खुशबू (भाग ९)

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जनातलं, मनातलं
27 Feb 2015 - 4:29 pm

भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ | भाग ६ | भाग ७ | भाग ८

बी… प, बी…प, तो सेलफोन स्क्रीनवरचा नंबर पाहू लागला. नंबर ओळखीचाच होता. तसा तो नसता, तर हा फोन त्याच्यापर्यंत आलाही नसता. मुळात अड्रेसबुकच्या बाहेरचे अनोळखी फोनच त्याला येतच नसत. त्याने सेलफोन आपल्या कानाला लावला.

पलीकडून बोलणारा अतिशय उत्तेजित होऊन बोलत होता. "अबू फैसल, तीनो निकाह मुबारक हो
"शुक्रिया " आणि तो थंडपणे आपल्या भारदार खर्जातल्या हस्की आवाजात पुढे म्हणाला, "किसीको मालूम अभी तीनो भाई कैसे है ?" ……

"तीन्हो दुल्हे बखैरियत है …अलसुबह से ही बारातें आने शुरू हो गई थी, आपकी सख्त तक़िद के हवालेसे दूल्हा-दुल्हन के निकाह की अलग-अलग व्यवस्था की, और फिर दूल्हा व दुल्हन का निकाह कराया। जैसे ही निकाह हुआ पाण्डाल में मुबारक हो मुबारक हो का शोर गूंजने लगा" पलीकडून बोलणारा म्हणाला…

"ठीक है" म्हणून त्याने कॉल कट केला….

कानावरचा हेडफोन बाजूला ठेवत प्रीतमसिंग म्हणाला "आत्ताचा कॉल पुण्याजावळून, बिहार नेपाळ बॉर्डर जवळ होता …. आपला संशय खरा आहे म्हणजे, अबू फैसल आणि दरभंगा मॉड्यूल यात सामील दिसतंय", "आतापर्यंत बिहारमधून तो नेपाळ मार्गे पाकिस्तानात पोहोचला असेल"
"अबू फैसल बद्दल फार काही माहिती आपल्याकडे नाही, गेली कित्येक महिने तो हुलकावणी देत आहे आपल्याला, त्याचा साधा फोटो सुद्धा नाही आपल्याकडे "

वाझ म्हणाले "सध्यातरी आपण हे सर्व ट्याप संभाषण, ट्रान्सस्क्रिप्टसकट व्यवस्थित सिस्टीममधे आरकाईव करत आहोत, म्हणजे गृहखात्याला आपल्याला विकली रिपोर्टमधे त्याची समरी देता येईल '

तेव्हा हेमंत कोकरे म्हणाले, "असं नाही चालणार, आपण हे खास टास्कफोर्स त्याच्यासाठी, मिरज-स्टेशन बॉम्बब्लास्ट नंतर, इथे विद्यापीठाच्या आवारात सुरु केल, …. काही तरी प्रोग्रेस मला गृहसचिवानां दाखवावी लागेल, जर प्यासा कुंयेके पास नही आ रहा है, तो अभी वक्त हो चला है, की कुआ प्यासे की तरफ बढे, जर इतके महिने आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहोत, तर त्याला आपल्याकडे येण्यासाठी मजबूर केलं गेलं पाहिजे "

---------------------------------------------------------------------------------

कतार येथील ऐका हॉटेलमधे

"भाईजान कुछ मिला ?"

"हा कुछ खास नही, बहोतसी चीजे इंक्रीप्टेड है, फिर भी अपने कामकी कुछ समरी-रिपोर्ट्स मिली है, मेजर इक्बाल अभी तो खुश होगेही. "

आय ऐस आय चा मेजर इक़्बालच्या टेबलावर जेव्हा ते समरी-रिपोर्ट्स पोहोचले, तेव्हा त्याला कळून चुकले कि आता भारतीय सुरक्षा यंत्रणानां माहिती आहे, की त्या साखळी बॉम्बस्फोटांमागे अबु-फैसल आहे…. अबू फैसल हे नाव त्यांच्या कानावर कसं आलं, याचा तो विचार करू लागला, कारण समरी-रिपोर्ट्स मधल्या सध्याच्या माहितीवरून फक्त तो तेव्हडाच तर्क करू शकत होता.

---------------------------------------------------------------------------------

'१० साल गुजर गये उस रातको फातिमाआपा, ताभिस्से मैनेभी नही देख्या मैने अपने ऐकलोते लाडकेकू', फिटरका कामके वास्ते हररोज की तरह सुबह को बाहर गया, लेकिन वापीस आयाच नै. कहा होगा मेरा जब्बु. तू नसीबवाली तेरी ऐक लडकीतो बच गयी. अभी उसकेवास्ते तेरेकु जिना चाहिये, जा सो जा…

'हा फरीदा… खुशबू अभी आतेही होगी…' अस म्हणून फातिमा आपल्या घरात गेली खरी ….

पण इकडे फरीदा घरात येवून अस्वस्थपणे विचार करत बसली … आजही तिला तिचा मुलगा जबिउद्दिन त्यादिवशी सकाळीच ग्यारेजकडे जाताना दिसला… तो शेवटचाच…
गावच्या मेळ्यामधे त्याच्या ओरीजनल भारदार खर्जातला आवाजत म्हटलेला फिल्मी डायलॉग 'कितने आदमी थे… तेरा क्या होगा कालिया' …
सगळा मेळा खुश व्हायचा, म्हातारपणामुळ मेळ्या जाऊ शकलो नाही तर, शेजारच्या मुलाने त्याच्या आवाजात रेकोर्ड केलेली क्यासेट घरी आणून दिली होती ……. तीच क्यासेट आणि तोच आवाज, म्हातारपणाचा आधार आहे आपला …. असा विचार करत, तिचा हात टेपरेकोर्डकडे वळाला …

'माशाल्ला क्या डायलॉगबाजी है, कौन है ये चाची ?' खुशबुने विचारलेल्या प्रश्नामुळे फरीदा तंद्रीतून भानावर आली ….

'मेरा बेटा जबी, दंगोमें उसे मैने खो दिया, अल्ला जाने वो अभी जिंदा है या नही …. ' फरीदा उत्तरली …

'जैसेही ऑफिससे आज घर आई, तो आपके घरसे ये आवाजे सुनकर मै यहां देखने के लिये आई, कि आज चाची कोनसा प्रोग्राम देख रही है , इतनी देरशामतक' ……

वाङ्मयकथाविरंगुळा

प्रतिक्रिया

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Feb 2015 - 9:17 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मोठे भाग टाकाहो. वाचतोय. पु.भा.प्र. पु.ले.शु.

प्रथम म्हात्रे's picture

1 Mar 2015 - 4:27 pm | प्रथम म्हात्रे

पुढचा भाग लवकर येऊद्या.
पुलेशु