खुशबू (भाग १४)

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जनातलं, मनातलं
6 Mar 2015 - 2:02 pm

भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ | भाग ६ | भाग ७ | भाग ८| भाग ९| भाग १०| भाग ११| भाग १२
भाग १३

"ओ के सर", अस म्हणून प्रीतमसिंगने मोबाईलवरचा कॉल कट केला तेव्हा त्याला आपल्या शरीरात आतून किंचीतशी थरथर जाणवत होती, भलेही जरी वर्षभर रगडून अभ्यास करून एखाद्या गुणी विद्यार्थ्याने परीक्षा दिल्यावर, त्याला नोटीस बोर्डावरचा निकाल पाहताना आतून जाणवते ना तशी थरथर होती ती…. ऑफिस फाईलमधे "ती" लेखी नोंद करण्यात आलेली आहे, असं त्याला खुद्द अतिरिक्त गृहसचिव गणपथि पिल्लै यांनी कळवलं होतं.

सुट्टीवर निघण्यापूर्वी हेमंत कोकारेंनी, प्रीतमसिंगला सुट्टीचे ठिकाण, कालावधी, संपर्क-माहितीची कल्पना दिली होती, म्हणजे तसा प्रोटोकॉलच सांगत होता, प्रीतमसिंग जरी कोकारेंचा ज्युनिअर असला तरी, ह्या टास्कफोर्सच्या ऑपरेशनमधे तो त्यांचा श्याडो अधिकारी होता, म्हणजे जे जे हेमंत कोकारेंना ऑप बद्दल माहिती होतं किंवा होत-होतं, ते त्यांना त्यांच्या ऑप फ़ाइलमधे नोंदवून ठेवावं लागत होत, ही त्या प्रोटोकॉलची रिस्क मिटीगेशन स्टेप होती. काही अनपेक्षित कारणांमुळे नेतृत्व करणारा सक्षम अधिकारी जर नेतृत्वाच्या जबाबदारीचे पालन करण्यास उपलब्ध नसेल तर केंद्रीय गृहसचिवांच्या आदेशानुसार त्या अधिकार्याचा श्याडो असेटवर नेतृत्व देण्यात येते. तशीच ती प्रीतमसिंगला या नव्या बदललेल्या परीस्थित देण्यात आलेली होती, आणि हेच ग. पिल्लै त्यांला फोनवर सांगत होते.

कोकारें आणि वाझ यांनी कोणीही नातेवाईक नाही, अशीच फाईलमधे नोंद होती, अहिल्या प्रोटोकॉल दरम्यानच्या फ्रीज पिरिअड मधे तर वाझ यांनी बेकरी विकून त्यात मिळालेले बरेचसे पैसे बेकरीच्या कर्मचार्यांना देऊन अलविदा केले होते, नाहीतरी त्यांच्या या महिना अखेरीस रिटायर होऊन, देश विदेशी टूरवर फिरण्याचा प्लान होता … पुढच्या वर्षी कोकरे रिटायर होऊन माळीणला जाउन तिथेच उर्वरित आयुष्य कंठनार होते … पण काळाने त्या आधीच दोघांना हिरावून नेलं होतं … एवढंच काय सुरक्षा यंत्रणेत ते काम करत होते, त्यामुळे सिक्रेसी अॅक्ट नुसार वर्तमानपत्रात किंवा मिडियामधे त्याचं खर नाव व फोटो कधीच आलेला नव्हता. त्यामुळे त्यांच्या बेपत्ता होण्यामुळे सध्यातरी उरलेल्या बहुतांश जगात काहीच फरक पडत नव्हता, भारतीय सुरक्षा यंत्रणा सोडून….

टी वी वर माळीणबाबत ब्रेकिंग न्यूज बघून प्रीतमसिंगने त्या दोघांना मोबिलफोन वर संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही… त्याने दोघांचेही मोबाईल ट्रेस करून बघितले तर दोघांच्याही मोबाईलचे शेवटचे लोकेशन माळीण गावच होते…. आणि त्यांच्या मोबाईलचा शेवटचा टॉवर संपर्काची वेळही मध्यरात्रीची होती …. दरड कोसळण्याच्या काही क्षण आधीची … पावसामुळे अजून तरी शोधकार्य दोन दिवस सुरु होऊ शकणार नव्हते….

दरम्यानच्या काळात प्रीतमसिंगने ऑप फाईल सेफ मधून बाहेर काढली, खुशबूबद्दल चांगले शेरे होते त्यात, शेरे वाचून त्याने ठरवून टाकल, की या ऑपमधे ती त्याची श्याडो अधिकारी असेल म्हणून …. त्याने तिला, पुणे विद्यापीठ परिसरातील 'सेंटर फॉर साउथ ऐशियन इकोनोमीक स्टडी ग्रुप' च्या इमारतीत बोलावून एकंदरीत परिस्थितीची कल्पना द्यायचे मनोमनी ठरवले .

पाउस थांबल्यावर माळीणमधे ४ जेसीबीच्या सहाय्याने शोधकार्य सुरु झाल्यावर दुसर्यादिवशी कोकरे आणि वाझ यांची पार्थिव स्थानिक प्रशासनाला हाती लागीली, पण गावातल्या रहिवाश्यांच्या कुठलाहि नातेवाईक त्यांना ओळखू न शकल्यामुळे, त्यांच्या पार्थिवाची रवानगी आंबेगावच्या शासकीय शवागारात झाली…. अर्थातच प्रीतमसिंगने आपला प्रभाव वापरून, ती पार्थिव ताब्यात घेऊन, त्यांच्यावर पुण्यातील ऐका विविक्षित जागी लष्करी इतमामात गुप्तपणे अंत्यसंस्कार केले.
------------------------------------------------------------

तिने आपल्या खुर्चीतून मान वर करून प्रीतमसिंगकडे पाहिलं, तो टेबलाच्या दुसर्या टोकाला काळ्या लेदरच्या ऑफिस चेअरमधे बसला होता. समोरच्या टेबलावर विविध प्रकारची कागदपत्र आणि फायलींचा पसारा होता, शिवाय ऐक डायरी उघडी होती, डायरीच ते पान कोरं होतं, खुशाबुने प्रीतमसिंगच्या चेहेर्याकड एकवार पाहिलं. त्याच्या चेहेर्यावर कोणतीच भावना दिसत नव्हती, अगदी निर्विकार चेहऱ्याने बसला होता तो, राग नाही , दुख्ख नाही … काहीच नाही. 'हो मी तयार आहे' असं खुशबूने त्याला उत्तर दिलं. 'ऑपेरेशन टायफॉइड मेरी ' अस त्या मोहिमेच नाव होत, मिरज बॉम्बस्फोटानंतर एक कोकारेंच्या नेतृत्वाखाली ऐका टास्कफोर्सची स्थापना करण्यात आली, बॉम्बस्फोटामागील सूत्रधार असलेल्या दहशतवाद्याला पकडण्यासाठी तो टास्कफोर्स होता…सुरक्षा यंत्रणेकडे त्याचा फोटो, फिंगर प्रिंट्स … काहीच उपलब्ध नव्हत… एवढी माहिती तिला प्रीतमसिंग कडून त्या दिवशी मिळाली होती …

--------------------------------------------------------

ऑप फ़ाइलनुसार प्रीतमसिंग ला आज लालदेवळात जाउन, कोणा 'डेविड कोहेन' ची भेट घेऊन काही माहिती घ्यायची होती. त्याप्रमाणे तो तिथ पोहोचला… तिथल्या गर्दीत त्याचा गुलाबी फेटा उठून दिसत होता… 'डेविड कोहेन' ला मिळालेल्या सुचणेप्रमाणे त्याला ती नोट गुलाबी-फेटेवाल्या शीख माणसाला द्यायची होती … ती नोट त्याने प्रीतमसिंगच्या हाती दिली… आपल्या कार्यालयात येवून त्याने ती नोट वाचली…. त्यावर काही शब्द होते,
अबू फैसल => लियाक़त अली, एक महिन्यापूर्वी इस्लामाबादइथून जारी झालेला पाकिस्तानी पासपोर्ट, LQ1490971

तिकडे बाळासाहेब थोरवेनां त्यांच्या ब्लाकबेरीवर एक एस.एम.एस आलेला होता बेंजामिन लेवीकडून ….'आय थिंक वि आर इवन नाऊ… '

वाङ्मयकथाविरंगुळा

प्रतिक्रिया

मास्टरमाईन्ड's picture

6 Mar 2015 - 3:47 pm | मास्टरमाईन्ड

हा सगळ्यात पांचट भाग वाटला.
गजोधरभाऊ, आपल्याला डायरेक्ट खरी प्रतिक्रिया द्यायची सवय आहे. वाईट वाटल्यास माफ करा.

बोका-ए-आझम's picture

7 Mar 2015 - 1:56 am | बोका-ए-आझम

मी पांचट वगैरे म्हणणार नाही पण आधीच्या भागापेक्षा हा कमी कमला असं जरुर म्हणेन. फार पटपट घटना गुंडाळल्यासारख्या वाटल्या इथे!

बोका-ए-आझम's picture

7 Mar 2015 - 1:57 am | बोका-ए-आझम

साॅरी. कमी पडला असे वाचा.

अगदी सुमडीमध्ये चौदा भाग झालेत....काय गाजावाजा नाय...कित्येक भागांवर तर एक पण कोमेंट नाय.

पण शानदार आहे जे काय आहे ते...

एस's picture

7 Mar 2015 - 8:37 pm | एस

वाचतो आहे. रंजक होणार कादंबरी.