बाबूराव पाटील म्हणजे अवली माणूस. गोंधळे बुद्रुक गावाचे सरपंच; पण रुबाब पंतप्रधान असल्याचा. अडल्यानडल्याची कामं करतील, पण प्रत्येक ठिकाणी मिरवायला मिळालं तर! लग्न असो, मुंज असो, साठी-पंच्याहत्तरी असो की श्राद्ध; बाबूरावांना काही वर्ज्य नाही. श्रद्धांजली सभेतही असं भाषण ठोकणार, की निवडणुकीच्या प्रचाराची सभा आहे की काय, असंच वाटावं.
या अतिउत्साहापायी स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेण्यातही बाबूराव पटाईत. कधी तोंडघशी पडतील, याचा नेम नाही. बरं त्याचं यांना सोयर ना सुतक. आजूबाजूची मंडळीच खजील व्हायची. बाबूराव मात्र जय की थय!
एकदा काय झालं, गावातल्या कुणातरी मान्यवराचं दुःखद निधन झालं होतं.
चांगली गझल
मनःपूर्वक दाद (आणि जित्याची खोड !)
In reply to मनःपूर्वक दाद (आणि जित्याची खोड !) by मुक्तसुनीत
आभार / खडे वगैरे
In reply to आभार / खडे वगैरे by बेसनलाडू
खडे!!
सुंदर..