खुशबू (भाग १)

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जनातलं, मनातलं
17 Feb 2015 - 7:28 pm

'पाकिस्तानविरोधात क्रिकेट सामना जिंकणं म्हणजे युद्ध जिंकण्यासारखं आहे. माझा मुलगा पाकिस्तानविरुद्धच्या 'या' युद्धात शूर सैनिकासारखा लढला. त्यानं दाखवून दिलं की भारतीय मुसलमान हा आधी भारतीय असतो, मग मुस्लिम असतो!' हे उद्गार आहेत भारतीय क्रिकेट संघातील उद्योन्मुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी याचे अब्बाजान मोहम्मद तौसिफ यांचे. गेल्या रविवारी पाकिस्तानविरुद्ध झालेला विश्वचषक स्पर्धेतील पहिला सामना भारताने मोठ्या फरकानं जिंकला.-----पेपरातली ही बातमी वाचता वाचता, खुशबूचे मन भूतकाळात मागे गेलं.
----------------------------------------
माय नेम इज 'खुशबू सलीम बागवान' सर, झोपडपट्टीत राहणारी असली तरी आली होती व्यवस्थित. स्वच्छ, नीटनेटकी, दोन वेण्या चपचपीत तेल लावून घातलेली. छोटीशी चिमणीसारखी जिवणी असलेली. एरवी कुपोषणाचा बळी वाटणारी पण डोळे पाणीदार, नाक धारदार. तिला अशी तयार करून पाठवलं होतं तिच्या आईनं. नाव विचारल्यावर स्पष्ट स्वरात म्हणाली, 'खुशबू सलीम बागवान'. इतर प्रश्नांनाही चांगली उत्तरं दिली. दरवर्षी झोपडपट्टीतील किंवा अगदी खालच्या उत्पन्न गटातील किमान दोन मुलांना आमच्या संस्थेत प्रवेश द्यायचाच असं व्रतच आम्ही घेतलं होतं. त्यांना सक्षम बनवून इतर सुस्थितीतील मुलांशी निरोगी स्पर्धा करण्याची संधी देणं हे आम्हांला आवडतं आव्हान असे. जवळजवळ सर्व अशी मुलं अभ्यास, क्रीडा, इतर उपक्रम यात इतरांपेक्षा सरस ठरायची. खूप समाधान मिळायचं यातून. खुशबू तर आपल्या गुणवत्तेनं संस्थेत आली होती, बिच्चारी मागच्या दंगलीमध्ये तिची माय आपल्या लेकीला, जीव मुठीत ठेवून पुण्यात आश्रयाला आल्या होत्या. म्हणते कशी ‘दाभोलकर सर अगदी पहिल्या दिवशी तुम्ही डोक्यावर हात ठेवलाना तेव्हापासूनच तुम्ही हेडसर नाही तर मित्र वाटू लागलात.’ स्पर्शाची जादू मला अगदी आतून जाणवली. आणखी एक गोष्ट लक्षात आली…खुशबूचं उर्दुप्रमाणे, हिंदी बोलणंही खूप स्पष्ट व बर्यापैकी फ्ल्युअंट होतं. हिला पत्रकारितेत तयार करता येईल असा एक विचार त्यावेळी मनात तरळून गेला.
----------------------------------------

अचानक उसळलेल्या दंगलीमुळे अनेकांवर रात्रीतून काळाने घाला घातला. छावणीत भेटणारा प्रत्येक जण कुटुंबियांच्या नातेवाईकांच्या मित्रांच्या आठवणीने गहिवरून येत होता. फातिमाच्या डोळ्यासमोर तर तिच्या प्रत्येक मुलाचा चेहराच रोज रात्री फिरत असायचा. आपल्याच लेकरांच्या प्रेतांवरून, कशीबशी धाकट्या मुलीला घेऊन रात्रीतून तिथून निसटून, सलग ३ दिवस मृत्यूला चकवा देत निसटलो आणि कश्या भारतीय सैन्याच्या छावणीत पोहोचलो, याचाच शॉक काही केल्या सलग झोप येवू देत नव्हता. १० वर्षे झाली त्याला ….
'१० साल गुजर गये उस रातको फातिमाआपा, ताभिस्से मैनेभी नही देख्या मैने अपने ऐकलोते लाडकेकू', फिटरका कामके वास्ते हररोज की तरह सुबह को बाहर गया, लेकिन वापीस आयाच नै. कहा होगा मेरा जब्बु. तू नसीबवाली तेरी ऐक लडकीतो बच गयी. अभी उसकेवास्ते तेरेकु जिना चाहिये, जा सो जा…हा फरीदा… खुशबू अभी आतेही होगी…
----------------------------------------

पुणे विद्यापीठ परिसरात, ऐका जुन्या ब्रिटीशकालीन दगडी इमारतीबाहेर तवेरा येउन थांबते, ड्रायविंग सीटवरील व्यक्ती तवेरामधून, बिल्डींगवर लावलेल्या बोर्डकडे नजर टाकते. 'सेंटर फॉर साउथ ऐशियन इकोनोमी स्टडी ग्रुप'. इमारतीतील एका विशेष रूममध्ये एका लांबलचक टेबलाभोवती काही व्यक्ती बसलेल्या होत्या, थोड्या वेळाने त्या रूममध्ये कार मधून उतरलेल्या दोन व्यक्ति आल्या. त्यातील एक व्यक्ती मध्यमवयीन होती तर दुसरी तरुण होती. ती मध्यमवयीन व्यक्ती म्हणजे दहशतवाद विरोध पथकप्रमुख हेमंत कोकरे होते. त्या बसलेल्या व्यक्ती त्यांना ओळखत होत्या. त्यांना बघताच त्या व्यक्तींनी उठून सॅल्यूट ठोकला. कोकरेनी, त्यांच्या सोबत आलेल्या तरुणालाही एका खुर्चीवर बसायला सांगितले. मग ते स्वत: टेबलाच्या एका कडेला असलेल्या खुर्चीवर जावून बसले. ‘लेट मी इंट्रोड्यूस धिस यंग गाय.. कॅप्टन प्रीतमसिंग. हा आपल्या सिक्रेट मिशनचा प्रमुख असणार आहे. ही इज फ्रॉम मिलिटरी इंटेलिजन्स सर्व्हिस. खास आपल्या मोहिमेसाठी मी त्याला तिथून इकडे ट्रान्स्फर करून घेतले आहे, मग कोकरे कॅप्टनकडे बघत म्हणाले, ‘या लोकांच ब्रीफ प्रोफाईल तुला माहितच आहे. तरीही तुला जे मिशन पूर्ण करायचे आहे त्यात यांचा कसा आणि कुठे उपयोग करून घ्यायचा आहे हे तू ठरवायचे आहे. प्रीतमसिंग विचार करू लागला कमांड सेंटर कोणाला हाताळायला द्यावे बर ?…. काही विचार केल्यावर प्रीतमची पाऊले मग व्हीलचेयरमधे बसलेल्या व्यक्तीकडे वळाली …
----------------------------------------

दैनिक खबरनामा मधे जाहिरात आली होती, पाहिजे : अर्धवेळ पत्रकार, उर्दू भाषेवर प्रभुत्व संपर्क जि टी वी … वै. वै, मी चार्लीज् बेकरीचे मालक ज्युलियस वाझ यांना भेटले, त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्याची सूचना दाभोलकर सरांनी दिली होती.' घरची प्रतिकूल परिस्थिती असतानाही माणसे स्वकार्तुत्ववान व मोठी कशी होतात हे तुला त्यांच्याकडून कळेल ' असं सुद्धा सरांनी सांगितलं होतं. मला दाभोलकर सरांच्या संस्थेच ब्रीद आठवलं, 'आपण मोठ होऊ शकू' असं म्हणू शकणारं मन घडवतं तेच खर शिक्षण, तोच खरा शिक्षक. वाझ यांची भेट तशी तर ३-४ मिनिटाचीच, हेच आपलं नाव, गाव, काय शिकलीस, घरी कोण असतं वै. काहीच विशेष नव्हत भेटीत. लक्षात राहण्यासारख्या दोनच गोष्टी, भिंतीवरच भव्य सागवानी क्रॉसवरचा येशु आणि वाझ ज्यावरून वावरत होते, ती व्हीलचेअर …
----------------------------------------

वाङ्मयकथाविरंगुळा

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Feb 2015 - 7:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुरुवात छान आहे !

राजाभाउ's picture

18 Feb 2015 - 10:30 am | राजाभाउ

अजुन काय टोटल लागेना, पण शेवटच्या २ परिच्छेदांनी उच्छुकता चाळवली आहे.
पुभाप्र.