खुशबू (भाग ५)

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जनातलं, मनातलं
23 Feb 2015 - 7:25 pm

भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४

'अरे हरदीप आज नयी बाइक'

'हा पाजी, आज वो कनद्दा से आई सुसान, मेरे नाल आई, अपनी बाइकको ग्राउंड पे छोड, उपरसे अपनी टीशार्ट, जीन्स, सारे कपडे उतार कर ग्राउंड पे फेक देके, बोली, हरदीप- I am offering you ANYTHING you want !'

'तो तुने क्या किया'

'क्या करता पाजी, बाइक उठाके चला आया '

'अच्छा किया हरदीप, वैसेभी वो जीन्स तुझे फिट नही होती '

एकच हास्याचा धबधबा उसळला तिथे, 'प्रीतम तुम्ही सरदारजी असून, सरदारजीवरचे जोक्स सांगता ? ' खुशबू हसत हसत आश्चर्याने म्हणाली.
मागच्या आठवड्यात, वाझनि प्रीतमची आणि खुशाबुची ओळख करून दिल्यापासून, आजपर्यंत खुशाबुची बरीचशी भीड चेपली होती.
मागच्या आठवड्यात खुशाबुला सांगितलं गेल होत, तुझी पत्रकाराची नोकरी सांभाळून तुला, सांगण्यात येणारी कामं करायची आहेत. नोकरीच्या ठिकाणचे बॉस सहकारी, नातेवैकांना आई बाप नवरा बायको भाऊ बहिण मित्र परिचित, अगदी कोणालाही कळता कामा नये, या नवीन जबाबदारी बद्दल. तुमचा बुरखा फाटला तर मिलिटरी इंटेलिजन्स कोणतीही ओळख दाखवणार नव्हत. इंस्त्रक्शन प्रीतमसिंग देईल, तोच ह्यांडलर असणार आहे टास्क फोर्स चा , वाझ हे मेंटोर म्हणून मार्गदर्शन करतील. … सध्यातरी तिला रुकी म्हणून साध्याच असाइनमेंट होत्या, पत्रकारिता करता करता, तीला 'हरकत ऐ इत्तेहादुल मोमीन ', या सेमी राजकीय- सेमी सामाजिक संघटनेबाबत जास्तीत जास्त माहितीच संकलन करून, त्यावर पृथ्करण करून प्रीतमला ह्यांडओवर करायची…

----------------------------------------------------------------------------------------------------
१० वर्षापूर्वी

दिवसा भूमी म्हणजे कच्छ तप्त वाळवंट, आकाश म्हणजे रखरखित सूर्याचा गोळा, म्हणून रात्रीचा बी एस एफ पासून छुपा प्रवास, पोटात भुकेचा आगडोंब, डोक्यात घणाचे घाव, कोणत्याही क्षणी कोसळून इथेच संपू, प्रत्येक पाऊल उचलून पुढे टाकताना त्याला नरकाचा प्रत्यय मिळत होता, आणि शरीर किती वेदना सहु शकतं, तरीही जीव जात नाही, हे अनुभवून आश्चर्यचकित सुद्धा होत होता. जगलो वाचलो तर त्यांचा "सूड" घ्यायचाच, आणी तेवढ्या करताच त्याला आता जगायचं होत, सध्या चालायचं होत, तर कधी उंटावरून पुढे जायचं होत … मीरपुराकडे…. आणि भेटायचं होत "चाचाजान ला", …… सर्वांचाच चाचा होता तो तिथे. चाचाजानच ऐक फेवरिट वाक्य त्याच्या कानांवर इथून पुढे नेहमी पडणार होत… 'सौ सालकी इबादतसे ज्यादा, चार दिन के जिहादकी, आज इस्लामको जरुरत है '

जबिउद्दिन, ऐक फिटर, त्यादिवशी तो घराबाहेर पडला, आपल्या प्रियतमेला भेटण्यासाठी , त्याचं ग्यारेज… डिप्लोमा नंतर उमेद्वार्या करतानाच ग्यारेज… नेहमी प्रमाणे आज सुद्धा अनेक गाड्या त्याची वाट पाहत असतील… ग्रीस ऑईल पाना …. अनेक गोष्टींनी डोक्यात फेर धरला होता …
ग्यारेजचे मालक रसिकभाईनी त्याच्या कळकट जांभळ्या डंगरिची बाही पकडून आतमधे नेलं, सांगितलं 'जबी आज गावात वातावरण गरम आहे, लफडा होऊ शकतो, इथे थांबू नको, मागच्या दाराने लवकर निघ… '
जबी झपाझप सायकलवर पेडल मारत घराकड निघाला, वस्तीजवळ पोहोचण्या आधी असलेली बेकारी जळताना पाहून, शंकेची पाल मनात चुकचुकली …
जबीने जेव्हा गल्लीच्या दिशेने पाहिलं, त्याच्या छातीत धस्स झालं, धुराचे लोट तिथून सुद्धा यायला सुरवात झाली होती … तेवढ्यात कोणीतरी ओरडलेल त्याने ऐकलं, अरे वो देखो उधर उपरवाले रोड पर … और ऐक लंबी दाढी … पकडो उसको … बचके नही जाना चाहिये ….
लटपटत्या हातापायाने धडपडत जबीने सायकल उलट्या दिशेने फिरवली……. जीव खाऊन दामटायला सुरवात केली… दोन दिवस जबी लपून छपून राहिला,
नंतर माती वाहून नेणाऱ्या ट्रकच्या मागे लपून तो … ओळखीच्या इमामाकडे उतरला, बातम्यातून त्याला कळाल … मागे उरलीय फक्त राख ….
सिमीचा ऐक कार्यकर्ता त्याला 'सरहद के पार' घेऊन जायला तयार झाला…

वाङ्मयकथाविरंगुळा

प्रतिक्रिया

बहुगुणी's picture

23 Feb 2015 - 11:42 pm | बहुगुणी

सगळे भाग वाचले, येऊ द्या आणखी...