साहित्यः
बांगड्याचे ६ तुकडे (मध्यम आकाराचे)
लसूण पाकळ्या ६/७
धणे पावडर ३/४ चहाचा चमचा
हळद चिमूटभर
लाल मिरची पावडर १ चहाचा चमचा
कोकमचे तुकडे ३/४
तेल १ चचमचा
पाणी १/२ कप
मीठ चवीनुसार
पध्दतः
लसून ठेचून घ्या. कढईत तेल तापवून त्यात ठेचलेला लसूण १ मिनिट भाजून घ्या. नंतर धणे पावडर, मिरची पावडर, हळद घाला. १ मिनिटानंतर बांगड्याचे तुकडे घालून परता.आता १/२ कप पाणी घाला. कोकमचे तुकडे घालून मासे शिजवून घ्या. (बांगडे पारदर्शक रंग सोडून पांढरट दिसायला लागले की शिजले आहेत असे समजावे.
धक्कादायक बातमी वाचून काय बोलावे तेच कळेना...
चांगला परिचय..