'गुलज़ार'
सूर श्वासांच्या लयीवर स्वार झाला पाहिजे
काळजाच्या 'कोपऱ्यावर',वार झाला पाहिजे!
दुःखसुद्धा एवढे तालात आले पाहिजे
की सुखांचा,'उंबरा' तय्यार झाला पाहिजे!
जाणिवांची ओल इतकी खोल रुजली पाहिजे
जीवनाचा बाग हिरवागार झाला पाहिजे!
कागदावरच्या फुलांना रंग दे,मधु-गंध दे
शब्द-शब्दाचा तुझ्या 'गुलज़ार' झाला पाहिजे!
शाल श्रीफळ अन् फुलांनी फार झाले आजवर
चंद्र-सूर्यांनी तुझा सत्कार झाला पाहिजे!
—सत्यजित