खुशबू (समाप्त)

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जनातलं, मनातलं
17 Mar 2015 - 6:28 pm

भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ | भाग ६ | भाग ७ | भाग ८| भाग ९| भाग १०| भाग ११| भाग १२
भाग १३ | भाग १४ | भाग १५| भाग १६| भाग १८| भाग १८

रियाधमधल्या मॅर्रिअट हॉटेलमधल्या माझ्या खोलीतील आरशात मला माझी प्रतिमा दिसत होती, कमावलेलं शरीर, सावळा वर्ण, देखणा तरुण वैमानिक दीपक गेहलोत…… खुश होऊन आजच्या दिवसाला सामोरे जाण्यासाठी हॉटेलमधून बाहेर पडलो, दोन मिनिटात मी मला टर्मिनलकडे नेणाऱ्या शटलसमोर उभा होतो, 'गुडमॉर्निंग कॅप्टन', शटल ड्रायवर बिलालने आपल्या बांगला वळणाच्या बोलीत माझं अभिवादन केलं, शटलमधे आधीच सहवैमानिक, आणि स्टेवर्डेस माझी वाट पाहत बसलेलेच होते, दरवाजा स्लाईड करून बंद करून बसलो. बिलालने सरकावलेल्या एअर इंडियाच्या वॉवचरवर मी स्वाक्षरी केली…
सहकार्यांबरोबर गप्पा मारत मारायला सुरवात केल्या त्या, किंग खालिद इंटरनॅशनल एअरपोर्टचं प्रवेशद्वार आलं तेव्हा थांबल्या, मी एक डॉलरच्या ४-५ नोटा बिलालकडे सरकवल्या…'तुमचा प्रवास सुखकर होवो !' तो उद्गारला. सगळे ऑफीशिअल सोपस्कार पार पाडून, माझी सॅमसोनाइट ची ट्रोली ओढत एअर इंडियाच्या कौंटरपाशी आल्यावर, माझं फ्ल्यायिंग लायसन्स व एअर इंडियाचं ओळखपत्र तिथल्या ऑपरेशन ऑफिसरकडे दिलं, त्यांन फॉर्मलिटी म्हणून विचारलं 'फ्लाईट AI ९२० टू मुंबई राईट ?, प्लीज हा आणखी एक फॉर्म भरून देता का ?', मी त्यावर आवश्यक तो मजकूर लिहिला, आणि 'ओन्ली फॉर डिप्लोमट्स अंड क्रु’ असं लिहिलेल्या दरवाजाकड प्रयाण केलं, 'चला आता सहवैमानिक आणि फ्लाईट इंजीनिअर बरोबर रुटीन इंजिन, इंस्त्रुमेंट्स, कम्युनिकेशन चेक्स काळजीपूर्वक करायला हवे म्हणून, माझ्या दोन्ही हाताचे तळवे क्षणभर हलकेच एकमेकांवर घासून, त्यादिशेने वळलो…
---------------------------------------------------------------------------------------------------

किंग खालिद इंटरनॅशनल एअरपोर्ट च्या दिशेने, रूट ५३९ वरून आमची गाडी प्रवास करून आता बरीच मिनिटे झाली होती, जेव्हा प्रिन्सेस नुरी बिंते अब्दुल रहमान युनिवर्सिटी डाव्या खिडकीतून मागे जाताना दिसली तेव्हा मनात विचार आला की बस्स थोड्याच वेळात आपण विमानतळावर पोहोचू, १०-१५ मिनिटात एअरपोर्टवर पोचलो. तिथं लगेज चेक-इन, इमिग्रेशन आदी सोपस्कार पार पडल्यावर आम्ही एअर इंडियाच्या लाउंजमध्ये जाऊन बसलो. विमानतळावरचे सोपस्कार आटोपून मुंबईच्या विमानात बसलो. आज लॉटरी लागली अस वाटलं, जेव्हा मला इकॉनॉमी क्लासमधून बिझनेस क्लासमध्ये अपग्रेडेशन मिळालं एकही रुपया न खर्चता. कारण विचारलं ते म्हणाले ‘एकतर हा ऑफसीजन आहे जवळजवळ सर्व विमान रिकाम आहे, म्हणून सर्व इकॉनॉमीच्या प्रवाशांना अपग्रेडेशन दिलंय. ‘इट्स यॉर लकी डे मिस्टर कुरिअन’, मनात विचार आला, नाहीतरी या एसी टेकनिशियनच्या पगारात स्वताच्या खर्चातून बिसिनेस क्लास थोडीच परवडणार आहे ? त्यामुळं मी बिझनेस क्लासमध्ये मोठ्या खुशीने बसलो. जेव्हा टेकऑफ केलं, तेव्हा नेहमीप्रमाणे लघवीची भावना झाली, पण सीट बेल्ट साईन ऑन होती….
---------------------------------------------------------------------------------------------------

टेक ऑफ झाल्यावर थोड्याच वेळात बोईंगच अजस्त्र धूड ३०००० फुटावर नेलं स्थिरस्थावर केलं, पँनेलवरची सगळी गेजेस व्यवस्थित रीडिंग दाखवत होती, तरी एस ओ पी प्रमाणे सर्व रीडिंग वेरीफाय केली, रियाध टॉवरबरोबरचा संवाद संपवला, त्यानंतर ते मोठ बोईंग जेट ऑटोपायलट ठेवलं, चीफ स्टूअर्डला इंटरकॉम वरून पुढच्या रुटीन सूचना दिल्या.
---------------------------------------------------------------------------------------------------

स्पीकरवर सौम्य स्त्री आवाज उमटला, 'देविओ और सज्जनो, जहाजके कप्तानने कुर्सीकि सुरक्षापेटी बांधनेके चिन्हको बुझा दिया है, अभी यात्रीगन अपने इलेक्ट्रोनिक साधनोका प्रयोग कर सकते है, और कुर्सी की बांधी हुई सुरक्षापेटी खोल सकते है, यात्रियोसे अनुरोध है …'
हे ऐकून म्हटलं चला टॉईलेट वापरूया, तर बिसिनेस क्लासच्या टॉईलेटजवळ नंबर लावायला सुरवात झालेली लोकांची, ठीक आहे आपण इकॉनॉमीचा टॉईलेट वापरू म्हणून तिकडे मोर्चा वळवावा, तर घाई घाईत तिकडची एअर होस्टेस धावतच आली, तिने घाईने मधला पडदा एका हातात धरून, लावण्यापूर्वी मला सांगितलं, सर प्लीज तुम्ही बिसिनेस क्लासचीच टॉईलेट वापरा, तिच्या खांद्यामागे मला इकॉनॉमी सेक्शनमधे ५-६ लोकं दिसली, अरे ह्यांना का नाही अपग्रेड केलं ? बिसिनेस क्लासमधे तर अजूनही काही सिटा रिकाम्या होत्या… पण जाऊन दे न ! आपल्याला काय !… तरी इकॉनॉमी मधले ते लोकं काहीशी वेगळी वाटली मला नै, म्हणजे एक हातभर दाढीवाला झाब्बातल्या व्यक्ती आपल्या सीटमधे दोन्ही मनगट जवळ ठेवून बसला होता… आणि शिवाय कोपरा पासूनचे पुढचे त्याचे दोन्ही हात शालीमधे अशे गुरफटवून ठेवले होते की ते दिसूच नये…. आणि एवढी मोकळी सीट असताना त्याला चिकटून दोन्ही बाजूला व मागं खाकी सफारीतले, क्लीन शेव्ड, क्रु कटमधले दणकट लोकं होती, मागच्या कोपर्यात थोड्या अंतरावर ऐक सरदारजी बसले होते आपल्या गुलाबी पगडीमधे …
---------------------------------------------------------------------------------------------------

बोईंग अरबी सागरावरून उडत होतं व काही काळ जरा एअर टर्ब्युलन्स जाणवला. मी डाव्या खिडकीतून बाहेर पाहिलं. माझ्या डाव्या बाजूला पसरलेल्या ढगांच्या वरून आमचं विमान उडत आलं होतं. खालचं काही दिसत नव्हतं पण सवयीप्रमाणे मला ठावूक होतं एका रूपेरी महासागरातून आपली 'फ्लाईट AI ९२० टू मुंबई हळुवारपणं चालली आहे, तो एअर टर्ब्युलन्सही आता गेला होता. विमानतळ लोकेशन, समोरच्या स्क्रीनवर येत होतं. ते मोठ बोईंग जेट ऑटोपायलटवरून काढून माझ्या नियंत्रणात घेतलं, लॉगसाठी नोंद केली, मुंबई एअर ट्राफिक टॉवरशी संपर्क प्रस्थापित करायला सुरुवात केली, थोड्याच वेळात विमानाचं डिसेंडिंग सुरू केलं. मुंबईच्या विमानतळावर भरपूर एअर ट्रॅफिक होतं. मग क्लिअरन्स मिळेपर्यंत विमान आकाशात गोल गोल फेऱ्या मारीत ठेवलं. लांब अरबी समुद्रात जाऊन खाडीवरून चक्कर झाल्या. अखेर खाली ट्राफिक टॉवरकडून क्लिअरन्स सिग्नल मिळाला आणि विमान वेगानं वांद्र्याच्या झगमगाटावरून विमानतळावर उतरवलं.……….
---------------------------------------------------------------------------------------------------

खुशबूने आपल्या बिछान्याजवळच्या घड्याळात पाहिलं तर त्यात सकाळच्या ९ वाजताची वेळ दर्शवत होती, गेले काही दिवस झोप मिळतच नव्हती, एवढी थकून गेली होती त्या धावपळीमुळे, ऐनवेळी फरीदाला झालेला अपघात…. त्यामुळ होऊ न शकणारी डी एन ए टेस्ट, शेवटी ती जगात मागे सोडून गेलेल्या तिच्या बायोप्सिच्या स्याम्पलमुळे यशस्वी पार पडली होती…. आज ती बुट्टी मारणार होती… कारण आज दुपारी टी व्ही वर दिल्लीवरून ऐक प्रेस कॉन्फ्रंस प्रक्षेपित होणार होती…
---------------------------------------------------------------------------------------------------

आपण कोणत्या ठिकाणी चाललो आहोत, याची त्या बुरखेधारि व्यक्तीला, बुरख्यामुळे काहीच कल्पना येत नव्हती, विमान तळाच्याबाहेर मागच्या बिनवर्दळी ह्यांगरमधे येण्याच्या जरा आगोदर, त्याला त्या गुलाबी फेटा घातलेल्या सरदारजीने विचारले, 'पाणी चाहिये ?', त्याचे पाणी पिउन झाल्यावर त्याला ह्यांगरमधे आधीच उभ्या असलेल्या, काळ्या काचेच्या 'शिवनेरी' अस लिहिलेल्या ऐका बसमधे बसवण्यात आले, त्याचे हात बेडीत असल्यामुळे त्याला त्याच्या जागेवर बसवण्यात इंडो तिबेट बॉर्डर पोलिस कमांडो दलाचे जवान मदत करत होते, सौदीतून विमानप्रवास सुरु झाल्यापासून तेच त्याचे सोबती होते… पहाटे पहाटे प्रवासात बुरख्यामुळे त्याला काहीच दिसत नव्हत, फक्त त्याच्या कानावर पडत होती दूरवरून येणाऱ्या अजानचे शब्द … 'अल्ला हो अकबर …अल्ला …अशुदो अन ला इल्लल्लाहा…हैया लस सलाह …' आणि त्याचा अर्थ त्याला चांगलाच ठावूक होता …. ' बंधू (मित्रा) ऊठ आणि प्रार्थनेला चल …. नतमस्तक होण्याची वेळ जाहली आहे …… '
---------------------------------------------------------------------------------------------------

आईये आपको स्टुडीओसे सिधा ले चलते है, महराष्ट्र सदनमे, जहापे इस वक़्त, भारतके गृहमंत्री बालासाब थोरवे इस वक़्त पत्रकार परिषद ले रहे है,.....हा दीपक क्या हो राहा है वहा ?…दीपक … लागता है हमारा संपर्क नही हो पा रहा है ….

रिमोट क्लिक….दुसरे च्यानल …

पार्शभूमीवर तिरंगा ध्वज आहे गृहमंत्री पाहिलं वाक्य बोलतात 'हमने उसे पकड लिया है, वी गॉट हिम', मागच्या कित्येक महिन्यापासून चालू असलेली हि गुप्त मोहीम यशस्वी झाली आहे………

रिमोट क्लिक….दुसरे च्यानल …

ब्रेकिंग न्यूज
अनेक बॉम्बस्फोटप्रकरणी हवा असलेला एका महत्त्वाच्या अतिरेक्याला भारतीय सुरक्षा यंत्रणांनी अटक केलीय. अबू फैसल असं त्याचं नाव आहे. ही अटक खूप महत्त्वाची आहे. सौदी अरेबिया सरकारनं भारत सरकारच्या विनंतीवरून त्याला देशाबाहेर काढलं. आणि विमानतळावर पोहोचताच त्याला अटक करण्यात आली, असं समजतंय. त्यानंतर त्याला कोर्टात हजर करून पोलीस कोठडी देण्यात आलीय. अबू फैसलनं अतिरेक्यांना प्रशिक्षण दिलं तसंच त्यांना हिंदी शिकवली. तो भारताचा नागरिक असला तरी त्याचं वास्तव्य काही काळ पाकिस्तानमध्ये होतं. अबू फैसल मूळचा गुजरातचा - मूळ नाव जबीउद्दीन अत्तारी ……
---------------------------------------------------------------------------------------------------

१४ वर्षांपूर्वी
२६ जानेवारी
कारगिलकी में दुश्मन का सामना करने के लिए १६ ग्रेनेडीअर के जिला काठियावाडके हवलदार सलीम फरीद बागवान को जिम्मेदारी सौंपी गई। दुश्मनके हमले में भारी घमासान के बाद सलीम बागवान के प्लाटूनके सभी साथी मारे गए और वे स्वयं भी बुरी तरह घायल हो गए। पाकिस्तानी ठिकाने पर कब्जा करने मोहीम समाप्त होने की घोषणा तक बुरी तरह से घायल सलीम बागवान दुश्मन से मुकाबला करते रहे। मरने से पूर्व उन्होने कई दुश्मन सैनिकों को मौत के घाट उतारा। इस 23 वर्षीय जवान को मरणोपरांत शौर्यचक्र से नवाजा जा रहा है । गुजरातके काठीयावाडमें जन्मे इस होशियार ने अपनी वीरता एवं रणकौशल का परिचय देते हुए इतिहास में अपना नाम अमर कर लिया है ।

राम्पवरून एक महिला राष्ट्रपतींच्या दिशेने निघाली …. …. आपल्या स्वच्छ, नीटनेटक्या, दोन वेण्या चपचपीत तेल लावून घातलेल्या मुली बरोबर…राष्ट्रपतींनी तिचं कौतुक करून नाव विचारल्यावर ती मुलगी म्हणाली "खुशबू"…..

***************************** समाप्त ****************************************
******************************************************************************

उपसंहार

अबू फैसल विरुद्ध फास्ट ट्रयाक कोर्टात १०००० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे, सरकारतर्फे हा खटला यशस्वी पब्लिक प्रोसेक्युटर सौ उज्ज्वला निम्हण लढवत आहेत.

अबू फैसल की गिरफ्तारी के बाद भारतीय पुलिस के समक्ष पूछताछ के दौरान उसकी ओर से किए गए खुलासों के आधार पर भारतीय गृह मंत्रीने दावा किया था कि आतंकवादी हमले में आतंकवादियों को पाकिस्तानी सरकार का समर्थन प्राप्त था। लेकिन भारतीय गृहमंत्रीके इस दावे को, पाकिस्तानी मंत्रीने अस्वीकार कर दिया, उन्होने दावा किया था कि भारतीय गृहमंत्रीकी टिप्पणी पाकिस्तान और उसकी जासूसी एजेंसी इंटर-सर्विसेज इंटेलीजेंस को बदनाम करने का प्रयास है।

अणुभट्टी प्रकरणी भ्रष्टाचारच्या आरोपाला सामोरे जात भारतीय पंतप्रधानांनी लढवलेल्या निवडणुकीत त्यांच्या व त्यांच्या पक्षाचा दारूण पराभव झाला. लोकसभेत आता विरोधीपाक्षत बसण्यासाठी पक्षाचे गटनेते म्हणून माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब थोरवे यांची निवड झाली…. अणुगेट प्रकरणामुळे, चौकशीकरिता समन्स मिळून कोर्टाची पायरी चढावे लागणारे डॉ योगेंद्र यादव हे भारताचे तिसरे प्रधानमंत्री ठरले आहेत

टेड स्माईल्स त्यांची निवडणूक जिंकून भारतभेटीवर आलेले असताना, त्यांनी मुंबईतील पंचतारांकित हॉटेल फोर-सीजनमधे अनेक राजकीय व उद्योग जगतातील व्यक्तींची सदिच्छा भेट घेतली. त्यांच्या अमेरिकेला परत गेल्यावर भारताच्या संबंधित दोन घटना घडल्या, पहिली घटना, भारतातील सत्तेतील घटक असलेल्या ऐका छोट्या पक्षाने, विजेतापूर येथील प्रस्तावित फ्रेंच अणुभट्टीला तीव्र विरोध दर्शविला आहे…. दुसरी घटना, अमेरिकेतील भारतीय वकिलातीत काम करणाऱ्या ऐका कर्मचार्याला शॉपलिफ्टिंगच्या आरोपाखाली अटक केली, कर्मचार्याचे नाव होते …… अजय खोब्रागडे.

युद्धात वीरगती मिळालेल्या सैन्यातल्या शहीद जवानांच्या विधवांना, कोरेगाव पार्क येथे लष्कराच्या जागेत बांधण्यात आलेल्या सुदर्शन टॉवरमधे, अजूनहि फ्ल्याट मिळालेला नाही आहे, खुशाबुची आईने अजूनही फ्ल्याट मिळेल, याची आशा ठेवली आहे…… .

वाङ्मयकथाविरंगुळा

प्रतिक्रिया

अत्रन्गि पाउस's picture

17 Mar 2015 - 8:33 pm | अत्रन्गि पाउस

एक उत्तम कथानक असूनही तुकड्या तुकड्यांनी समोर आल्यामुळे रंगलेल्या मैफिलीत राग न समजल्या सारखे वाटले ...
तथापि एक उत्तम लिखाण

सामान्य वाचक's picture

18 Mar 2015 - 9:42 am | सामान्य वाचक

पण एकंदरीत खूप छान कथानक
अजून काही लिहा . कथा छान फुलवता आहात

एस's picture

20 Mar 2015 - 6:37 pm | एस

जरा जास्त खुलवता आली असती. असो. पुलेशु.

प्रथम म्हात्रे's picture

17 Mar 2015 - 11:15 pm | प्रथम म्हात्रे

पुलेशु

बोका-ए-आझम's picture

18 Mar 2015 - 11:02 am | बोका-ए-आझम

अशी अचानक संपल्यामुळे थोडा हिरमोड झाला.

असंका's picture

18 Mar 2015 - 3:46 pm | असंका

+१

एकंदरीत कथा छानच.
नवीन कथेची वाट पहातोय.

२६/११ च्या तपास कामवरुन काहिशी
प्रेरित ही कथा होती.

पद्मावति's picture

26 Nov 2015 - 12:21 pm | पद्मावति

मस्तं!
पहिले दोन भाग आताच वाचले. आता सगळे भाग वाचायलाच हवे इतकी उत्कंठा वाढलीय.

काल आणी आज मिळुन सर्व भाग वाचुन काढले.. थरारक आणी बर्‍याच अभ्यासअंती केलेल लेखन आहे आणी नक्किच कौतुकास पात्र आहे.

मला अस वाटत कि ज्या प्रकारे हे लिहिले आहे, सर्व भाग एकापाठोपाठ वाचल तरच लिंक लागते बरोबर.

हो एकदम गुंगवलं लिखाणाने, एकत्र सर्व भाग वाचताना, तरीही हे भाग घाईघाईत लिहिले, असंही वाटलं. अजून फुलवता आले असते कदाचित.

मास्टरमाईन्ड's picture

10 Jan 2016 - 12:13 am | मास्टरमाईन्ड

या वर्षी काही कथा नाही कां?

मम्बाजी सर्वज्ञ's picture

29 Jan 2016 - 8:12 pm | मम्बाजी सर्वज्ञ

गोष्ट फार्रच भारी आहे, अजून लिहा, वाट बघतोय, पण वर सांगितल्या प्रमाणे खूप तुकडे झालेत.
महत्वाचे म्हणजे 'फ्ल्याश ब्याक' आणि वेग वेगळ्या घटना एकत्र आल्या कि गोंधळ उडतो, कनटीन्यूटी जाते वाचणार्याची.

बुद्धिबळाचा 'अमर' डाव आणि रंगतदार गोष्ट, दोन्हीत एकाच साम्य - बघणार्याला/वाचणार्याला समजून घेण्यात फार कष्ट करावे लागत नाहीत......