गूगल फोटोजमधून मिपावर फोटो शेअर करणे. २०२५_०९_२५
गूगल फोटोजमधून मिपावर फोटो शेअर करणे. २०२५_०९_२५
google photos वर 'shared album ' कसा तयार करावा आणि का करावा.
google photos वर आपण फोटो अपलोड करतो किंवा backup करतो.
मिपावर फोटो देण्यासाठी एक वेगळा shared album तयार करून त्यास खास नाव दिले ( उदाहरणार्थ = माथेरान मिपा २०२५_०९_१२ किंवा Goa mipa 2024_11_08 ) तर आपल्याला लक्षात येते की हा अल्बम त्या ठिकाणचे त्या तारखेचे फोटो मिपावर लेखात देण्यासाठी आहे आणि तो आपल्याकडून चुकून डिलीट केला जात नाही. हे झाले नाव देण्याबाबत organiser.
shared album 'मध्ये फोटो ठेवल्याने ते वेगवेगळे share करण्याची खटपट वाचते.

