खुशबू (भाग १५)

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जनातलं, मनातलं
10 Mar 2015 - 8:08 pm

भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ | भाग ६ | भाग ७ | भाग ८| भाग ९| भाग १०| भाग ११| भाग १२
भाग १३ | भाग १४

जेवण झाल्यावर, सौफ खात खात गणपथी पिल्लै शांतपणे खुशाबुच्या समोरच्या बाजूच्या टेबलावर बसलेले होते. मग त्यांनी त्यांचे दोन्ही हाताचे कोपरे टेबलावर घेतले, आणि दोन्ही हाताची बोटे परस्परात गुंफून, तयार झालेल्या बेचक्यात, आपली हनुवटी टेकली, काही क्षण डोळे मिटून तसेच बसून राहिले होते. पिल्लैनां पाहून नाही म्हटलं तरी प्रीतमसिंगला, मनाच्या ऐका कोपर्यात कसंसच होत होत. आजच ते दिल्लीहून पुण्याला आले होते, जेवता जेवता प्रीतमसिंगनी त्यांना परिस्थितीचा रिक्याप दिला होता, की
१. आत्ता पर्यंत आपल्याकडे अगदीच जुजबी माहिती आहे अबुफैसल बद्दल
२. गेल्या काही दिवसात त्याचाकडून कसलाही संपर्क झाला नव्हता, आपल्याकडच्या मॉनीटर्ड सीम कार्ड्स वर …

यावर पिल्लैनी कोणताही प्रतिक्रिया आपल्या चेहेर्यावर उमटू दिली नाही, खुशबू त्याचं मनातल्या मनात निरीक्षण करत होती, पिल्लै म्हणजे मचाणावर वाट बघणाऱ्या शिकार्याच्या अंगी असतो तसा धीर असलेला माणूस, शरीरावर व मनावर पूर्ण ताबा असलेल्या व्यक्तीच्या ठिकाणी असतो तसा स्थितप्रज्ञपणा त्यांच्या ठायी आला होता, विशेषतः करीयरच्या सुरवातीला ३ वर्षे, कराचीतील भारतीय दुतावासात लियेसान ऑफीसर म्हणून व्यतीत केल्यानंतरचा स्थितप्रज्ञपणा.

आपल्या द्राविडीय पूर्वजांचा वारसा त्यांना लाभला होता, रेखीव निग्रही भुवया, चकचकीत काळ्या रंगात उठून दिसणारे पांढरे कानाजवळ उरलेले कुरळे केस, बुद्धिमत्तेची चमक असलेले डोळे, उंची ५ फुटाहून कम, देह सडसडीत तरी सौष्ठवपूर्ण ढेरी…. त्याचं ऐकून व्यक्तिमत्वच तमिळनाडू बँकेतल्या अधिकाऱ्यासारखं होत.
'टिक है, प्रीतम, लेकिन हम लोग अभी नेक्स्ट क्या करने वाले है ? जस्ट वेट वॉच ? … खुशबू तुमको क्या लागता है ? हमको अभी क्या करना चाहिये ?'
अचानक आपल्याकडे मोर्चा वळलेला पाहून खुशबू क्षणभर थबकली … पण मनातल्या मनात शब्दांची जुळवाजुळाव आधी करून, तीने आपला मनात गेले काही आठवडे घोळत असलेला विचार सांगू लागली …….
शिकार टप्प्यात येत नसेल तर … एखाद लूसलुशीत कोकरू आपण पुण्यात मोकळ सोडव ….

--------------------------------------------------------------------

रोजच्याप्रमाणे त्यादिवशी खुशबू आरशासमोर उभी राहून, स्वतःकडे बघत होती तेव्हा तिला तिथे ऐक गबाळी, खेडवळ मुलगी दिसत नव्हती तर बुद्धिमान, कल्पनाशक्ती असलेल, आपल यशस्वी रूप दिसत होतं, विशेषतः काल पिल्लैनी तिच्या योजनेला होकार दिल्यानंतर तर अगदी… हळूहळू मनातल्या आपल्या नव्या स्वप्रतिमेशी ती एकरूप होत होती. नोकरीनिम्मित राजकारणाच जवळून दर्शन, पत्रकारीतेसाठी सदैव अपडेट राहण्यासाठी करावं लागणार अफाट वाचन, चिंतन, मनन … दहशतवाद्यांच्या वर्तनाच काळजीपूर्वक खूप निरीक्षण केलं, त्यातलं खूप लक्षात ठेवलं आणि खूप काही ती शिकली त्यातून …जणू एखादा स्पंजच … ऐका वर्षात खुशबून एवढ काही आत्मसात केलं, इतकी प्रगती केली की प्रीतमसिंगलासुद्धा तिच्याबाद्दल ऐकप्रकारच कौतुक वाटू लागल… आता खुशाबुच्या प्लाननुसार त्यांच्या टीमला 3 बेवारशी पण सुस्थितीतील शवांची व्यवस्था करायची होती. ….
--------------------------------------------------------------------

पुणेकरांसाठी तो दिवस असाच भाऊगर्दीचा होता, त्यामुळे संध्याकाळच्या वेळी ट्राफिक विविध रोखाने धावत होतं, अरुंद खड्डामय रस्ते विविध बनावटीच्यां आणि अनेकविध रंगांच्या मोटारींनी खच्चून गजबजलेले होते, त्यामुळे कॉन्स्टेबल तावडे काहीसा चिंताक्रांत होऊन गेला, त्याने घडाळ्यात पाहिले तेव्हा दुपारचे ४ वाजले होते आणि अद्यापही साहेबलोकांची मिटिंग संपलेली नव्हती, ही मिटिंग जितक्या लवकर संपेल तितके चांगले, म्हणजे साहेबांना लोहगावच्या लष्करी हेलीपॅडवर आपल्याला पोहोचवता येईल असे तो मनाशी पुटपुटत होता, सव्वाचार वाजले अन तरीही कौन्सिल हॉलच्या पोर्चपाशी कोणाचीही कोणाचीच वर्दळ आढळून येत नव्हती, लवकरच जर आपण लोहगावच्या दिशेन निघालो नाही तर नगररोडच्या संध्याकाळच्या ट्राफिकचा विचार येवून, अस्वथ मनःस्थितीत तो क़्वलिसपाशी येरझारा घालू लागला. त्याला फार वेळ थांबावे लागले नाही. तावडेंनी गृहसचिवांची गाडी पोर्चमधे आणून उभी केली. प्रथम पिल्लैसाहेब गाडीत बसले त्यांच्या पाठोपाठ गुलाबी पगडी घातलेला एक सरदारजी आत बसला, तावडेच्या शेजारी पुणेपोलिस प्रोटेक्शन टीमचा कॉ गावडे आपल्या इन्सास रायफल सकट बसला. गाडी कौन्सिलहॉलच्या दरवाजातून बाहेर पडली पण आताशा रस्त्यात गाड्यांची गर्दी व्हायला लागल्यामुले तावडेला आपेक्षित वेग घेता येत नव्हता…. तेवढ्यात गाडीच्या पाठीकडे सुटलेल्या कौन्सिलहॉलच्या दिशेने एक स्फोटाचा आवाज सर्वांच्या कानी पडला ………
--------------------------------------------------------------------

मी पुन्हा रात्रीच्या जेवणाची तयारी करू लागले . गेल्या कित्येक वर्षांच्या वैवाहिक जीवनात किती बरं फोडण्या दिल्या असतील बरे मी ? अंन तीही प्रेमाने… आजही मला माझा नवरा तेवढाच देखणा वाटत होता जेवढा पहिल्यांदा पाहण्याच्या कार्यक्रमाला आला होता तेव्हा भासला होता. तेल गरम होई पर्यंत टाइम पास म्हणून रिमोटच बटन दाबलं, च्यानेल माग पुढ करून 'जय देवा जय देवा जय शिवा मार्तंडा …. बानोचं काय होणार म्हणून ' पाहावं तर … दिसत होती ब्रेकिंग न्यूज…. स्फोटात ३ लोकांचा मृत्यू झाल्याची सूत्रांकडून माहिती हाती येत आहे… स्फोटाची बातमी असलेली चित्रफित पुन्हा पुन्हा दाखवली जात होती… पण बानो खंडेराया याचं काय होतंय आज हे जाणून घेण्यासाठी शेवटी मी बातम्यांच्या च्यानलवरून सिरियलच्या च्यानलवर आले.
----------------------------------------------------------------------

मैने सख्त हिदायत दि थी के, थोडा वक़्त थंडे रहो, फिरभी किसने किया ?

मालूम नहि है भाई, मुझे लगा आपकीही हौसलाआफ्जाई के बदोलत किसी भाईने ये पार्टी की होगी !

वैसे कितने आदमी अपनी पार्टीमें खुश हुं थे, ऐसा कहा था ?

तीन.

ठीक है पता लगाओ किसने कारवाई हुई ये पार्टी.

पुण्यातल्या नुकत्याच झालेल्या स्फोटानंतर अबू-फैसलच्या नेटवर्कमधे हडबड झाली होती, आता नेटवर्कच्या कानाकोपर्यात परस्परांकडून चौकशी होत होती. रेकॉर्डरवर परत परत हा इंटरसेप्तेड कॉल खुशबू एकाग्रतेने ऐकत होती, कारण हा कॉल सौदी अरेबियातून आला होता, आणि खुशाबुला नक्की आठवत नव्हत, परंतु असा आवाज कुठेतरी तीने आधी ऐकला होता … पण नक्की कुठे ? याचा ती विचार करत होती …

दरम्यान प्रीतमसिंग ऐक समरी रिपोर्ट तयार करत होता.
१. अबू फैसल => लियाक़त अली, एक महिन्यापूर्वी इस्लामाबादइथून जारी झालेला पाकिस्तानी पासपोर्ट, LQ1490971 => सध्या वास्तव्य सौदी अरेबिया
आणि
२. मॉनीटर्ड सीम कार्ड्स वर येणारे कॉल व जाणारे कॉल, यांचे नंबर, त्या नंबरवरून पुढे जाणारे कॉल नंबर अश्या पुढच्या अनेक लेयर मधले नंबरचा डाटा सिस्टीममधे फीड करत होता. मागच्याच आठवड्यात मिळालेल्या, आय आय टी जयपूरच्या काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या शेवटच्या वर्षाच्या प्रोजेक्ट NIC साठी केलेला ऐक डेटामायनिंग अल्गोरिदमवर आधारित सॉफ्टवेअरमधे. या डेटामायनिंग अल्गोरिदममधे क्लस्टरिंग, नैव बायस, असोसिअशन वैगरे बेसिक अल्गोरिदमच्या वरच्या दर्जाचं अतिशय क्लिष्ठ अल्गोरिदम होता.

त्या सॉफ्टवेअरमधून आता प्रीतमसिंगला ऐक लिस्ट मिळणार होती, दहशतवादी कारवायात सामील असण्याची शक्यता ९५ % प्रोब्याबिलीटी व ९५% च्या वर कॉन्फीडन्स लेवल असणारे सीमनंबर्स….
आता भारतीय सुरक्षा यंत्रणा सज्ज झाली होती, पुण्यातल्या अबू-फैसलच्या नेटवर्कला अटक करण्यासाठी…

याचसाठी तर एवढा सापळा रचला होता त्यांनी कौन्सिल हॉलजवळ बॉम्बस्फोटाचा … ज्यात आधीच मृत झालेल्या बेवारस व्यक्तींची, कृत्रिम आयडेन्टीटीसह, स्फोटाचे बळी म्हणून जगाला ओळख करून देण्यात आली होती….

वाङ्मयकथाविरंगुळा

प्रतिक्रिया

एस's picture

10 Mar 2015 - 8:14 pm | एस

वाचतोय. पुभाप्र.

मास्टरमाईन्ड's picture

10 Mar 2015 - 8:17 pm | मास्टरमाईन्ड

आणि थोडे मोठे पण बनवा की. पट्कन वाचून होतात.

बोका-ए-आझम's picture

11 Mar 2015 - 9:26 am | बोका-ए-आझम

अब मजा आवत रही!

कायतरी अवघड पेच तयार करताय त्या मुलीसाठी. कशासाठी हो?

पगला गजोधर's picture

11 Mar 2015 - 2:56 pm | पगला गजोधर

साधी सरळ एक कथा आहे

असंका's picture

11 Mar 2015 - 3:02 pm | असंका

मग चांगलंच आहे..
(पण मला शंका आहे. तुम्ही दोन तीन तरी संदर्भ दिलेले आहेत ज्यावरून माझी तर पक्की खात्री झाली आहे की त्या मुलीसमोर तुम्ही एक वाईट पेच ठेवणार सोडवायला.)

सिद्धेश महाजन's picture

11 Mar 2015 - 3:15 pm | सिद्धेश महाजन

भाग १३ उघडत नाही

पगला गजोधर's picture

11 Mar 2015 - 4:34 pm | पगला गजोधर