ही ठमा
लेखनविषय:
आमची प्रेरणा बेसनलाडू यांची गझल पौर्णिमा
चिंब भिजली, काल रात्री, घार गोरी ही ठमा
पावसाच्या कल्पनेने शिंकणारी ही ठमा
भांडण्यांचे रान उठते फक्त थोडे बोलता
केवढी बेजार करते बघ पुणेरी ही ठमा!
का अशी मम नजर खिळली तिच्या पाठीकडे
ओळखू आली कशी ना पाठमोरी ही ठमा?
बघ मला, कोजागिरीला अवस वाटू लगली
(साजरी हल्ली जरा करते गटारी ही ठमा)
राखरांगोळी तुझी बघ "केशवा" होणार ही
लागली राशिस आता रोज वक्री ही ठमा!
वाचने
8152
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
हाहाहा
In reply to हाहाहा by बेसनलाडू
चांदण्यांचे च्या जवळपास
In reply to चांदण्यांचे च्या जवळपास by सहज
कैच्या कै!
हम्म्म!!
हे कसे
मस्त! :)
हा हा हा हा हा हा
In reply to हा हा हा हा हा हा by धोंडोपंत
वक्री आणि वकरी
भाकीत !!