खुशबू (भाग ४)

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जनातलं, मनातलं
20 Feb 2015 - 5:11 pm

भाग १ | भाग २ | भाग ३

'मुस्लिम व भारतनिष्ठा याबाबत तुझं काय मत आहे मुली ?'…

कॉफीचा घुटका घेता घेता अडखळत ती म्हणाली 'एक्सक्यूज मी … ?' रागाची ऐक सूक्ष्म छटा तिच्या चेहेर्यावरती उमटून गेली …
'सर माझ्या मुस्लिम असण्याबद्दल, हा टॉन्ट होता का ?'

'अजिबात नाही पोरी, तुला माहित नसेल, पण तुझ्या बापाला जवळून ओळखायचो मी, ऐक सच्चा सपूत होता तो मातीचा'

'बर मग, मी ऐकतेय, पुढे बोला', तिच्या कपाळावरची नस अजूनही पूर्णपणे तडतडायची थांबली नव्हती.

'मला कल्पना आहे, काही काही लोकांच्यात वावरताना, तुला यामागेही टोमणे ऐकावे लागले असणार, मला हेही माहिती आहे, मागच्या दंगलीच्यावेळी तू, तुझी अम्मा कुठल्या दिव्यातून गेल्या असाल', तिच्या डोळ्यात आताशा पाणी येवू लागलं, पाणी कसलं, शब्दच होते ते तीचे ? तोंडावाटे येण्याचं ते बिचारे विसरूनच गेले होते जणू. 'खुशबू, लाईफबद्दल तुझ्या काय अपेक्षा आहेत ?'

आतापर्यंत बर्यापैकी सावरत ती म्हणाली, 'सर, खर सांगू, माझ्या अम्मीकडे रोज बघते, तिला सतत त्या दिवसांची आठवण होतना, तिच्या डोळ्यात नेहमी त्या रात्रीचे ढग काळवंडून दाटून आलेले बघते, तिच्या दचकण्यात त्या दृशांच्या विजा कडाडताना दिसतात मला, तिच्या आवळलेल्या मुठी, मनात खदखदलेल्या, दुनियेची राखरांगोळी करू शकणाऱ्या तळतळाटा बद्दल ओरडून सांगत असतात मला. मरणाशिवाय तिची या यातनांतून सुटका नाही याची जाणीव आहे मला,…
तिच्या अश्या परिस्थितीकडे पाहून सर, मी स्वतःला वचन दिलंय …. नाही, आपण अस तीळातीळाने मारायचं नाही! का मारायचं ? आपली काय चूक आहे ? परिस्थितीच आव्हान स्विकारून, जीवनाला, माझ्या सर्वशक्तीनिशी सामोरी जाईल, लोकांच्या टॉन्टकडे लक्ष देणार नाही, तसल्यांच्या वागण्याला धूप घालणार नाही… कुठल्याही परिस्थितीत मी डिसकरेज होणार नाही. स्वतंत्रपणे माझ लाइफ़ मी जगेन, अगर गर्दिशमें होंगे तारे, तब्भी इंशाल्ला एकटी जगेन …… और अगर लोगोंका साथ मिला … तो काबिले-ऐ-दिदार जगेन … '

'मुली, मी तुला देशाकार्य करायला सांगितलं, तर करशील का ? नाही म्हटलीस तरी मी नकार समजू शकेन'

'काही मुठभर धर्मांध लोकांमुळे सगळ्या देशाला शत्रू समजणारी मी नव्हे, आणी माझ्या वडिलांप्रमाणे मी फौजी नाही, मी काय मदत करणार देशाकार्यात'

'देशाकार्य करण्यासाठी फक्त फौजी-व्हायचीच गरज नसते, दुसर्या प्रकारे तू ते काम करू शकतेस '

'फक्त 'या बेकारीचे मालक', एवढच कार्यक्षेत्र नसावं, बहुदा तुमचं … '

'माझ्या जीवनकार्याचे क्षेत्र, सर्वस्वी हि बेकारीच आहे… असंच आणि एवढंच, याक्षणी मी जगाला सांगू शकतो,… '

'ठीक आहे सर, मी तयार आहे'

'पण तू माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही पोरी … '

'सर तुमच्या मनात माझ्याबद्दल जराही किंतुपरंतु असती, तर तुम्ही हा प्रश्न विचारलाच नसता '

'जाताना, कौन्टरवरून तुझ्यासाठी मावा केक घेऊन जा, माय ट्रीट… कॅम्पमधे अशी कॉफी आणि मावा केक कुठेच मिळणार नाही तुला ! '

'बाय वाझ सर'

'टेक केअर खुशबू बेटी'
---------------------------------------------------

आपल्या मेंदूवर चढलेले मीरेच्या नशेचे एक एक थर साठू लागलेत असं अमरला वाटत होतं. त्याला मीरेसोबतचा एक एक प्रसंग आठवत होता. तिची ती खोडकर नजर...तिचे ते गोड हास्य...तिचा त्याच्या हाताला मुद्दाम होणारा स्पर्श...पहिल्यांदा पुस्तक देताना झालेल्या स्पर्शानंतर, आपल्या या ३५ वर्षाच्या सडाफटिंग आयुष्यात असा सौंदर्यवान हाताचा स्पर्श कितीवेळा अनुभवला होता ? कधीच नाही … आणि आज एवढा सुंदर सहवास लाभतोय …. याचा तो विचार करत होता. खरतर तिच्या सायबर सिक्युरिटीच्या शैक्षणिक प्रोजेक्टला खरा आकार आणून देण्याची कामं तोच करत होता. तो ही कामं इतक्या आपलेपणांन आणि आपसूकपणे करीत होता की त्याला हे लवकर लक्षात आलेच नाही. आणि ही सर्व कामें त्याने स्वत:च आपल्या अंगावर ओढवून घेतली होती. त्यातला गुप्त हेतू हा की त्या निमित्ताने तो तिच्या जास्तीत जास्त सानिध्यात राहील. तिने कधीही स्वत:हून त्याला कोणतेही काम सांगितले नव्हते. फक्त तिने ती कामं आपण स्वत:होऊन आपल्या अंगावर ओढवून घेण्यास पोषक वातावरण तयार केले होते.… एवढ की आपण सायबर सिक्युरिटीच्या क्षेत्रात किती डॉन माणूस आहोत हे दाखवण्यासाठी … तीला त्याने ह्यांडस-ऑन सिक्युरिटी लेयर उलगडून दाखवली होती …. तीचा पहिले विश्वासच बसत नव्हता, ह्या अफलातून सिस्टीमचा कर्ता धर्ता तो एकटा आहे … तेव्हा पासून दोघांनी ठरवलं जेव्हा जेव्हा त्यांची भेट होईल … ती त्याची परीक्षा घेईल … जस की …
सांग पाहू अमुक अमुक सर्विससाठी तू कुठलं पोर्ट कॉनफिगर करशील व तेच का ? तसच का कॉनफिगर करशील ?… आणि जेवढ विस्तृत विवेचन त्याकडून येई … तेवढी ती इम्प्रेसड दिसे … मग तिच्या ओठांची साखर , तो चाखत असे.

खरच, आपलं 'सेंटर फॉर साउथ ऐशियन इकोनोमीक स्टडी ग्रुपच' काम आणि तिच्या प्रोजेक्टचा विषय, या समान धाग्यामुळे ओळख झालेले आपण … तिच्या रसिल्या ओठांपर्यंत जाऊ, असा विचार त्याच्या आतापर्यंतच्या रटाळ आयुष्यात, त्याला स्वप्नातही आला नसता ! … असंच अमरला राहून राहून वाटत होत.

वाङ्मयकथाविरंगुळा