मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संडे स्पेशल ( कोंबडी वडे)

स्वाती राजेश · · पाककृती
धोंडोपंत भाऊ यांच्या विनंती वरून ही रेसपी देत आहे. कोल्हापूर मध्ये ही वडा कोंबडा या नावाने ओळखतात. (संजीव कपुर ची रेसिपी आहे) साहित्यः १/२ किलो चिकन मेरिनेटः १/२ टी.स्पून लसूण पेस्ट १/४ टी.स्पून आले पेस्ट १टे.स्पून कोथिंबीर २-३ हिरव्या मिरच्या मसाला: २ टे.स्पून सुके खोबरे ४-५ ला मिरच्या ४ टे,स्पून ओले खोबरे ४-५ कांदे ४टे.स्पून तेल १/४ टी.स्पून हळद २ टी.स्पून मालवणी गरम मसाला चवीनुसार मीठ १.प्रथम करी साठी चिकन मेरीनेट करणे (दिलेल्या मेरीनेट्च्या साहित्याने) २.सुके खोबरे, लाल मिरच्या कोरडेच भाजून, गार झाल्यावर त्याची १/२ कप पाणी घालून पेस्ट करणे. ३.एका कढईत थोडे तेल घेऊन त्यात ३ कांदे चिरून टाकावेत गुलाबी रंग झाल्यावर त्यात ओले खोबरे टाकणे कडेला तेल सुटेपर्यंत (किंवा ब्राऊन होईपर्यंत)परतणे.गार झाल्यावर त्याची पेस्ट करणे. ४.परत कढईत उरलेले तेल घालून २ कांदे चिरून टाकणे. ब्राऊन होइपर्यंत परतणे.त्यात मेरेनेट केलेले चिकन टाकणे. २ कप पाणी टाकुन बॉईल करणे. नंतर सुके खोबरे,मिरच्या यांची पेस्ट मिक्स करणे. मालवणी मसाला टाकणे. ३-४ मिनिटांनी त्यात कांदा, ओले खोबर्याची पेस्ट टाकणे.गॅस मेडियम करून चिकन शिजवणे.चवीनुसार मीठ टाकणे. वडे:(२ वाट्या तांदुळ,१ वाटी हरभराडाळ,१/४ वाटी उडद डाळ,१वाटी गहू,४-५ दाणेमेथ्या ) हे सर्व रवाळ दळुन आणणे. २ वाट्या पीठ १/४ टी.स्पून हळद १टी.स्पून तिखट मीठ चवीनुसार, तेल तळण्यासाठी १.पीठात हळद, मीठ, तिखट आणि २ टी.स्पून तेल घालून कोमट पाण्यात मळणे. २.प्लॅस्टीकच्या कागदावर पुरीएवढे गोळे थापून तेलात ब्राऊन रंगावर तळून काढा. वरील करी कोथिंबीर घालून वड्या सोबत खाणे.

वाचने 13233 वाचनखूण प्रतिक्रिया 5

विसोबा खेचर Sun, 02/17/2008 - 10:19
ख ल्ला स..! तूर्तास इतकेच म्हणतो...! संतमंडळी म्हणतात, 'मनात मोह, माया. लोभ यांना थारा देऊ नका.' अहो पण या अश्या पा कृ वाचल्यावर कसं जमायचं हो हे?! :) असो.. स्वातीताई, तुमच्यामुळे आणि प्रभाकरपंतांमुळे मिपाचं स्वयंपाकघर दिससेंदिवस समृद्ध होत आहे एवढं मात्र खरं!... आपला, (तृप्त!) तात्या.

प्रभाकर पेठकर Sun, 02/17/2008 - 10:31
एकाच दिवशी कोलंबी भात आणि कोंबडी- वडे अशा दोन दोन फर्मास पाककृत्या दिल्यावर काय करावे बरे....? काय करावे ह्याचा निर्णय न झाल्याने आजचा रविवार उपासच घडणार असे दिसते.

नेहमीप्रमाणेच सुंदर पाककृती.
कोंबड्याच्या  तळलेल्या, उकडलेल्या , भाजलेल्या  पीसाचे आम्ही चाहते.
आपली पाककृती  " आमच्या  किचनचा मुड " पाहून बनवायला सांगीन.
बाय द वे, चिकनच्या पीसला जे पेष्ट लावतात तळण्यासाठी,  ते हरभ-याचे पीठ त्याबरोबर आणखी काय असले पाहिजे ?

अवांतर :) आम्ही आमच्याकडे नॉन व्हेज रेसेपीचे दोन चार पुस्तके आणलेली आहेत. पण कोणाची नजर लागते कोणास ठाऊक.
आम्ही अनेकदा प्रयत्न केलेत, पण पुस्तकातल्या पाककृतीची   टेस्ट प्रत्यक्षात कधी आलीच नाही :(

स्वाती राजेश Sun, 02/17/2008 - 16:52
डॉ. बिरुटे सर, वरील पाककृती दिली कारण मी जशी करते तशी पाककृती मी अगोदर दिली आहे तरी पण आता देत आहे. तशी केलीत तर मस्त टेस्ट येईल. १/२ किलो चिकन, २टे.स्पून तीळ,१ टे.स्पून खसखस,२ टे.स्पून सुके खोबरे,२ टे.स्पून ओले खोबरे,२+१ कांदे, १/२ टी.स्पून लसूण,१/४ टी.स्पून आले, १/४ टी.स्पून हळद, १ टी.स्पून गरम मसाला.२टी.स्पून तेल, मीठ चवीनुसार प्रथम खोबरे, तीळ्,खसखस, कांदे भाजून घ्यावे. आले,लसुण कोथिंबीर वाटून घ्यावे एका पातेल्यात तेल घालून १ कांद बारीक चिरून त्यात घालावा,नंतर तिखट घालावे व परतावे. नंतर वरील बारीक केलेल मसाला घालून तेल सुटे पर्यंत परतणे.नंतर चिकन घालून शिजवणे.चवीनुसार मीठ घालणे. रस्सा जास्त पातळ नको.

प्राजु Tue, 02/19/2008 - 02:04
स्वाती.. 'मिसळपाव' म्हंटले की, केवळ कोल्हापूरी मिसळच आठवते तसेच मिसळपाव . कॉम म्हंटले की कोल्हापूरी पाककृतीच आठवायला लागल्या आहेत. इतकी मस्त रेसिपी दिली आहेस ना इथे.. काय सांगू? आता तात्याना, इथे कोल्हापूर दरबार नावाचा एक पाककृतींचा टॅग बनवायला सांगायला हवा. - (कोल्हापूरी मिरची) प्राजु