Skip to main content

ओळख परेड(नविन सदस्यांची ओळख)

लेखक इनोबा म्हणे यांनी शनिवार, 16/02/2008 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपावच्या कट्ट्यावर दिवसेंदिवस नवनविन सदस्यांची भर पडते आहे.सर्व नविन सदस्यांचे मिपा परिवारातर्फे स्वागत! काही नविन सदस्यांनी आपली ओळख करुन देण्याकरिता स्वतंत्र थ्रेड टाकले आहेत.त्यापेक्षा सर्वच सदस्यांना एकमेकांची ओळख सांगण्याकरिता या एकाच थ्रेडचा वापर करता येईल.अर्थात आपल्याला स्वतंत्र थ्रेड बनवण्याची इच्छा असल्यास आपणास त्याचे स्वातंत्र्य आहे(लोकशाही आहे हो आमच्याकडे),सदस्यांच्या सोयीकरिता हा खटाटोप. नविन सदस्यांना काही अडचणी जाणवल्यास त्या येथे टाकाव्यात,जाणकार सदस्यांकडून तत्काळ मदत होईल. आपलाच मिपाकरी, इनोबा

वाचने 40995
प्रतिक्रिया 96

प्रतिक्रिया

In reply to by सुमीत

कधी येताय बोला! उद्या येताय? वाट पाहतो.. यायच्या आधी कृपया ९८२०४९४७२० या क्रमांकावर फोन केलात तर बरं पडेल.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

तात्या झोल माणूस दिसताहेत .. एकाच चलतध्वनि मध्ये दोनदा ४२०.. ते पण उलट सुलट... काही खरं नाही.. मिपाचे..

नमस्कार मिसल पाव् करानो, मी (उगाच आम्ही म्हटल कि १० वर्षानी वय वाढल्यासारखा वाटत, म्हणून एकारर्थीच सम्बोधन बर वाटत...... ) परेश (ऊर्फ: तात्या विन्चू). मुम्बईत रहात असुन एका MASTEK नावच्या सन्गणक आज्ञाप्रणाली कम्पनी मध्ये कार्यरत आहे. VESIT (विवेकानन्द, चेम्बुर) मधून B.E. केलेला आहे. हे सर्व झाल Official Introduction. आता बाकी गोष्टीकडे वळुयात. मला आवडणारणार्या गोष्टी : सन्गीत, नविन मराठी गाणी (विशेषत: सन्दीप खरे, सलिल कुल़कर्णी) , ट्रेकीन्ग, चित्रकला व छायाचित्रकला इत्यादी इत्यादी . अगदी महाविद्यालयीन काळापासून B.B.C. (Bank Benchers Committee) चा निष्ठावान सदस्य. बाकी ओळख हळु हळू होतच राहिल..... आपला, तात्या विन्चू

In reply to by तात्या विन्चू

मी २००४ साली मॅस्टेक मधून डेलॉईट ला गेलो, आपण महापे ला असता की सीप्झ मध्ये? ट्रेकींगचा कार्यक्रम ठरविलात तर मला आवर्जून सांगा.

In reply to by सुमीत

सुमीत , मी Presales Department मध्ये असल्याने सीप्झ मध्ये असतो. SDF 6 मध्ये. आपण trekking साठी एक वेगळा चर्चा धागा मिपा वर चालू करुया. तिथेच सर्व Trekkers ना चर्चा करता येइल. आपला, ओम फट स्वाहा... तात्या विन्चू

बरेच दिवसांपासून नुसतेच येऊन प्रकाशित साहित्य वाचून जात होतो. सदस्य व्हायचा आळस आला होता. इस्ट कोस्ट कर बरेच जण दिसले आणि आज आळस झटकून करुनच टाकली नोंदणी. मी चैतन्य काळे. सध्या बॉस्टन ला Masters in Computer Science करतो आहे University of Massachusetts Boston मधून. लयी ब्येस हाये बाकी मि.पा.

धमाल्या तू सध्या मि पा नीट वाचत नही असे दिसते....मी एकदा माझा परिचय दिलेला आहे( परी स्वतःचा परिचय कसा करुन देत असेल?) तरी पण भौ तुझ्या खातर परत एक डाव बोलतो.... मी एक आय टी सल्लागार्.(हो सल्ला देउन गार करणारेच) एस ए पी मधे सल्लागार् आहे. पंचविशी कधीच सरली पण अजून मानसीक दॄष्ट्या अजून तिथेच आहे....तसेच उपद्व्याप्...तसेच वागणे.... आपली दोस्त लोकं पण तसलीच...... मी ऑफीस संपले की मग्..नाटके लिही.....पुस्तक लिही.......गप्पा टप्पा हाण्...बासरी वाजव्....पेटी वाजव ... एकपात्रि कर कार्यक्रम कर असले उद्योग करतो... सातारा......अजून डोक्यतुन काही जात नाही........ बरेच मुम्बैकर मला आडनाव सांगेपर्यंत उगाचच चित्पावन समजतात( मराठी भाषे मुळे....वागण्यामुळे नव्हे.... शाह असलो तरी खरा मराठी आहे.) ही धमाल मी मस्त एन्जॉय करतो आपला....मस्त सातारी मिसळ आणि खास सातारि पदार्थ्....म्हाद्या....... पोवइ नाक्यावरची पुरी भाजी.....ओरपणारा आनंदी.......विजुभाऊ

नमस्कार बन्धु भगिनींनो, मी प्रशांत कवळे, अलिबाग मधल्या एका छोट्याश्या गावातला.. सासवने म्हणुन. पेशाने ERP (SAP) CONSULTANT. जन्मतारीख १४ फेब्रुवारी . शिक्षण अलिबागला आणि पुण्यात झाले. आत्ता पर्यन्त ४ नोकर्‍या झाल्या, पाचवी चालू आहे. प्रोजेक्ट निमित्त सध्या "अरबांच्या देशात" आहे, अजुन १ वर्ष तरी रहावे लागेल. आवड: जुनी गाणी ऐकणे, मैदानी खेळ खेळणे, तळ्याच्या काठावर बसून गळाने मासे पकडणे आणि सासवन्याच्या समुद्रावर भटकणे. प्रोजेक्टनिमित्त भारतभ्रमण केले ( सौजन्य : ओ.एन्.जी.सी. व ऑइल इण्डीया ), आवडलेला भारतातला भाग - आसाम ( १ वर्ष होतो). पुन्हा मोका मिळाला तर तिथे जायला आवडेल. कोणी मि.पा.कर जर सौदी मध्ये असतील तर मला कळवा. माझा भ्रमणध्वनी +९६ ६५३१८२६८९१ आपला.. मि.पा. माध्यमातून भारतात असलेला, प्रशांत.

मी बोरीवलीच्या गो-यांची एकुलती एक मीनल . आता मीनल संजय गद्रे.त्याला ही १८ वर्ष झाली आहेत. एक मुलगा ११वीत शिकतो आहे.संजय आय टीत आहे. मी Economics मधे Mumbai Univercity मधून MA केले. नंतर B.Ed ही केले. प्राध्यापिका म्हणून मुंबईत १३ वर्ष काम केले. नंतर ५ वर्ष बीजिंग ,चीन येथे राहिले ,तिथे ही टिचींगचे काम केले. ई सकाळ ,लोकसत्ता ,म.टा.मधे अनेक लेख लिहिले. चीन जाणला ,अनुभवला. आता अमेरिकेत आहे. लवकरच इथे काम किंवा शिक्षण सुरू करेन. लेखन ,वाचन,संगित्,पेंटिंग, कलेची आवड आहे.भटकायला आवडतं. अमेरिका , इंग्लंड,स्वित्झर्लंड्,जर्मनी ,सिंगापूर ,बेंकॉक्,कंबोडिया ,चीन,जपान्,कोरिया,सिंगापूर,मलेशिया असे देश हिंडले. भारत ही पाहून झाला आहे बराचसा. सर्वात आशिया खंड मनाला भावला. खूप खूप मैत्रिणी आहेत.जुने जुने संबंध जपून ठेवले आहेत. मि.पा वर नवीन ओळखी होत आहेत. मी शेगावच्या श्री गजानन महाराजांची भक्त आहे. आत एवढिच ओळख पुरेशी आहे.

नमस्कार, मी उदय, सध्या अमेरिकेत राहतो. Codecutter म्हणून नोकरीधंधा करतो.

कोऽहम्.... हे सध्या मिसळपावावर संस्कृतचे लोणी चढलेले आहे म्हणून. मी दिलीप खांडेकर, व्यवसायाने अभियंता आणि इंग्रजी शिक्षक सुद्धा. वय ५८. माझा आणि मराठीत पहिलाच "इंग्रजी-मराठी क्रियापद कोश" (English to Marathi Verb Dictionary) प्रसिद्ध झाला आहे. मी ब्रह्मचारी आहे आणि स्वत:चे घर नाही त्यामुळे वेगवेगळ्या lodge मध्ये माझा मुक्काम असतो. नक्की पत्ता सांगता येणार नाही. Computer चे फारसे ज्ञान नाही. हे सर्व भाचीच्या सहाय्याने लिहित आहे.

मी.. राज जैन..... मुळ कोल्हापुरचा, शिक्षण कोल्हापुर नुतन मराठी शाळेत, १०वी नापास.... ;( घरातून पळून गेलो होतो वयाच्या १६ व्या वर्षीच..... :))) बरोबर १४ वर्षानी घरच्यांना दर्शन दिले होते (तो पर्यंत घरी फोटोवर हार चढला होता.... ) प्रचंड प्रवास आवडतो.. त्यामुळे देशातील एक ही राज्य असे नाही जेथे आम्ही पाय ठेवला नाही..... छोटी मोठी काम करता करता संगणक दुरुस्त करण्याचे शि़क्षण मिळाले व त्याचाच उपयोग करुन मोठ मोठ्या कंपन्यामध्ये काही वर्ष काम केले व जमा पुंजी गोळा करुन स्वतःची कंपनी चालू केली तीन वर्षापुर्वी ... देवाच्या दयेने संध्या कंपनी प्रा.ली. झाली व २५ जणानां रोजगार देत आहे.. सध्या देशाच्या राजधानी मध्ये मुक्कामी असतो पण काही कार्यानिमीत्य विदश भ्रमण करत आहे, पुढील महीन्यामध्ये वापसी. जरा नेट वापरणे येथे अवघड आहे त्यामुळे फक्त वाचन चालू आहे.... (तात्रंक अडचण नसून व्यवहारीक अडचण आहे ;))) राजे

मी विवेक विद्वा॑स.. मुळचा केळशीचा पण आता कल्याण देशी राहत होतो.. आता पुण्यात असतो... सध्या तेलाच्या (Indian Oil Corpoation Ltd)दुकानात कामाला आहे . सध्या इतका परीचय पुरेसा आहे.. आपला विवेक विद्वा॑स.

मी जन्मापासून मुंबइकर, अट्टल मुंबइकर. सुक्श्म बालपण गिरगावात नी त्या नन्तर १९८४ पासून मु. पो. बोरिवली. गिरगावातील आर्यन एज्युकेशन ही पहिली शाळा. त्या नन्तर बोरिवली मधली विद्या विकास सभा. ह्यातल्या विद्या च्या इन्ग्रजी स्पेल्लिन्ग चा उच्चार आमचे काही मित्र विड्या असा करायचे (मी त्यांचं बोलणं मागाहून मनावर घेतलं) वयाची २८ वर्षे मुंबइत घालवल्यावर, सद्ध्या आत बंगळूर ला आलोय. पोटा पाण्या साठी एका जाहिरात कंपनी मधे जाहिरात लेखक म्हणून पाट्या टाकतो. आपल्या पैकी कुणी बंगळूर मधे असाल तर अवश्य सम्पर्क सधावा. मि. पा. ची एक भेट इथेही घडवू. कालच आपला छोटा डॉन ह्याच्याशी बोलणं झालं. ह्या नंबर वर माझ्याशी संपर्क साधू शकाल ९८४५६५५५५८ आपला, स्वयंभू

मी अभिजीत, मुळचा कोल्हपुरचा. सद्या पुण्यात असतो . घरात प्रेमाने मला बन्ड्या म्हनतात, इथे आल्यावर कसे घरी आल्यासारखे वाटते म्हणून हे घरचेच नाव निवडले . इथे पुण्यात डालड्याच्या (सुर्यफुल) कंपनीत कामाला आहे. चाणाक्ष लोकांनी डालड्याची कंपनी ओळखली असेलच...... कोल्हापुरचा असल्याने मिसळ, मिर्ची,मटण यांचा by default चाहता आहेच. फुटबॉल ,कुस्ती यान्चि हि आवड आहे. खाणे, गाणे , फिरणे हे आणखी काही आवडते उद्योग.... आमच्या कलांपेक्ष अवकलाचं जास्त आहेत त्यामुळे इथे त्या सांगत नाही. ................... आपला बन्ड्या

इथे बरेच नवे सदस्य आहेत.... त्यानी या धाग्यावर परिचय द्यावा पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

मी क्षितिजा. मुळची खालापूर. शिक्षण खोपोली. आता पुण्यात नोकरी करत आहे. (software eng.) म्हणुन. वय वर्ष २४ पुर्ण. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

मी, वैशाली हसमनीस.ठाण्याच्या न्यू गर्ल्स स्कूल मध्ये३७ वर्षे शिक्षक म्हणून सेवारत होते.२वर्षापूर्वी सेवामुक्ति.मूळची राहणार डोंबिवली पण सध्या वास्तव्य मलेशिया येथे.मुलगा व सून येथील मेडिकल महाविद्यालयात अधिव्याख्याते म्हसणून सेवारत.गेले बरेच दिवस इंग्लिश व संस्क्रुत यांचे अध्यापन,त्यामुळे त्या विषयांची जास्त गोडी.वाचन,लेखन,कविता करणे ही आवड.व्यवसायामुळे अनेक शैक्षणिक ,सामाजिक संस्थाशी बांधिलकी.मि.पा.वर नुकतीच ओळख.तात्या,आपला वर्गमित्र मुकुल पालवणकर माझा भाचा.तो हल्ली आपल्याच गावात राहतो,हीच ओळख पुरे.

नमस्कार, मी ह्रषिकेश थिटे. मुळ गावः अहमदनगर. (चतुरंग=> मी पण भा.फि.हा मधेच होतो. ) सध्या पुण्यात एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करतो. http://sucheltas.blogspot.com

,मी वैशाली हसमनीस,मि.पा.वर नव्यानेच दाखल.राहणार मूळची डोंबिवलीची पण सध्या वास्तव्य मलेशिया येथे.ठाण्याच्या न्यू गर्ल्स स्कूलमध्ये ३७ वर्षे शिक्षक म्हणून कार्यरत होते.२ वर्षांपूर्वी सेवानिवृत्त.संस्कृत व इंग्लिश या विषयात एम्.ए.(१९७० साली ) तेव्हांपासून १२वी पर्यंत ह्याच विषयांचे अध्यापन.वाचन,लेखन,कविता करणे ही आवड.नाटक हा प्राण्.निवृत्तीमुळे मोकळा वेळ भरपूर.त्यामुळे हे सर्व काही करण्यास वेळ मिळेल ही आशा.मुलगा व सून येथील वैद्यकिय विद्यापीठात प्राध्यापक.त्यांच्याबरोबर मलेशियात दाखल.तात्या,आपला वर्गमित्र मुकुल पालवणकर आठ्वतो का? तो माझा भाचा.एवढी ओळख पुरे.मि.पा.ला कोणतीही मदत करण्यास तयार आहे.

राम राम मन्डळी !!! अनिल हुले..... पिम्परी पुने...जन्मठिकाण....... सध्या (निन्ग्बो) चायना मध्ये... क्यु सी मॅनेजर म्हणुन पाट्या टाकायच काम करतोये.... बाकी ब-याच आवडी -निवडी आहेत... आणी सध्या मिपा वर पडीक राहणे ,हा आवडता छन्द....... -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

मी,वैशाली हसमनीस,मि.पा. वर नव्याने दाखल.ठाणे येथील न्यू गर्ल्स स्कूल मध्ये ३८ वर्षे शिक्षक म्हणून सेवारत होते.२००७ मध्ये निवृत्त.मूळ राहणारी डोंबिवलीची पण सध्या वास्तव्य मलेशिया येथे.संस्कृत व इंग्लिश हे विषय घेउन एम्.ए.बी,एड.(१९७० साली) तेव्हापासून ह्याच विषयांचे अध्यापन.वाचन,लेखन,कविता करणे ही आवड.मुलगा व सून हे दोघेही येथील वैद्यकीय विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत,त्यामुळे मलेशियात आले.येथील लोकजीवनाचा अभ्यास करण्याचा मानस.सध्या भरपूर मोकळा वेळ त्यामुळे मि.पा.ला कोणतीही मदत करण्यास तयार.तात्या,आपला शाळासोबती मुकुल पालवणकर आठवतो कां? तो माझा भाचा.एवढी ओळख पुरे.

:H मी,वैशाली हसमनीस,मि.पा.वर नव्यानेच दाखल.मूळ राहणारी डोंबिवलीची पण सध्या वास्तव्य मलेशिया येथे.ठाणे येथील न्यू गर्ल्स स्कूलमध्ये ३८ वर्षे शिक्षक म्हणून नोकरी करून २००७ मध्ये सेवानिवृत्त.संस्कृत व इंग्लिश हे विषय घेऊन १९७० मध्ये एम्.ए.बी.एड. तेव्हांपासून ह्याच विषयांचे अध्यापन.क.डों.म.पा.च्या शिक्षण मंडळावर युती सरकारच्या काळात नियुक्ति,५वर्षे ते काम केले.वाचन,लेखन,कविता करणे ही आवड.सध्या भरपूर मोकळा वेळ.त्यामुळे आवड जोपासता येइल असे वाटते.मुलगा व सून येथील वैद्यकिय विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत.त्यांच्याबरोबर मलेशियात दाखल.मि.पा,ला मदत करण्याची तयारी.तात्या,आपला शाळासोबती मुकुल पालवणकर आठवतो कां? तो माझा भाचा.एवढी ओळख पुरे झाली की!

मि अन्जलि रहानार भान्डूप एका प्रसि ध्द construction company     मधे Leagal Manager म्हनुन काम करते. मिपा वर येण खुप आवड्ते.

मी शैलेंद्र, डोंबिवलीचा... शिक्षण- जैव्-तंत्रज्ञानात पद्व्युत्तर पदवी.. एका बहुराष्ट्रिय संस्थेत पणन आधिकारी. पण खरी ओढ ईतिहासाची.... भटकायला, गाडी चालवायला, डोंगर तुडवायला आवड्तं.

या लेखाला प्रतिसादांची संख्या खुप झालीये कृपया नवीन चर्चा सुरू करावी. धन्यवाद.