खुशबू (भाग ७)

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जनातलं, मनातलं
25 Feb 2015 - 12:44 pm

भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ | भाग ६

आज एक नवीन दिवस उजाडला,ती आज लवकरच उठली होती कारण आज तो दिवस उजाडला होता ज्या दिवसाची ती वाट पाहत होती. आज जीटीवी साठी, तिला मुलाखत घ्यायची होती म्हणून, खशबु जरा लवकरच उठली, सकाळची आंघोळ आवरुन ती आरशासमोर आली. आरशात बघुन स्वतःशीच म्हणाली,
'घाबरण्याच काहीच कारण नाही खुशबू, तू हे करू शकतेस', मनातल्या मनात ती थोडी धाकधुकीतच होती कारण तिला आज मुलाखत घ्यायची होती, 'अकबरउद्दीन कुरेशी ची'. हो तोच 'हरकत ऐ इत्तेहादुल मोमीन ' संघटनेचा वाचाळ प्रवक्ता. रोज बरोब्बर ७ वाजता, तिला मगरपट्ट्यातील जीटीवी च्या कॅम्पस मधे पिकअप बस येई, ती लगबगीने पिकअप लोकेशनकडे निघाली, आज एक वेगळीच स्फुर्ती तिच्यात आली होती. काल तिने त्याला दुपारी फोन करून वेळ ठरवली होती 'जनाब, माझ नाव खुशबू आहे, जीटीवी ची पत्रकार आहे, तुमची या विधानसभा निवडणुकीच्या प्रचार मोहिमे संधर्भात मुलाखत घ्यायची होती, मुलाखत द्याल न ?'. तो खुश झाला, हा तर पब्लिसिटीचा अजून ऐक चान्स, सभांना गर्दी वाढण्याचे चान्सेस, परवानगी मिळाली खुशबूला
… नामचीन पत्रकार होण्याच्या इच्छेन अनेक मुल मुली मुलाखत घेण्यासाठी येतात … त्यात अजून ऐक. हि ऐक ट्रिक त्याला मस्त जमलेली, सभेत जाहीरपणे भडकाऊ वाक्य टाकायाची…फ़ुल्ल टाळ्या घ्यायच्या, मुलाखतीत पत्रकारांच्या ठराविक प्रश्नांना तीच साचेबद्ध उत्तर द्यायची … हा. का. ना. का.

खुशबूची मुलाखत सुरु झाली, त्याने तीच वाक्य फेकायला सुरु केली,

'माझा विरोध कुठल्या धर्माला नाही तर काही लोकांच्या हेकेखोरीला आहे, आपल्या कौमला स्वतःच्या उद्धारासाठी जागं व्हावं लागेल, विकासाच्या बाबतीत आपला समाज खूप माग आहे, शिक्षणाचा दर्जा कमी आहे, आपल्या क़ौमने पिक्चर सिरिअल्स अश्या गोष्टी दूर सारून त्यावर खर्च होणारा पैसा आमच्या संघटनेला दिला तर, आपल्या समाजाच्या गरजा आपल्याला भागवता येईल व इतरांपुढे हात पसरण्याची गरज उरणार नाही … वै वै ', तो अशी वाक्य झोपेतून खडाखड उठवल्यावर देखील सहजतेन म्हणू शकला असता…

खुशबूची या संघटनेतल्या इतर लोकांवर सुद्धा धावती नजर होती… मुलाखत झाल्यावर इतरांमधे मिसळून ती संघटनेत ओळखी वाढवत होती, सेक्रेटरी, खजिनदार, एवढच काय ड्रायवर लोकांशी सुद्धा तिने गप्पा मारल्या, गप्पा मारतामारता, आपण मुळचे गुजरातचे आहोत, सध्या इकडे विस्थापित झालो आहोत, हे सुद्धा ती सांगायला विसरली नव्हती…

ड्रायवरबरोबरच्या गप्पा बर्याच रंगल्या तिच्या, सुरवातीला शांत वाटणारा तो, मुद्दे मात्र निकराने मांडत होता.
जसे की "इस्मुहुमा अकबरु मिन नफ़इहीमा" मतलब नफे से नुकशान ज्यादा है. हमारा नौजवान आज उसमे डूब गया है. इस्लामी अहकामसे दूर दूर हो रहा है. आज हमारे पास चेटिंग करनेका, गेम खेलनेका तो वक्त है लेकिन अल्लाहके किताबकी तिलावत करनेका, नमाज़ पढनेका वक्त नहीं.
ख़ास करके हमारे भाई-बहेने मौसिकीके गाना-बाजानेके शोखीन हो रहे है. मेरी बहन ! हमको सोचना चाहिए की हम ये सिनेमा म्यूजिकी गाना बाजाने करके, ये यहूदी, अमरीकी कम्पनियोकी मिल्कतको कितना बढ़ा रहे है ! इस आवक को वो लोग इस्लामको मिटानेमें इस्तेअमाल कर रहे है. इसलिये आज़िजाना दरख्वास्त है की ये सिनेमा म्यूजिकी गाना बाजाने का बायकाट, आप आपने टीवीके जरीये करे.

खुशबुने त्या ड्रायवरला वरवर सहानुभूती दाखवली, सांगितलं की 'मला जस जमेल तशी मी मदत करेन, अश्या विचारांच्या प्रसारासाठी', मनात मात्र या ड्रायवरची नोंद ठेवायला ती विसरली नाही…

काही दिवसांनी खुशबूला न्यूज कवर करताना, त्या ड्रायवरशी पुन्हा संपर्क आला, तो म्हणाला मी ड्रायवर, माझ्यासारखे माझे मित्रपण ड्रायवर, आमचा कायमचा पत्ता नसतो, पोटासाठी फिरतीची नोकरी हि अशी, सीम कार्ड वैगरे घ्यायला गेलो की नेहमीची कुचंबना…… वै वै
खुशबू म्हणाली 'बघते मला काही करता येत का याबाबतीत' …

३-४ दिवसात खुशबूने, त्याला १० सीम कार्ड पर्स मधून काढून दिली, म्हणाली 'अरे मी पत्रकार आहे, बरीच जानपेहेचान आहे, तुझ्या या पवित्र कामात अजून काही मदत लागली तर सांग '

त्यासंध्याकाळी प्रीतमसिंगच्या मोबाईलवर ऐस एम ऐस आला, 'दहा लाडू मुलांमधे वाटले'.

वाङ्मयकथाविरंगुळा

प्रतिक्रिया

एस's picture

25 Feb 2015 - 1:49 pm | एस

वाचतोय.

निमिष ध.'s picture

25 Feb 2015 - 8:45 pm | निमिष ध.

मी पण वाचतोय. दररोज थोडे थोडे पुढे चालू आहे. येऊ द्या अजुन!