खुशबू (भाग ६)

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जनातलं, मनातलं
24 Feb 2015 - 4:17 pm

भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५

५ वर्षापूर्वी

सकाळच्यापारी मिरज जंक्शनमधे नेहमीप्रमाणे वर्दळ... रेल्वे कर्मचाऱ्यांची व विविध कामानिमित्त येणाऱ्या प्रवासी नागरिकांची गडबड... गोव्याच्या दिशेने होणारी विदेशी पर्यटकांची होणारी वर्दळ, त्यातही इस्त्राईली नागरिकांचा असलेला वावर… पुण्याहून मिरजेकडे येणाऱ्या गोवाराणी एक्सप्रेसची पप्पू अस्वस्थ मनानं वाट पाहत होता. त्याला स्टेशनवर येऊन बराच वेळ झाला होता, पण अजूनही गाडीचा पत्ता नव्हता. रेल्वे सावकाश स्टेशनमध्ये शिरताना दिसली. ती सावकाश प्लॅटफॉर्मला लागली तेव्हा त्याच्या मनाची अस्वस्थता थोडी कमी झाली. डब्यात चढणार तोच डब्यातून कुठूनतरी अचानक समोर आलेला तो म्हणाला, 'मुझे उतरने दो पहले !', आश्चर्य म्हणजे त्याच्याकडे काहीच लगेज नव्हत. …….

दुपारी मिरजेच्या स्टेशनबाहेर हि झुंबाड पब्लिक लोटली होती, अशातच अचानक विश्रामबागच्या दिशेने आलेला पोलिसांच्या गाड्याचा ताफा, त्या बघ्यांच्या गर्दीतून वाट काढत रेल्वे स्टेशन च्या दिशेने येवू लागल्या होत्या, आधीच तंग असलेलं वातावरण गाडीच्या सायरनमुळे अजूनच गंभीर झालं होत, रस्त्यातले लोक पटापट गाडीला वाट देत होते, भीतीयुक्त नजरेने ते स्टेशनकडे तर कधी पोलिसगाडीकडे बघत होते.
ऐक पोलिसांचा फॉरेन्सिक टीममेंबर प्लाटफॉर्म १ च्या वेटिंगरूमच्या दरवाज्याजवळ, जाड भिंगातून जमिनीवर काही सापडते का ते शोधत होता, तेवढ्यात शिस्तीत चालणार्या बुटांचा 'टाक टाक' असा आवाज आला, वळून पहायच्या आधीच त्याला करड्या आवाजात विचारलेला सवाल कानी पडला,
'कुठे झाला ब्लास्ट ?'
'सर इकडे आत … 'तो टीममेंबर आदबीन उठून उभा राहत म्हणाला.
डीऐसपी मगदूम … वय चाळीशीत, कडक शिस्त, उंचपुरा, जयसिंगपुरच्या मातीत कसलेलं शरीर, …. टीम मेंबरने दाखवलेल्या दिशेने तो गेला.
त्यादिवशी दुपारी १ च्या सुमारास मिरज जंक्शनमधे ब्लास्ट झाल्याचा रिपोर्ट आल्यावर तातडीने सांगलीहून सुपरवाइस करायला तो आला होता….
सहजच त्याने, स्फोटाच्या जागच्या वर्हांड्याच्या छताकडे नजर मारली …. थोडावेळ टक लावून … तो फोटोग्राफरकडे पाहत म्हणाला, इथला काढ अजून ऐक, काहीच सुटलं नाही पाहिजे तुझ्या लेन्समधून …. दुसर्या टीम मेंबरच्या कानात तो काही पुटपुटला … तो टीममेंबर शिडी घेऊन आला, स्क्रापरने त्याने छताचा भाग खरवडून, सीलबंद लखोट्यात भरला …. छताला चिकटलेला, फ्रुटीच्या टेट्राप्याकचा पिवळा तुकडा …

साक्षीदारांशी बोलून झाल्यावर…. मगदूम म्हणाले… 'पाटील, ताब्यात घेतलेला बसव्प्पाला पाठव आत.', मिरज रेल्वे स्थानकात शीतपेय विकणारा कीडमीडित बसव्प्पाला समोर आला, 'काही आठवतंय का भडव्या, कालचं, का टाकू परत आत ? ',
'नाय वो, मालक, … नेहीमिप्रमानेच धंदा करत व्हतु, कालपन ' काकुळतीला येवून बसव्प्पा हात जोडून म्हणाला…
अचानक काहीतरी त्याला क्लिक झालं. 'सायेब, आत टाकू नका, घरात कमावणार कोन नाही, काल अन् आजचाबी धंदा बुडाला, सकाळच्या पारी फलाटाला गाडी लागल्या लागल्या आत चढलो, बोगीत कुनीबी नव्हत, तरीबी सिटाखाली ऐक ब्याग होती … साहेब ती ब्याग घेऊन १ नंबर फलाटावर गेलो , तिकड फिस्के हवालदार डूटीवर होते, तेनला सांगितलं, ते म्हनाल, बाजूला ठिव, डूटीसंपल्यावर ब्यागेतल आपापसात वाटून घेऊ, म्हणून सायेब ती ब्याग तशीच उचलून म्या हालजवळ ठेवली, कोणाच्या लक्षात यायला नग म्हून त्यावर माझा धंद्याचा माल- फ्रूट्या, पेपर, मासिक रचून ठिवली, बास सायेब, अजून काय नाय'

मगदूम म्हणाले 'पाटील या भडव्याला सोड, कॉ. फिस्केला आत पाठव, चौकशीसाठी … '

त्यासंध्याकाळी दहशतवाद विरोध पथकप्रमुख हेमंत कोकरेंचा मोबाईल वाजला, थोडावेळ ते काहीतरी पलीकडच्याच ऐकत राहिले, नंतर कॉल संपल्यावर, ते वळून म्हणाले, "कालचा स्फोट अमोनियम नायट्रेट वापरून झालेला दिसतोय, आणि … वी ह्याव रिसन तो बिलिव , बॉम्ब गोवाराणीनं मिरजेला पोहोचला … वाझ चेक करशील का मागचे २ स्फोट झाले होते ज्यात अमोनियम नायट्रेट वापरलेलं आणि टार्गेट रेल्वेस्थानक होती… त्या स्थानकावर आलेल्या गाड्या, त्यांची रूटवरची स्टेशन्स , आणि गोवाराणीची मिरजेपूर्वीची अपसाईडची स्टेशनस, यात काही को-रेलेशन मिळतंय का ? "
थोडा वेळ अभ्यासून वाझ म्हणाले
'यस सर, तिघींचे रुट्स एकाच स्टेशनमधे इंटरसेक्ट होतात,…. पुण्यामध्ये '

याचा अर्थ उघड होता कोणत्या तरी दहशतवादी संघटनेच बेस ठिकाण होत .... 'पुणे'

वाङ्मयकथाविरंगुळा