मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संडे स्पेशल ( कोळंबीचा भात)

स्वाती राजेश · · पाककृती
तात्यांच्या विनंतीला मान देऊन...... साहित्यः १/२ किलो कोलंबी १/२ किलो तांदुळ ४-५ वाट्या नारळाचे दुध (साधारण २ नारळाचे) १ टी.स्पून तिखट २ टी.स्पून आले, लसुण पेस्ट ( १ इंच आले व ७-८ लसूण पाकळ्या) १वाटी तेल मसाला (४ लवंगा,२ दालचिनीचे तुकडे, ४ वेल्दोडे, १/२ टी.स्पून जिरे, २ तमाल पत्रे) १ टी.स्पून गरम मसाला १ टी.स्पून बडीशेप, १ टी.स्पून जिरे पावडर १.टी.स्पून हळद चवीनुसार मीठ १.तांदूळ धुवून निथळत ठेवावेत. २.कोळंबी धुवून हळद व मीठ लावून ठेवावी. ३.पातेल्यात तेल गरम करून त्यात वरील मसाला घालावा. त्यात मीठ लावलेली कोलंबी घालावी व वाटलेले आले, लसूण घालून परतावे. गरम मसाला, तिखट व हळद घालावी व निथळून ठेवलेले तांदूळ घालून परतावे. त्यात नारळाचे दूध घालावे नंतर आवश्यक वाटल्यास १ भांडे पाणी घालुन व चवीनुसार मीठ घालून मंद आचेवर ठेवावे. भात शिजवावा. सर्व्ह करताना कोथिंबीर आणि साजुक तूप घालून वाढावी. टीप: पांढरा कोलंबी पुलाव हवा असल्यास वरील रेसिपी मध्ये हळद वापरू नये व तेलात कांदा(जास्त परतू नये) टाकून मग मसाला घालावा.... कोलंबी जेव्हा स्वस्त ताजी मिळते तेव्हा ती व्यवस्थित साफ करून स्वच्छ धुवावी. त्याला हळद, मीठ चोळावे व लोळंबी तेलावर खरपूस तळावी. थंड झाल्यावर एअर टाइट डब्यात घालून फ्रिजर मध्ये ठेवावी. हवी तेव्हा थोडी थोडी वापरता येते. साधारण २ महिने टिकते.

वाचने 9037 वाचनखूण प्रतिक्रिया 2

विसोबा खेचर Sun, 02/17/2008 - 10:10
स्वातीताई, माझ्या विनंतीला मान देऊन कोलंबीभाताची पा कृ इथे दिल्याबद्दल धन्यवाद... माझी ही अत्यंत म्हणजे अत्यंत फेवरेट पा कृ आहे... :) तात्या.

प्रभाकर पेठकर Sun, 02/17/2008 - 10:18
व्वा..व्वा... रविवार सकाळी सकाळी मिपा उघडले आणि .....उघडले स्वर्गाचे द्वार... कोलंबी भाऽऽऽत...... खल्लास! नारळाच्या दुधाने कोलंबी भाताला खास राजेशाही चव येणार ह्यात शंका नाही. धन्यवाद.