकतो. जर असच होत राहील तर भारत जगाचा प्रेरणा स्थान नाही राहणार याची भीति वाटते. मला कुणाला उपदेश करायचा काहीही एक अधिकार नाही. पण, हे सर्व थांबवन्यासाठी म्हणून पहिल पाऊल.विदेशी आतिथिनच्या मदति साठी पहिल पाऊल मी त्याची होनारि लूट तर थाबउ शकत नाही पण त्याना alert तर करू शकतो, स्रियांच्या सन्माना साठी पहिल पाऊल मी जरी त्याचा अंगरक्षक होउ शकत नाही पण आदर तर करू शकतो,गर्जुनच्या मदति साठीच पहिल पाऊल मी त्याची आर्थिक मदत करू शकत नाही पण सहकार्य करण्याचा प्रयत्न तर करू शकतो. गौरव सह अनेक महान लोकांनी इतराच्या मदति साठी आपले प्राण गमवले ते वाया जाऊ नए म्हणून त्याच्या कार्याचा सत्कार म्हणून ही सुरवात त्यात आपलही सहकार्य आपेक्षित आहे. सांगण्याच तात्पर्य एवढच की, ह्या धावपळीच्या जगात नकळत काहि चूका होत आहेत आणि त्या सुधारण्यासाठी सुरवात आपल्या पासून करुयात. नाहीतर वेळ निघुन गेल्यास चूका सुदारन्यास काहीच अर्थ नसतो....
-दीपक भुतेकार
(चींटु)

धोरणमांडणीसंस्कृतीसमाजविचारप्रतिसादसद्भावनाप्रतिक्रियालेखबातमीमतसल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतप्रतिभा

प्रतिक्रिया

एक एकटा एकटाच's picture

14 Feb 2016 - 12:44 pm | एक एकटा एकटाच

लेख आवडला
अन
विचार ही