खुशबू (भाग १६)

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जनातलं, मनातलं
12 Mar 2015 - 3:31 pm

भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ | भाग ६ | भाग ७ | भाग ८| भाग ९| भाग १०| भाग ११| भाग १२
भाग १३ | भाग १४ | भाग १५

अमोनोराच्या मॉलमधे फिरताना फरीदाचे डोळे फिरू लागले.. अन काही क्षणात ते आश्चर्याने भरून देखिल गेले. सगळीकडे गर्दीच गर्दी माणसांची, दुकानांची ही ! जसं की काही घडलंय, घडणार आहे आणि त्यासाठी हे लोक गोळा झालेत. जिथे नजर टाकावी तिथे जिवंत गजबज. प्रत्येकाचं काहीतरी चाललंय. गर्दीतल्या इतरांशी सुसंगत किंवा विसंगत कसंही! .. कुठेतरी मधेच गाणी वाजतायत. या सगळ्याचा मिळून एक आवाज तयार झाल्यासारखा वाटतोय.. !!! तर फातिमा कौतुकाने हळवी होऊन त्या भरगच्च रोषणायीकड पाहत होती. खुशबून कालच सांगितलं होत, तिच्या ऑफिसतर्फे कुटुंबियांसाठी अमोनोराच्या मॉलमधल्या 'करीम्स करी' या रेस्टोरंटमधे बुफे लंचचे पासेस आणि त्या दिवशी दुपारच्या तिथल्याच मल्टीप्लेक्समधल्या शाहरुख आणि दीपिकाच्या, चित्रपटची तिकिटे दिली होती, आपल्याला सोबत म्हणून खुशाबुने फरीदामौसीला घेऊन येण्यास सुचवले होते, नव्हे तसा आग्रहच केला होता. जेवण झाल्यावर स्क्रीन ३ मधे, आपापल्या खुर्चीवर बसल्यावर, खुशाबुने तिच्या आईच्या कानात हळूच सांगितले की तुम्ही दोघी सिनेमा बघा, मी १५ मिनिटात माझ एक ऑफिसच काम करून आले…
-------------------------------------------------------------------------------

ज्या घरात फरीदा राहत असे, त्याचं दार खुशाबुच्या घरामागच्या बाजूच्या खिडकीजवळ होत , आणि स्वतःच्या विसरभोळ्या स्वभावामुळे, बाहेर जाताना तिच्या खोलीच्या दारावरच्या कुलुपाची किल्ली फरीदा, आपली मैत्रीण फातिमाच्या घराच्या खिडकीच्या गजामधून, दाराच्या खाचेत ठेवत असे… खुशबू ती किल्ली घेऊन, तिच्या घरात आली, पाठीमागे दरवाजा लावून घेतला, तसं बघितलं तर तिथे फार काही तिला उचकापाचक नाही करावी लागली, कपडे वैगरे ठेवण्यासाठी एक कपाट, झोपण्यासाठी जुनी कॉट, आरसा असलेलं वेलबुट्टी नक्षीच टेबल, भांडीकुंडी, छोटा टी वी, जुना टू इन वन, काही क्यासेटस …. एवढ्याश्या सामानात, ती क्यासेट सापडायला कितीसा वेळ लागणार होता … सर्व क्यासेटस दोन्ही बाजूने थोड्या थोड्या ऐकताना तीला हवी असलेली क्यासेट सापडली. खुशाबुने ती साइड पूर्णपणे रीवाइंड करून घेतली, नंतर आपल्या पर्स मधून, एक केबल बाहेर काढली, त्या केबलच्या दोन्ही टोकांवर ३.५ मिमी चे मेल कनेक्टर होते, केबलच्या ऐका कनेक्टरला तीने टू इन वन च्या हेडफोन पोर्टमधे खुपसले, दुसरे टोक तीने आपल्याजवळच्या सोनीच्या पोर्टबल रेकॉर्डरच्या ऑडीओ इन मधे घातले, रेकॉर्डर चालू केला, टू इन वन चालू केला…तेव्हड्यात तिचं लक्ष कपाटात ठेवलेल्या फोटोअल्बमकडे गेलं…..
-------------------------------------------------------------------------------

खुशबू अमनोराच्या मल्टीप्लेक्समधे परत आली, तेव्हा तिची अम्मी व फरीदा दोघीही इंटरवल झाला तरी आपापल्या खुर्चीतच बसून होत्या, खुशाबुला बघून, फातिमाने तिच्यावर प्रश्नांची सरबत्तीच सुरु केली, 'बेटी तुम कहा गयी थी, कितनी देर से तुम्हारी राह देख रही हु ?'…
'अम्मी बोला था न, १०-१५ मिनिटमे औंगी '… 'नही बेटा, इतनी थंडी हवा है यहां, हम दोनोको 'वहा' जाना था, बहुत देरसे रोकके रखी है … '
खुशबू ओशाळली, त्या दोघींना बिचार्यांना, मल्टीप्लेक्स मॉल अस वातावरण नवखं असल्यामुळे, आपल्या मुलीच्या मदतीशिवाय, टॉयलेटला टाळावे लागले याची तिला जाणीव झाली. खुशबू त्यांना तिकडून परत आणे पर्यंत चित्रपट परत सुरु झाला होता…
-------------------------------------------------------------------------------
प्रीतम आपण ते वॉईसस्याम्पल चंडीगढच्या प्रयोगशाळेत पाठवणार आहोत का ? ….
नाही खुशबू, आपण ते पुण्यातल्या आपल्याच लोकांकडून तपासून घेत आहोत, इनफ्याक्ट आपण आत्ता तिकडेच निघालो आहोत…असे म्हणून प्रीतमसिंगने आपली कार, खराडी-हडपसररोड वरील रयाडीसन ब्लू समोरील शेवर्ले कारडीलरच्या बाजूच्या लेनमधल्या असलेल्या फोरेन्सिक ल्याबच्या कम्पाउंड मधे पार्क केली. ग्राउंडफ्लोरवर ऑडीओल्याबच्या दिशेने त्याची पावले झपाझप पडू लागली, खुशबू मागोमाग चालू लागली.
ऑडीओल्याब म्हणजे एखाद्या संगीतकाराचा स्टुडीओसारखाच होता, काचेच्या ४ भिंतीत बंदिस्त वेगवेगळी इलेक्ट्रोनिक उपकरणे, स्क्रीनवर नाचणाऱ्या साईनवेव्हज्, आतमधे खुशाबुला दोन व्यक्ती हेडफोन लाऊन बसलेल्या होत्या, पिवळ्या पट्याचं स्वेटर घातलेली व्यक्ती पाठमोरी बसलेली होती तर उपकरणांचा पसारा असलेल्या त्या टेबलाच्या विरुध्द बाजूला पोरसवदा व्यक्ती, ल्याबच्या दरवाजाकड तोंड करून बसली होती. प्रीतमसिंगला पाहताच तो पोरसवदा माणूस हेडफोन बाजूला काढून, दरवाज्याच्या दिशेने स्मितहास्य देत आला, दरवाजा साधारण एक दीड फुट उघडून तो प्रीतमसिंगला म्हणाला, 'हाय'…
प्रीतमसिंगसुद्धा मान हलवत स्माईल देऊन म्हणाला 'हाय बिस्वास, क्या है फिर तुम्हारा रिपोर्ट ?'

'प्रीतम, मैने तो सुबहही सिस्टीम रिसल्ट प्रिंट कराके रखा है, अभी हमारे हेड दोराबजी सर रिजल्ट को अपने कानोसे डबलचेक कर रहे है, तुम्हे तो पता है ही, उसके बाद वो तुम्हे रिपोर्ट देंगे'
तो पर्यंत दोराबजीनी हेडफोन बाजूला काढून ठेवला, विश्वास त्यांच्या कानात काहीतरी कुजबुजला … त्यांनी होकारार्थी मान हलवली, मग बिस्वासने सुद्धा प्रीतमकडे पाहून होकारार्थी मान हलवली. प्रीतम समजला, खुशबूने दिलेली डायलॉग टेप आणि सौदी वरून कॉल मधला आवाज, हे दोन्ही एकाच व्यक्तीचे होते. दोराबजीनां थ्यांक्स म्हणावं म्हणून प्रीतम व खुशबू काचेच्या भिंतीच्या रूममधे आले, त्यांच्या पावलांचा आवाज ऐकून, दोराबजीनी डोळ्यावरचा काळा गॉगल काढून शर्टला अडकवला, प्रीतमच्या डोक्यावरून अर्धाफुट वर स्थिर नजर ठेवत, त्यांनी शेकह्यांडसाठी हात पुढे केला, तेव्हा खुशाबुचे लक्ष, दोराबजीच्यां खुर्चीच्या पायाशी ठेवलेल्या फोल्डेबल पांढर्या छडीने वेधून घेतलं ……
-------------------------------------------------------------------------------
सौदीत एका फ्रुट इम्पोर्ट कंपनीत मुलाखतीसाठी गर्दी झाली होती. ज्या पदासाठी मुलाखत द्यायची होती, त्याच पदासाठी जवळपास १५-२० उमेदवार आलेले. मुलाखतीसाठी एक अघोषित अट होती, उमेदवार भारतीय उपखंडातले असावे.....कारण मुलाखतकर्ता होता लियाक़त अली…
एक उमेदवार नुकताच मुलाखत देऊन बाहेर आला होता, मुलाखत दिल्यावर तो तडक आपल्या हॉटेलवर गेला, त्याने आपला ल्यापटॉप सुरु केला, आणि त्याने ब्राउसरमधे साईट उघडली, 'सेंटर फॉर साउथ ऐशियन इकोनोमीक स्टडी ग्रुप' ची, युसरनेम पासवर्ड वैगरे सोपस्कार आटोपून, त्याने आपला माउस वळवला 'मिडिया अपलोड' बटणावर, तिथे क्लिक झाल्यावर 'फाईल अड्रेस, अपलोड बटन' असलेला चितपरिचित पॉपअप आल्यावर, त्याने मुलाखती दरम्यान शर्टच्या खिशाला लावलेलं जाड फौंटनपेन बाहेर काढलं, टोपणाला धरून खसकन पेनाच धड उपसून वेगळ केलं, टोपणाच्या टोकाला आता यु एस बी पोर्ट दिसू लागलं, ते त्यान आपला ल्यापटॉपला जोडलं, त्यातले सगळे फोटो त्याने साईटवर अपलोड केले ….
-------------------------------------------------------------------------------
खराडी-हडपसररोड वरील रयाडीसन ब्लू समोरील शेवर्ले कारडीलरच्या बाजूच्या लेनमधल्या असलेल्या फोरेन्सिक ल्याबच्या फर्स्टफ्लोर वर विडीओल्याबमधे महावीर शहा, सकाळपासून खुशबूने दिलेल्या फोटोच्या स्कानवरून इमेज सुपर इम्पोजीशनच काम करत होता, मागच्या सर्व अनुभवाच्या जोरावर सलग ९ तास तो मान मोडून हे अवघड काम करत होता. बेसिकली त्याला एका व्यक्तीच्या साधारण १२-१३ वर्ष जुन्या कॉलेजच्या फोटोवरून, तो आज कसा दिसत असेल, अस संगणकाच्या मदतीने, शोधून काढायाचं होत…

-------------------------------------------------------------------------------
'सर, त्याचा इंटरसेप्टेड कॉल वॉईस स्यम्पल, आणि त्याचे फोटो इम्पोजीशन, या दोघांच्या अनालीसीसवर, आमच्या दोघांच्या मते, अबू फैसल म्हणजेच, लियाक़त अली म्हणजेच भारतीय नागरिक जबिउद्दिन अत्तारी आहे, आपण त्याचं भारतात एक्स्ट्राडीशन केलं पाहिजे' प्रीतमसिंग पिल्लैना कॉन्फ़रन्स कॉलवर सांगत होता.

'कितना सर्टन्टी के साथ तुम ये बोल राहे हो ?' पिल्लैचां त्यावर प्रश्न…

'सर साधारण ६६% सर्टन आहोत'…प्रीतमसिंग बोलला

'हम गृहमंत्रीके पास और वो प्रधानमंत्रीके पास, ६६% सर्टन्टी कोनसा मुह लेके जायेंगे ?, बहुत कम है ये, खुशबू तुमभी यही सोचथि हौ ?'… पिल्लै बोलले.

'सर मे आय स्पीक फ्रॉम माय हार्ट … '

'येस'…

'सर आप लोगोको, अच्छा लगे इसलिये हम लोग १०० % सर्टन है, ऐसा नही कह सकते, लेकिन मुझे तहेदिलसे लगता है, की ये जानकारी १०० % सर्टन है'

वाङ्मयकथाविरंगुळा

प्रतिक्रिया

एस's picture

12 Mar 2015 - 4:08 pm | एस

गुड. पुभाप्र.

सामान्य वाचक's picture

12 Mar 2015 - 4:26 pm | सामान्य वाचक

आता सगळे भाग संपले की परत एकदा सगळे एकदम वाचून काढणार

मास्टरमाईन्ड's picture

12 Mar 2015 - 5:45 pm | मास्टरमाईन्ड

पु. भा. प्र.

बाबा पाटील's picture

13 Mar 2015 - 1:42 pm | बाबा पाटील

शक्यतो सविस्तर पत्ते टाळावेत,राष्ट्रीय सुरेक्षेच्या दृष्टीने ते चुकीचे ठरेल.काल्पनिक कथा काल्पनिकच ठेवाव्यात.