✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

शीर्षक सुचत नाही - २

ब — बेसनलाडू, Sun, 02/17/2008 - 18:01

प्रतिक्रिया द्या
3908 वाचन

💬 प्रतिसाद (5)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 02/19/2008 - 10:29 नवीन

चांगली गझल

बेला, गझल आवडली. 'त्या' विडंबनाचे दुःख कराया हलके का उगीच नवखे शब्द प्रसवले होते? आणि लक्षात ठेव ते शेर दोन फसलेले (तू मुळात नुसते शब्द बदलले होते) लै भारी !!!! अवांतर :) तिकडेही वाचली होती कविता........पण तिकडे गेल्यावर........मग्रूर मालकाचा संताप येतो. अन आमच्या तोंडात ओव्या यायला लागतात आणि कविता विसरुन जातो, म्हणुन आठवणीने हा प्रतिसाद इथे लिहिला.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Tue, 02/19/2008 - 11:15 नवीन

मनःपूर्वक दाद (आणि जित्याची खोड !)

सर्वप्रथम , वाहवा ! भले शाब्बास ! खुसखुशीत आणि नर्मविनोदी ! आणि खरोखरच चपखल. आणि नेहमीप्रमाणे लागलेले खडे : :-) 'पाडणे' जरी मी तुझे चुकवले होते तोंडावर अमुचे काव्य अपटले होते ... "अपटले" , खटकले. त्या ऐवजी ...तोंडावर माझे काव्य आपटले होते. (मात्रांचा खेळ.) थेंबातलि कवने किती टपकली होती! ..... किंचित मात्रांचा असमतोल. त्याऐवजी थेंबातिल कवने किती टपकली होती! पाऊस 'पाडणे' कुणा न जमले होते!! नको तुला रे शंकाच तुझ्या कवनाची! .... इथे तर केवळ थोडी फिरवाफिरव हवी आहे : शंकाच नको रे तुला तुझ्या कवनाची! बघ खुळे पुन्हा ते लोक हासले होते!! (हे छिद्रान्वेषण नव्हे. तुमची कविता खरोखरच नावीन्यपूर्ण आहे. ....इंग्रजीत सांगायचे तर "व्हर्जिनल !" तिची रचना निर्दोष झाली तर तिला पूर्णता येते असे वाटले.... )
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 02/19/2008 - 11:23 नवीन

आभार / खडे वगैरे

प्रतिसादाबद्दल सर आणि मुक्तसुनीत यांचे अनेक आभार (आभारी)बेसनलाडू लागलेले खडे हे वृत्तनिरक्षरता किंवा हलगर्जीपणा नाही. विडंबनाचा उद्देश ज्या रचनेचे विडंबन केले आहे, तिच्यातील शब्दांत/ओळींत विशेष बदल न करणे (उदा. अपटले), अक्षरगणांची चिंता न करता मात्रावृत्तयोजना (थेंबातिल किंवा थेंबातलि इ.) तसा विशेष बदल न करता विडंबन करणे आणि खरोखरच खडे मारणे, हा असल्याने खडे आलेत ;) (वृत्तसाक्षर)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
क
केशवसुमार Tue, 02/19/2008 - 14:09 नवीन

खडे!!

बेसनशेठ, खरोखरच खडे मारणे!! अहो खडे कसले ... दगड आहेत दगड.. कपाळमोक्ष झाला ना.. त्या तिकडे पलिकडे म्हणालो तसे.. एका दगडात बरेच पक्षी मारलेत..तुफान विडंबन.. आवडलं. केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
व
विसोबा खेचर Tue, 02/19/2008 - 14:17 नवीन

सुंदर..

थेंबातलि कवने किती टपकली होती! पाऊस 'पाडणे' कुणा न जमले होते!! वा! सुंदर.. ! वरील ओळी आवडल्या... तात्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा