खुशबू (भाग १७)

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जनातलं, मनातलं
13 Mar 2015 - 7:15 pm

भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ | भाग ६ | भाग ७ | भाग ८| भाग ९| भाग १०| भाग ११| भाग १२
भाग १३ | भाग १४ | भाग १५ | भाग १६

'भारतीय नागरिक जबिउद्दिन अत्तारीचं भारतात एक्स्ट्राडीशन केलं पाहिजे' हे सुरक्षायंत्रणेकडून ऐकून पंतप्रधान विचारात पडले, भारताचे इराणबरोबरचे पारंपारिक संबध बघता, सौदी आपल्या विनंतीला मुळीच मान देणार नाही, या शक्यतेची ते पडताळणी मनातल्या मनात करू लागले, भारतातल्या काही जातीय दंग्यामुले आंतरराष्ट्रीय मुस्लिम जगतात उमटणार्या तरंगाची सुद्धा त्यांनी मनातल्या मनात शक्यता जोखली होती, शेवटी भारताचे सौदीतले राजदूत डॉ साजिद हमीद, यांच्याबरोबर सिक्युअर हॉट लाईनवर चर्चा केल्यावर, साजिद सुद्धा तसंच आकलन मानत होते याची पुष्टी झाली होती, शिवाय आणखी एक शक्यता डॉ साजिद हमीद यांनी लक्षात आणून दिली की 'भारताने डायरेक्ट सौदीकडे संपर्क साधला आणि पर्सन ऑफ इन्टरेस्ट ची माहिती मागवली तर, कदाचित पाकिस्तानलासुद्धा भनक लागू शकत होती, म्हणून सौदीवर दबाव टाकू शकेल अश्या एका सिनेटरच नाव, त्यांनी पंतप्रधानांना सुचवलं होत.' मग विचाराअंती पंतप्रधानांनी अमेरिकेतील भारतीय दूतावासाचा सिक्युअर हॉट लाईन नंबर डायल केला.

-------------------------------------------------

६० मैल प्रती तास वेगाने जाणाऱ्या आपल्या प्रशस्त लिंकन लिमोसिनमधे बसून थिओडर स्माइल्स उर्फ टेड जॅक्सनविलेच्या भर गर्दीतही आपली सत्ता अन अधिकार अनुभवीत होता, एकतर गाडीची मूळ लांबी जास्त असल्यानं, बसणार्याला पाय सहज ताणता येत असे, त्यातच सीटची पाठ मागे नेण्याची व्यवस्था असल्याने आणखीनच आरामशीर स्थिती धारण करता यायची, विशेषतः इंटर्न मोनिका सोबत असताना, गाडीला टीन्टेड काचा असल्यामुळे बाहेरच्यांना आतलं काही दिसू शकत नसायचं. पण आज त्याच्या शेजारी त्याचा मदतनीस हुलिओ फर्नांडेझ बसला होता. आणि ड्रायवर हेसुस रहदारी मधून गाडी चालवत त्याला घराकडे नेत होता. हुलिओने निघताना त्याला नेहमीचा खुराक हाल्फ़ पौंड मिडीअम रेअर ह्यामबर्गर विथ बेकन, चेडर अंड पिकल आणि ४ ऑउन्स डॉ पेप्पर कोला सादर केला होता. हुलिओ येणाऱ्या निवडनुक प्रचाराच्या कॅम्पेनच्या प्रगतीची माहिती देत होता. या वेळचा मतदारसंघातला त्याचा लोकप्रियता निर्देशांक नजीकच्या स्पर्धकापासून फक्त ५ % पुढे होता. दोन महिन्यांपूर्वी भारताकडून त्याला (म्हणजे सकृत दर्शनी एका पब्लिक लिमिटेड अमेरिकन कंपनीला) दोन पैकी फक्त ऐका अणुभट्टीचंच कॉन्ट्राक्ट मिळालं होत, भारतीय पंतप्रधानांनी भविष्यात अमेरिकेकडून ब्लाकमेल होऊ नये म्हणून, दुसर्या अणुभट्टीचं कॉन्ट्राक्ट फ्रेंचांना दिलं होतं. त्यामुळे तो मनातून भारतावर थोडासा खार खाऊन होता. पण निदान या अणुभट्टीचं कॉन्ट्राक्टमुळे त्याच्या निवडनुक प्रचाराच्या कॅम्पेनच्या रणनीतीमधे 'मतदारसंघात येत्या वर्षभरात २००० प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती' या मुद्द्यावर जोर दिला गेला होता, त्यामुळेच ५ % तरी काठावर जास्त लोकप्रियता त्याला मिळाली होती…. प्रचार मोहिमे साठी वेळ कमी होता पण आज संध्याकाळी त्याच्या भेटीच्यासाठी भारताचा एक कौन्सुलेट ऑफिसर येणार होता, काय बरं विचित्र अन अवघड नाव होत ते … हां आठवलं … अजय खोब्रागडे …
-------------------------------------------------
"सिनेटर दहशतवादा विरुद्धच्या लढाईत भारतीय जनतेच्या प्रयत्नांना अमेरिकी जनता पूर्ण सहाय्य करेल, असा आमच्या पंतप्रधानांनी विश्वास व्यक्त केला आहे" खोब्रागडे म्हणाले.

'ऐजे (अजय) मुला, तुला या खिडकीतून सभोवताली पसरलेली अमेरिका दिसतेय का ? किती माणसं इथे राहतात जगतात हे दिसतंय का तुला ? हे लोक स्वतंत्र लोकशाही दहशतवादविरोधी लढा किंवा कशाबद्दलही काय विचार करतात याचाशी मला काहीही कर्तव्य नाही, त्यांच्या गेलेल्या पिढ्या आणि येणाऱ्या पिढ्या काय विचार करतील, याच्याशी मला काडीचही देणघेण का असावं ?' टेड म्हणाला.
'आपले दोन्ही देश लोकशाहीत विश्वास आसलेल्या जनतेची आशा आहेत....' इति खोब्रागडे
'अरे देवा, तु काय वेड पांघरतो का काय ?, मला खरंच कळत नाही, मला माझ्या फायद्याला खार लावणाऱ्या पंतप्रधानाला मदत करण्याचा विचार मी का करावा असं तुम्हाला वाटतं ? हा आता तुमचं सरकार माझ्या प्रचारमोहिमेत बेनावी १० दशलक्ष डॉलरची रोख मदत देणार असेल तर गोष्ट वेगळी हं … नाहीतर तुझ्यापाठी जो दरवाजा आहे, तिथून तू सुमडीत निघून जावं, अशी मी अपेक्षा माझ्या जनतेच्या वतीने व्यक्त करतो, नो ऑफेंस पण नथिंग पर्सनल जस्ट बीसनेस… '
-------------------------------------------------
थिओडर स्माइल्स उर्फ टेड, गोर्यांलोकसंखेचा कारखाना असलेल्या दक्षिण अमेरिकेतील सिनेटर, त्याचं किंचित दक्षिणी हेल काढून नम्रतापूर्वक बोलण समोरच्यावर दबाव टाकायला पुरेसं असे, त्याला उघडपणे काही बोल लावला तर टेक्सासच्या न्यायविभागाचे कान उंचावले जायचे, लोन-स्टारच्या सन्मानाला ठेच लागायची. ज्याच्या आदेशावर पेट्रोउद्योग जगातल्या घडामोडी घडायच्या, ज्याच्या बुद्धीने वॉशिंग्टन डी सी मधल्या कॅपिटॉलहिलवर काळ्या तेलाची काळी कारस्थानं रचली जायची, मध्यपूर्वेत अनेक छोट्या देशांची भवितव्य ज्याच्या विचारांनी गढूळलं जायचं असा पातळयंत्री माणूस, पण सारकाही करून नामानिराळा, कोणालाही त्याचा संशय येणं शक्य नव्हत, कोणीही त्याच्यावर उघडपणे टीका करू शकत नव्ह, त्यानं स्वतःभोवती असं वलय निर्माण केलं होतं कि त्याच्याबद्दल कोणी ब्र काढला तरी, दुसर्यादिवशी पहाटे शेजार्यांशी बोलताना त्या सर्वसामान्य व्यक्तीची बोबडी वळलेली असायची, कारण आदल्या रात्री अंगणात केकेके ने जाळलेल्या क्रॉसच्या आठवणीने तो रात्रभर झोपलेला नसायचा, किंवा ब्र काढणारा थोडी मोठी व्यक्ती असेल तर टेक्सासच्या न्यायविभागाची वक्र नजर त्याव्यक्तीवर वळलेली असायची.
अश्या माणसाने नकार देताच, एखादा उठून निमुटपणे गेला असता, पण दुसर्यादिवशी खोब्रागडे तयारीनिशी आले होते, त्यांनी टेडला कल्पना दिली होती की जर सौदिना फोन केला गेला नाही तर, कदाचित भारतातील पर्यावरण मंत्रालय (जे पंतप्रधानांच्या अख्यत्यारीत होते), त्यांना कदाचित या अणुप्रकल्पाच्या नव्याने प्रकाशात आलेल्या काही बाबींचा पुनर्विचार करावा लागेल, त्यामुळे हे विशिष्ठ कॉनट्राक्ट १-२ वर्षासाठी थंड्या बस्त्यात जाऊ शकते. त्यामुळे तुमच्या प्रचारमोहिमेतील रोजगारनिर्मितीच्या मुद्द्याची हवाच निघून जाइल अशी आपुलकीयुक्त 'काळजी' खोब्रागडेनी व्यक्त केली होती.
-------------------------------------------------

जॅक्सनविले येथील टेकाडाच्या माथ्यावर लवेंडर नावाच्या प्रशस्त घराची इमारत उभी होती, जाडजूड विटांच्या भिंतीमधे नाजूक नक्षीकामानं सजवलेल्या प्रशस्त खिडक्या, हवा अन प्रकाश भरपूर प्रमाणात आत ओतत होत्या. छताजवळच्या उंचीवरच्या खिडक्या रंगीत काचचित्रांनी मढवलेल्या होत्या, उगवत्या कोवळ्या उन्हात व मावळत्या संधीप्रकाशात, त्या उंच खिडक्यातून आत डोकावणारा स्वप्नील धुसर प्रकाश घराला चॅपेलमधल्या पावित्र्यात न्हाऊ घालत असायच्या, अजय खोब्रागडे आत शिरताच कोरीव काम केलेल्या डेस्कमागून टेडच्या गीड्ड्या कृतीची तरंगती हालचाल झाली, त्यांचा मांसल विस्तार जणू त्यांच्या वादातीत प्रतिष्ठेच्या मर्यादेमुळेच केवळ अडून राहिला का काय, अशी पाहणार्याला शंका यायची. ओ…. ऐजे स्वागत आहे ? ते हसून म्हणाले, 'ये ये, आत बस'. अजय बसला. त्याच्या तोंडून आपेक्षित विनवणी ऐकण्याच्या तयारीत टेड बोटं एकमेकात गुंतवून, सिगार तोंडात घोळवून, वाट पाहत बसून राहिले. जेव्हा काही क्षणांनंतरही कसलीच विनवणी बाहेर पडली नाही तेव्हा टेडने घसा खाकरला. 'दहशतवादच्या समूळ बिमोडासाठी मला प्रथमपासून किती आस्था आहे ते तुला माहीतच आहे. ' सिगारचा झुरका घेऊन पुढ म्हणाले 'त्यामुळे काल जो दुर्दैवी प्रकार घडला…… त्याबाद्दल मी दुःख वैगरे व्यक्त करणं ……. मला वाटतं अनावश्यक ठरेल '

'अगदी अगदी' खोब्रागडे उत्तरले.

'हेही वेगळ सांगायाला नको की मी भारताला मदतीचा नकार दिला नव्हता तर मी तटस्थ राहिलो होतो' पुढचा झुरका घेऊन टेड म्हणाला.

'मान्य आहे मला' … खोब्रागडे म्हणाले, त्यांची नजर विनम्रपणे टेडवर खिळली होती.

"मला आता या निवडणूक कॅम्पेनच्या धामधुमीत, सौदिंना फोन करण्यावाचून, तुम्ही काही आता काही पर्यायचं शिल्लक ठेवला नाही, तुमच्या मनात माझ्याबद्दल कडवटपणा ठेवू नका बुवा आता " असं हसत हसत टेड म्हणाला परंतु त्याच्या मनाच्या ऐका कोपर्यात मात्र विचार करत होता, 'या निवडणुकानंतर निवांतपणा मिळाल्यावर, या करी-सकिंग, इलेफंट-रायडींग, स्नेक-चार्मिंग ब्राऊन-निगर बास्टर्ड-कौन्सुलेट ऑफिसरला चांगलाच धडा शिकवायला हवा, त्यासाठीच्या न्यायविभागातल्या एकदोन लोकांची नावे त्याच्या समोर चमकून गेली … '
पण सध्या सौदिना भारताच्याबाजूने फोनवरून हग्या-दम भरायची वेळ आली होती….
-------------------------------------------------

वाङ्मयकथाविरंगुळा

प्रतिक्रिया

सामान्य वाचक's picture

13 Mar 2015 - 8:50 pm | सामान्य वाचक

छान चालली आहे कथा

मास्टरमाईन्ड's picture

14 Mar 2015 - 4:48 pm | मास्टरमाईन्ड

पु.भा.प्र.

वाचनीय आहे. हिंदीतून मराठीत भाषांतर करताना मूळ भाषेचा प्रभाव जाणवू देऊ नये, अन्यथा वाचकांना वाक्योवाक्यी ठेच लागत राहते. :-)

हे कुठल्याही लेखाचे कथेचे कादंबरीचे भाषांतर नाही, तरीही आपणास विनंती आहे कि आपल्या निदर्शनात असे काही साहित्य आलेले असल्यास, त्याचा रेफ लिंक जरूर मला द्या.

वरील वाक्य कृपया अशा पद्धतीने वाचावे:

"वाचनीय आहे. आधी हिंदीत लिहून मग मराठीत भाषांतर करताना मूळ भाषेचा प्रभाव जाणवू देऊ नये, अन्यथा वाचकांना वाक्योवाक्यी ठेच लागत राहते. :-)"

त्याचबरोबर शेवटची स्माइलीही लक्षात घ्यावी म्हणजे मला काय म्हणायचे आहे ते लक्षात येईल.

ऒह, माझ्या गैरसमजाबद्दल मला माफ करा,
मराठी मातृभाषा असूनही, माझी लेखी मराठी गन्डलेली आहे, याची मला कल्पना आहे.
:)