मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझे अभंग माझी गाथा

केशवसुमार ·

चतुरंग Tue, 02/26/2008 - 21:22

प्रत्येक कवन | आले ते घेऊन|
विडंबी प्राक्तन | जालावरी||

केशवापरते | वाचले जाई ते|
'वाचे ना' तरी ते | विडंबनी ||

'केशवसुमारा' | मि.पा.चा मोहरा |
बाकि तें पैजारा | म्हणे 'रंग्या'||

चतुरंग

विसोबा खेचर Tue, 02/26/2008 - 12:22

ठेवा हा सुखाचा | निर्व्याज स्मिताचा |
विसर दुःखाचा | पाडो थोडा ||

हेच खरं रे केशवा! क्या बात है...

असो, आमच्या विनंतीला मान देऊन इतके सुरेख विडंबन लिहिल्याखातर केशवा तुला दंडवत...

तात्या.

सहज Tue, 02/26/2008 - 13:17

>आमच्या विनंतीला मान देऊन इतके सुरेख विडंबन लिहिल्याखातर केशवा तुला दंडवत...

१००% सहमत.

आवडले.

बेसनलाडू Tue, 02/26/2008 - 13:41

'काम'सू सचिव | कलीग रेखीव |
शेजारी आखीव | छळतात ||

नित्य ही पहाणी | दूर ती साजणी |
जनांस कहाणी | सांगवेना ||

वावावा!!! :)

(प्रेक्षक)बेसनलाडू

प्राजु Tue, 02/26/2008 - 20:08

थोडी करूणेची झालर आहे  या विडंबनाला. विडंबनापेक्षा काव्यच म्हणेन मी याला.

चिडते साजणी | फेकते लाटणी |
पळते त्या क्षणी | झोप माझी ||

इथे मजा आली

एकटा पडतो | दारूत बुडतो |
दिवस काढतो | कसे तरी ||

मात्र इथे हेलावलं मन.

- (सर्वव्यापी)प्राजु

सुधीर कांदळकर Tue, 02/26/2008 - 20:20

लक्ष लक्ष दंडवत कमी पडतील.

धक्के ते मुद्दाम | नजरा उद्दाम |
बायको सद्दाम | सोय नाही! ||

चिडते साजणी | फेकते लाटणी |
पळते त्या क्षणी | झोप माझी ||

बायको ठेक्यात| नवरा धाकात |
आयुष्य धोक्यात | ठरलेले ||

या ओळी जास्त आवडल्या. बहोत खूब.

पुढील कवितेची वाट पाहातो. शुभेच्छा.

पिवळा डांबिस Wed, 02/27/2008 - 07:28

स्वप्ने मी पाहिली | कर्जे ही काढली |
खोपटी बांधली |  एकदाची ||

हा हप्ता बिकट | घेतला फुकट |
वाचेना नकद | काही केल्या ||

पर्देशी राबावे| हातचे राखावे| 
डॉलर जोडावे| ठरवतो||

प्रपंच चांगला | सोडूनि पातला |
एकटा राहिला | दूर देशी ||

भावना सारुन | मनाला मारून |
वास्तव दारुण | स्वीकारले ||

खरंच आहे ते!!!

छान, छान केशवसुमार, छान लिहिलंय!!!

लिखाळ Wed, 02/27/2008 - 21:39

मस्त विडंबन ! जियो !

--लिखाळ.

'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

केशवसुमार गुरुवार, 02/28/2008 - 11:51

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार.

केशवसुमार

आजानुकर्ण गुरुवार, 02/28/2008 - 13:52

'काम'सू सचिव | कलीग रेखीव |
शेजारी आखीव | छळतात ||

नित्य ही पहाणी | दूर ती साजणी |
जनांस कहाणी | सांगवेना ||

जबरा विडंबन केशवसुमाराचार्य

(हसरा) आजानुकर्ण

धनंजय गुरुवार, 02/28/2008 - 18:20
मुळातला विषय वेगळ्या कळकळीचा होता, म्हणून "तिचे अभंग" कविता लांब वाटली नाही. विडंबन मात्र विषयाच्या किरकोळपणामुळे फार लांबल्यासारखे वाटते.

काही विडंबने समश्लोकी करू नये - "मना सज्जना ट्रामपंथेचि जावे" या  पु. लंच्या विडंबनात थोडेच श्लोक आहेत - प्रत्येक मनाच्या श्लोकाचे विडंबन न करण्याचा त्यांचा संयम त्या ठिकाणी शहाणपणाचा वाटतो, नाही का?

In reply to by धनंजय

बेसनलाडू गुरुवार, 02/28/2008 - 23:39

बव्हंशी सहमत.

काही विडंबने समश्लोकी करू नयेत हे मी 'समश्लोकी' हा शब्द गाळून वाचले, तेव्हाही (जास्तच) सेन्सिबल वाटले. असो.

(सेन्सिबल)बेसनलाडू

In reply to by धनंजय

विसोबा खेचर Fri, 02/29/2008 - 07:44

म्हणून "तिचे अभंग" कविता लांब वाटली नाही. विडंबन मात्र विषयाच्या किरकोळपणामुळे फार लांबल्यासारखे वाटते.

धन्याशेठ, लेका तू प्रत्येक वेळेला काव्याचं मारे समिक्षण वगैरे करतोस ते ठीक आहे परंतु तू स्वत:ही काही उतमोत्तम काव्य करत जा की!

नायतर आमच्या संगीतातल्या सारखं व्हायचं! काही महाभाग स्वत:ला 'सा' लावायची माहिती नाही आणि मारे किशोरीताईंच्या, अण्णांच्या गाण्याचं समिक्षण करतात!

आमच्या किशोरीताई नेहमी म्हणतात, 'आधी किमान १० मिनिटे तरी दोन तंबोर्‍यांमध्ये बसून १०० लोकांसमोर गाऊन दाखवा आणि मग करा समिक्षण!' :)

असो...

तात्या.

In reply to by विसोबा खेचर

धनंजय Fri, 02/29/2008 - 22:31
प्रत्येक वेळेला काव्याचं मारे समिक्षण वगैरे करतोस
प्रत्येक वेळेला नाही बरे का! केशवसुमारांसारख्या कुशल शब्दकाराला आवर्जून उत्तरे देतो. नाही दिले तर तिकडून "न लिहिणार्‍यांना धन्यवाद" म्हणून टोमणे मारतात. कुशल आहे, म्हणून प्रतिसाद द्यावासा वाटतो, नका देऊ म्हटले तर नाही देणार. त्यांना लक्षात असेल तर भरभरून प्रशंसाही केली आहे. प्रत्येक वेळेला एकच "आवडले" म्हणून आणि एक कडवे उद्धृत करून प्रतिसाद तर एखादे यंत्रही देऊ शकेल. माझ्या प्रतिसादांत कविता नीट वाचल्याचा दाखला कधीकधी सापडावा.

'आधी किमान १० मिनिटे तरी दोन तंबोर्‍यांमध्ये बसून १०० लोकांसमोर गाऊन दाखवा आणि मग करा समिक्षण!'
येथे मी चार सहा कविता दिलेल्या आहेत. त्यांत काहींत "सा" लागला आहे, काहींत नाही. मिसळपावावर १०० लोक तरी आहेत (खरा आकडा तुम्हाला ठाऊक!). किशोरीताईंनी असे म्हटले आहे का की १०० लोकांसमोर त्यांच्याइतकेच चांगले गायले पाहिजे? आणि बहुधा असेही म्हटले नाही की प्रत्येक समीक्षणापूर्वी १० मिनिटे २ तंबोर्‍यांमध्ये बसावे.

मुख्य म्हणजे मी प्रतिसाद समीक्षक म्हणून नव्हे तर आस्वादक म्हणून लिहीत आहे. आणि आस्वादकाला कलाकाराइतकी प्रतिभा असलीच पाहिजे असा नियम नाही, आणि बहुधा नसतेच. माझ्यापाशी केशवसुमारांइतकी प्रतिभा नाही, याबाबत मला शंका नाही. समाधान व्हावे.

काही काव्य सुचले तर  लिहीन. इथेच लिहीन. फोटोही जमल्यास टाकीन. तेही येथील अन्य छायाचित्रकारांच्या तोडीचे नाहीत - फक्त तंबोर्‍यांच्या मध्ये बसल्याचा पुरावा म्हणून.

तसे हलकेच घेतले आहे, गैरसमज नसावा.

In reply to by धनंजय

केशवसुमार Fri, 02/29/2008 - 13:44
धनंजयशेठ,
सपष्ट अभिप्राया बद्दल धन्यवाद..
विडंबने समश्लोकी करू नये  किंवा बेला म्हणतात तसे मुळात विडंबनंच न करणे ( जरा जास्त होतयं .. ;) ) विचार करण्यास हरकत नाही..
केशवसुमार

In reply to by केशवसुमार

बेसनलाडू Fri, 02/29/2008 - 13:51

बेला म्हणतात तसे मुळात विडंबनंच न करणे ( जरा जास्त होतयं .. ;) ) विचार करण्यास हरकत नाही..

हे काही निवडक कविता / गझला यांच्या बाबतीत पाळले जाणे किंवा याचे विवेकी उल्लंघन करणे कधीकधी आवश्यक होऊन जाते, असे वाटते. हे बोलायला मी काही तज्ज्ञ, जाणकार, मोठा कवी वगैरे वगैरे नाही; मला तसा अधिकारही कदाचित नाही. पण एका जुन्या सुभाषितातील एक ओळी आठवली आणि संबंधित वाटली, ती येथे उधृत करण्याचा मोह आवरत नाहीये -

अतिपरिचयादवज्ञा सन्ततगमनादनादरो भवति

बाकी आपण सर्वसमर्थ आहातच.

शुभेच्छा.

(सपष्ट)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

केशवसुमार Fri, 02/29/2008 - 14:03

जरा जास्त होतयं .. ;) हे तुम्हाला उद्देशून नाही..आम्हाल हे किती आवघड आहे  हे सांगण्यासाठी  स्वगत आहे ते..
(अविवेकी) केशवसुमार

अवांतर..तुम्ही सांगितलेल्या सुभाषिताचे ही एक विडंबन कालिजात असताना केले होते..पण इथे लिहू शकत नाही

(निर्लज्ज्)केशवसुमार

In reply to by केशवसुमार

बेसनलाडू Fri, 02/29/2008 - 14:43

तुम्ही सांगितलेल्या सुभाषिताचे ही एक विडंबन कालिजात असताना केले होते..

(निर्लज्ज्)केशवसुमार

छे छे ... हे काही अनपेक्षित नाही हो आम्हाला :)

(अपेक्षित)बेसनलाडू

In reply to by केशवसुमार

धनंजय Fri, 02/29/2008 - 21:35
"चांगले (पण लांबले)", मधील चांगले हाही शब्द मनापासूनच आहे, तोही स्पष्टपणे ऐकू आला म्हणजे मिळवली. चांगले न बघता दोष बघणारा असा माझ्याविषयी गैरसमज होऊ नये. तुम्हाला आमच्या फर्माइशी टीका ऐकून बदल करण्या-न-करण्याचे कसब आहे असे वाटते म्हणून सांगतो. बाकी आमच्यासारख्या नवशिक्यांना प्रोत्साहनच दिले असते.

In reply to by धनंजय

केशवसुमार Fri, 02/29/2008 - 23:24
आपाला काही तरी गैरसमज झाला आहे.. आपण चांगले म्हणले आहे आणि नेहमी म्हणता हे आमच्या चांगलेच (!) लक्षात आहे.. प्रत्येक टिकेतून नेहमी सुधारण्यास वाव असतो हे ही तितकेच खरे..त्यामागे आपला हेतू सकारात्मक आहे..म्हणूनच 'चांगले' म्हणण्यापेक्षा केलेल्या टिकेला धन्यवाद दिले इतकच.. कृपया गैरसमज नसावा.. आणि आमचा ही गैरसमज झालेला नाही याची नोंद घ्यावी..
((गैर)समजूतदार)केशवसुमार

मुक्तसुनीत Fri, 02/29/2008 - 22:28

सर्वप्रथम हे नमूद करतो : केशवसुमार यांची "विडंबन" या प्रकाराची समज आणि त्यावरची हुकूमत प्रशंसनीय आहे. आपल्या नर्मविनोदी स्वभावाला त्यानी आपल्या निर्मितीक्षमतेची जोड दिल्यामुळे त्यानी केलेली विडंबने चपखल , मार्मिक आणि रचनेच्या दृष्टीने बहुतांशी बिनचूक असतात.

विडंबनकार हा सर्कशीतील विदूषकाप्रमाणे असतो असे, मला वाटते अत्र्यानीच म्हण्टले आहे. विदूषक इतर जिमनॅस्ट्स प्रमाणे कुशल असतो, असावा लागतो. केशवसुमाराना हे वर्णन लागू होतेच.  

मात्र विडंबन हा प्रकार हा मुळातच "डिराइव्हड्" (मराठी शब्द ?) असल्याने, त्याबाबतीतील रसिकांची प्रतिक्रिया ही सुद्धा काहीशी हलकी, कॅज्युअल असते. मोडकीतोडकी का असेना, पण एखादी नवी रचना जेव्हा समोर येते, तेव्हा त्याकडे जास्त कुतूहलाने पाहिले जाते.

चतुरंग Fri, 02/29/2008 - 22:51

विडंबन मनपसंत होण्यामधे मुक्तसुनीतांनी दिलेल्या मुद्यांबरोबरच आणखी एक बाब असावी - ती म्हणजे विडंबन हा जरी आधारित लेखनप्रकार असला तरी त्यात मूळ कलाकृतीशी नाते साधतानाच विडंबनकाराचा स्वतःचा विचार आणि शेवटी एक स्वतंत्र कल्पना पोचवण्यातले यश ह्या दोन्ही गोष्टी जमाव्या लागतात.

खेरीज, विडंबन म्हणजे विनोदी असलेच पाहिजे असे नाही. कदाचित ह्या पूर्वग्रहामुळे रसिकांची त्याकडे बघायची दॄष्टी बदलत असावी.

तात्यांनी  केशवा, टेक युअर ओन टाईम पण येऊ दे एखादे फर्मास विडंबन... असा आदेश सोडला होता, पण मायदेशी परतण्याच्या गडबडीत खरोखरच टाईम जास्त गेला
आमची प्रेरणा नंदन यांची अप्रतिम कविता तिचे अभंग तिची गाथा..

एक तो 'वीकांत' | तेव्हाव्ही आकांत |
झोपाया निवांत | मिळेचिना ||

उशीरा झोपणे | उशीरा उठणे |
निवांत लोळणे | आळशी मी ||

हसावे मिशीत | थोड्याशा खुशीत |
उशी ही कुशीत | घोरताना ||

मी जर "हा" असतो तर ......... मिसळपाव स्पेशल

छोटा डॉन ·

केशवसुमार Tue, 02/26/2008 - 08:59

पण माझ्यावर 'केशवकुमारां' एवधी 'सरस्वतीची कॄपा' नाही .....

माझ्यावर पण त्यांच्या एव्हढी सरस्वतीची कृपा नाही..
केशवसुमार

एकंदरीत शेखचिल्लीची स्वप्ने चांगली आहेत..हे सा न ला

प्राजु Tue, 02/26/2008 - 09:37

पण मी 'प्राजू' एवढा दिलदार कवीमनाचा नाही.....

दिलदार?????छे छे.. कहितरिच... मी काही दिलदार नाहिये बरं !
लेख मात्र मस्तच... :)))

- (सर्वव्यापी)प्राजु

विसोबा खेचर Tue, 02/26/2008 - 10:51

मी जर प्राजू असतो तर वर्षातनं एक दिवस तरी चारोळी लिहिणे टाळले असते! :)

मी जर सर्वसाक्षी असतो तर "नाही चिरा, नाही पणती" अशी अवस्था असलेल्या, अज्ञात किंवा काळाच्या ओघात नांव पुसले गेलेल्या क्रांतिकारकांबद्दल मिपावरही लिहिले असते!

सध्या इतकेच, बाकी सवडीने..

तात्या.

In reply to by इनोबा म्हणे

विसोबा खेचर Tue, 02/26/2008 - 20:04

मी जर तात्या असतो तर एक तरी दिवस (विनाकारण) चूका काढणे टाळले असते.

हम्म! आता आहे खरा आमचा स्वभाव थोडासा भिकारXX, त्याला काय करणार?! :)

सांभाळून घ्या झालं..!

आपलच,
तात्या.

धमाल मुलगा Tue, 02/26/2008 - 11:25
जागतीक मिपा संभेलन ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे भरवून त्यात 'अनुष्का' ला प्रमूख पाहूणी म्हणून बोलावले असते. 'प्रभाकर पेठकरांना' बल्लावार्यांची भूमिका देऊन सर्व कुटुंबाला 'सणसणीत मिसळपावची पार्टी ' दिली असती.

हे हे...लय भारी!!! लै लै मज्जा :))

आयुष्याच्या संध्येला मी 'माझे मद्यपानाचे प्रयोग'[गांधीजींच्या माझे सत्याचे प्रयोग च्या धर्तीवर ] नावाचे आत्मचरीत्र लिहले असते.त्यातून मी नवशिक्यांना 'ऊत्तमोत्तम कॉकटेल्स' कशी बनवावी याचे मार्गदर्शन केले असते..........
जबरा...
डा॑बिसकाका, कधी येऊ "ऊ.कॉ." शिकायला?

गाफील सदस्यांना पकडून 'एकरकमी कमीत्-कमी १० तरी नव्या चारोळ्या ' सुनावल्या असत्या ....

खि:खि: प्राजुताई, अस॑ पार्टी देऊन छळायच॑ का? वाss :)  (ह्.घ्या.)

मी 'ऑफिसमध्ये काम नसल्यावर टाईमपास करायचे १०० उपाय' नावाचे पूस्तक काढले असते
वा वा!! वरदाताई, पहा, कर विचार..प्रकाशक शोधतो :))

एका नवीन 'मराठी भाषा पुनर्निमाण सेने' ची स्थापना केली असती. ...याला जे लोक [भय्ये] विरोध करतील त्यांची माझ्या कार्यकर्त्यांच्या मार्फत 'टकूरी' फोडण्यास मागे पुढे पाहिले नसते
एsss कोण रे तो ? आमच्या इनोबा ठाकरेवर मिडियागिरी करतोय..बघू का तुझ्याकड॑???

आपले 'स्कील' सिध्ध करून 'संजीव कपूरच्या' पोटावर पाय दिला असता.
स्वातीताई, आता करूनच दाखव अस॑ ! आगे बढो, हम तुम्हारे साथ है|  (आयत॑ खायला कोणाच॑ सुख दुखत॑य :)))

मी जर 'केशवखुमार' असतो तर माझ्या 'विडंबनांचे एक पूस्तक' प्रकाशित केले असते व नंतर त्या पूस्तकातील कवितांचे पून्हा 'विडंबन' केले असते.
खर्रर्रय बॉ !!! ह्या माणसाचा मे॑दू म्हणजे च्यायला फुल-टू सुपरफाष्ट !   केशवरावा॑ना
काव्य-प्रतिभा वाटताना देवाने बहुधा नवा बॉक्स उघडला होता..घे किती हवी तेव्हढी. 

मी जर 'धमाल मुलगा' असतो तर प्रथम माझे नाव बदलून 'ईब्लिस कार्टे' ठेवले असते
तेच ठेवणार होतो, पण म्हणल॑ लोक जवळ करायचे नाहित, म्हणून...

जश्न - ए- बहार' चे बेत रचून ते तडीस न्हेले असते.
हा.हा.हा... बेशक हुजूर!

मी 'मद्य रिचवायच्या उत्तमोत्तम पद्धती' यावर एक 'प्रेझेंटेशन दिले असते.
जय हो प्रभु !!!
सरकारी हूकूम न मानता 'मार्च' मध्ये 'शिवजयंती' साजरी केली असती.
हाण तिच्याआयला !!! खल्लास रे भाऊ :))

पण मी 'धमाल मुला' एवढा 'दिलखूलास नाही .......
कस
च॑... कसच॑ ! लाजलो बॉ स्तुती वाचून :)

मी जर खरच 'छोटा डॉन' असतो तर...
बेट्या तू सगळ्या॑ना ब॑गळूरास बोलावणी धाडली असतीस. आणि भेटल्यावर "मला आलेल्या एव्हढ्या इ-मेल्सच॑ काय करु" म्हणून चावत बसला असतास.

"जश्न-ए-बहार" आणि "मेहफिल-ए-दोस्ताना" ची वेगळी वार्ता करणे गरजेचे नाही, ती तू आपण होऊन तडीला नेली असतीस.

बेष्ट..येकदम बेष्ट लिव्हलयस :)) सगळ्या॑ची माप॑ काढून मोकळा..
तात्याबा बघताय ना, घरातल॑ हे शे॑डेफळ कस॑ दिवसे॑दिवस वात्रट होत चाललय ते??

In reply to by धमाल मुलगा

धमाल मुलगा Tue, 02/26/2008 - 13:47
च्यामारी, सगळ्या॑चे अनुस्वार कसे व्यवस्थित अक्षरा॑वर स्वार झालेत, माझे मात्र टपल्या मारायला उठल्यासारखे दिसतायत.
हा काय घोळ आहे बुवा?

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन Tue, 02/26/2008 - 15:10

"सगळ्या॑ची माप॑ काढून मोकळा..
तात्याबा बघताय ना, घरातल॑ हे शे॑डेफळ कस॑ दिवसे॑दिवस वात्रट होत चाललय ते??"

आम्ही कसले मापे काढतो बाबा दुसर्‍याची ? ईथे आमचेच आम्हाला झेपत नाही. लहान लेकरू आहे आण्णा , समजून घ्या वाईच ......

अवांतर : यातून 'सुटलेल्या लोकांची' मला ऑफीसच्या कामातून टाईम मिळाल्यावर खबर घेईन. म्हण्जे चांगलेच लिहीन , मापे काढणार नाही...

प्रभाकर पेठकर Tue, 02/26/2008 - 11:48

जर मी "तात्या " असतो तर , जागतीक मिपा संभेलन ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे भरवून त्यात 'अनुष्का' ला प्रमूख पाहूणी म्हणून बोलावले असते. 'प्रभाकर पेठकरांना' बल्लावार्यांची भूमिका देऊन सर्व कुटुंबाला 'सणसणीत मिसळपावची पार्टी ' दिली असती.

आयला..... हे बरंय! आपण स्वतः अनुष्काच्या कुशीत आणि प्रभाकर पेठकर स्वयंपाक घरात काय? अन्याय आहे हा.... घोर अन्याय.
थांबा... आता जेवण असे तिखट ज्ज्ज्ज्जाळ्ळ्ळ्ळ बनवून ठेवतो की दुसर्‍या दिवशी चांगलाच 'पश्चातताप' होईल. (पश्चातताप = 'मागून' होणारा ताप.)

In reply to by प्रभाकर पेठकर

"आता जेवण असे तिखट ज्ज्ज्ज्जाळ्ळ्ळ्ळ बनवून ठेवतो की दुसर्‍या दिवशी चांगलाच 'पश्चातताप' होईल. (पश्चातताप = 'मागून' होणारा ताप.)"

हेहेहेहेहे सहीच.. पण बल्लवाचार्य जर आपण असे काही केले असते तर मात्र आम्हाला 'अस्सल बेळ्गावी लोणीच(पिठ मिसळलेले का होईना!)' पण आणावे लागले असते. कारण पश्चाततापाची झळ असह्य असते हो.......

(ह.घ्या.)

पुण्याचे पेशवे

विसोबा खेचर Tue, 02/26/2008 - 15:54

जर मी "तात्या " असतो तर , जागतीक मिपा संभेलन ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे भरवून त्यात 'अनुष्का' ला प्रमूख पाहूणी म्हणून बोलावले असते.

हम्म!

अरे छोटा डॉन,

पुढच्या मिपाकट्ट्याकरता प्रमूख पाहुणी म्हणून येशील का असं बोलावणं करण्याकरता अनुष्काला फोन लावला आहे! :)

हा बघ!

आणि तात्याचं बोलावणं आलं म्हणून ती मिपा कट्ट्याला नक्की जाणार आहे असंही तिने एका समारंभात जाहीर केलं आहे! :)

इथे बघ!

आता तरी खुश? :)

आपला,
(अनुष्काचा पागल) तात्या.

जुना अभिजित Tue, 02/26/2008 - 18:34

मी जर 'जुना अभिजीत' असतो तर दर १० दिवसाला माझे नाव 'अभिजीत , मोठा डॉन , जुना अभिजीत ' असे चेंज केले नसते.
पुरंदर व लोहगडाच्या पायथ्याशी असलेल्या 'मिसळभक्षण यज्ञातून' वेळ काढून मिपा वर नवे नवे साहित्य प्रसवले असते....
पण मी 'अभिजीत' येवढा 'कट्टर मिसळप्रेमी' नाही ........

मी अभिजितचे मोठा डॉन केल्यावर एक नवीन अभिजित 'आपला अभिजित' इथे दाखल झाला होता. तेव्हा तुझा नाद सोडून मला जुना अभिजित नाव घ्यावं लागलं.  ;-)

कट्टर मिसळप्रेमी तर आहेच मी. पुरंदर पायथ्याची झणझणीत मिसळ अहाहा..अजूनही जिभेवर चव रेंगाळते आहे. (आमचे मित्र म्हणाले असते जा तोंड नीट धुवुन ये. )

गेले कित्येक दिवस ट्रेकला बाहेर न पडल्यामुळे लिहिण्यासारखं काही नाही. कविता आजकाल सुचत नाहीत.

ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

In reply to by जुना अभिजित

प्रभाकर पेठकर Tue, 02/26/2008 - 19:34

'पुरंदर पायथ्याची झणझणीत मिसळ अहाहा....'

जरा नीट पत्ता वगैरे दिलात तर आम्हलाही (तिथे जाऊन) आस्वाद घेता येईल.

धन्यवाद.

सुधीर कांदळकर Tue, 02/26/2008 - 21:33

नेता असतो तर या धाग्याबद्दल आपणांस पद्मश्री दिली असती. मस्त. असेच नवनवीन धागे आले तर मज्जा येईल.

धन्यवाद. आपणांस तसेच वरील सर्व प्रतिसादकांस.

पिवळा डांबिस Wed, 02/27/2008 - 02:58

मी जर 'डांबीसकाका' असतो तर आपल्यामुळे धमाल, छोटा डॉन सारखी पोर बिधडायला लागली हे ऊमजून 'मद्यप्राशन' सोडून दिले असते.

मुळीच नाही, "पोरं बिघडली, बिघडू द्या ना!":))

आयुष्याच्या संध्येला मी 'माझे मद्यपानाचे प्रयोग'[गांधीजींच्या माझे सत्याचे प्रयोग च्या धर्तीवर ] नावाचे आत्मचरीत्र लिहले असते.

आयुष्याच्या संध्येला, शिंच्या, संध्येला?  का रे बाबा माझ्या जीवावर  उठ्लायस? :))

त्यातून मी नवशिक्यांना 'ऊत्तमोत्तम कॉकटेल्स' कशी बनवावी याचे मार्गदर्शन केले असते..........
पण मी 'डांबिसकाकां' एवढा शौकीन नाही ......

हां, शौकिन तर आपण जरूर आहोत.  पण एकबाणी रामाप्रमाणे  आम्ही "एकड्रिंकी" आहोत!  आम्ही आमच्या निष्ठा स्कॉचच्या पायी वाहिलेल्या आहेत.  त्या नटरंग्या सटव्या कॉकटेल्स आम्हाला मोहात पाडू शकत नाहीत....:))

स्कॉचपरायण,

पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

चतुरंग Wed, 02/27/2008 - 03:22

अहो 'आयुष्याच्या संध्येला' म्हणजे त्याला 'संध्या करतेवेळी' आचमने घेताना, असे म्हणायचं असेल असं आपण समजूयात, नाही का?

म्हणजे असं - ॐ स्कॉचये नमः, ॐ ग्लेनफिडिचे नमः, ॐ शिवास रीगलाय नमः, ॐ ग्लेन मोरांजिये नमः (इथे तात्यांना मनःचक्षूंसमोर आणावे;), ॐ जॉनी वॉकराय नमः
एवढं झालं की मग "अस्त्राय फट्" म्हणून डोळ्यांना दोन थेंब लावायचे की झाले, मग खरी सुरुवात!:}}

चतुरंग

In reply to by चतुरंग

स्मिरनॉफला विसरलात बरे....कमीतकमी मिपावरतरी 'या' बाबतीत भेदभाव नको......कसें?
 ॐ स्मिरनॉफ् नम :

बाकी डॉन्या लेख एकदम फक्कड जमलाय रे....अजून येउ देत्...पुलेशु.....

- (स्मिरनॉफप्रेमी) छोटी टिंगी

In reply to by ब्रिटिश टिंग्या

चतुरंग Wed, 02/27/2008 - 09:14

म्हणजे 'महापुरात' पोहणारी मंडळी, आम्ही आपले 'काठाकाठाने' पाय बुडवणारे तेव्हा आमचं नालिज तितपतंच!

चतुरंग

In reply to by चतुरंग

पिवळा डांबिस Wed, 02/27/2008 - 07:09

ॐ स्कॉचये नमः, ॐ ग्लेनफिडिचे नमः, ॐ शिवास रीगलाय नमः, ॐ ग्लेन मोरांजिये नमः (इथे तात्यांना मनःचक्षूंसमोर आणावे;), ॐ जॉनी वॉकराय नमः

क्या बात है!!!

:)))))

In reply to by पिवळा डांबिस

छोटा डॉन Wed, 02/27/2008 - 07:42

अहो डांबिसकाका ,

"अहो 'आयुष्याच्या संध्येला' म्हणजे त्याला 'संध्या करतेवेळी' आचमने घेताना"

असेच म्हणायचे आहे मला ....

छोटा डॉन
[ आम्हाला इथे भेट द्या http://hariprasadcoep.blogspot.com ]
याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

In reply to by पिवळा डांबिस

छोटा डॉन Wed, 02/27/2008 - 08:02

"तुला काय मी रागावीन असं वाटलं काय? :)))))"

अहो काका रागवा तुम्ही , तुमचा हक्क आहे तो  पण तुमच रागावणं क्षणिक आहे व तुमचे आमच्या सर्व मिपा परिवरावर प्रेम आहे याची आम्हाला कल्पना आहेच ....
त्यामुळे जर राग आला असेल तर तो दूर करण्यासाठी 'मांडवली' करू , या मग 'बेंगलोरला' व येताना 'धमाल मुलाला' पण घेऊन या. आप्ण सगळे मिळून मस्त "जश्न्-ए-बहार" ऊडवून देउ , कसे???

छोटा डॉन [ आम्हाला इथे भेट द्या http://hariprasadcoep.blogspot.com ]

In reply to by छोटा डॉन

पिवळा डांबिस Wed, 02/27/2008 - 08:25

अहो काका रागवा तुम्ही , तुमचा हक्क आहे तो

अरे बाबा, एव्हढ्यातेव्हढ्यावरुन रागवायचं असतं तर कशाला इथे मि. पा. वर आलो असतो?

तू लिही तुझ्या मनात येईल ते, आम्ही प्रतिक्रिया द्यायला श्रीसमर्थ आहोत!! :))

तुझ्या बंगलोरला यायचं जमवलंच पाहिजे!  येत्या जानेवारीत मी दिल्लीला येणार आहे, तुमच्या आरोग्यमंत्रालयात काही भेटी ठरलेल्या आहेत, बघू बंगलोरला फ्लाय करायला जमते का ते!!!

आपण वैयक्तिक विरोपातून ठरवूयात!

In reply to by पिवळा डांबिस

छोटा डॉन Wed, 02/27/2008 - 09:00

येत्या जानेवारीत म्हणजे अजून १० महिन्यांनी ???
ठिक आहे, जमवू नक्की ........

छोटा डॉन [ आम्हाला इथे भेट द्या "http://hariprasadcoep.blogspot.com"] याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर Wed, 02/27/2008 - 08:01

 आम्ही आमच्या निष्ठा स्कॉचच्या पायी वाहिलेल्या आहेत.

आमचेही ब्लेंडेड स्कॉचवर प्रेम आहे परंतु आमच्या निष्ठा मात्र आम्ही सिंगलमाल्ट पद्धतीने बनवलेल्या स्कॉचच्याच पायाशी वाहिलेल्या आहेत! :)

त्या नटरंग्या सटव्या कॉकटेल्स आम्हाला मोहात पाडू शकत नाहीत....:))

हम्म! मोहात पडायला आम्हाला काहीही चालतं! अगदी 'मोहा'ची सुद्धा चालते! :)

आपला,
(मोहमयी दुनियेत गुरफटलेला) तात्या.

--

मोह! मला सांग श्याम, मोहात काय वाईट असतं रे?
-इति काकाजी (नाटक - तुझे आहे तुजपाशी) 

In reply to by विसोबा खेचर

पिवळा डांबिस Wed, 02/27/2008 - 08:14

चालायचंच! तुम्हाला नऊवारी साडी नेसलेली स्कॉच आवडते, आम्हाला पंजाबी ड्रेस घातलेली! :))

मोहात काय वाईट असतं रे?
मोहात वाईट काहीच नसतं फक्त मोहाचे परिणाम (कॉन्सिक्वेंसेस) असतात! आणि कधी कधी ते ट्यां ट्यां करून किंचाळतात!! खरं की नाही? :))

अविवाहित तात्यासाठी सल्ला!! :))

छोटा डॉन Wed, 02/27/2008 - 07:52

माझे लिखाण "जास्त मनावर" न घेता 'दिलखूलास' प्रतिसाद दिल्याबद्दल 'महामहिम तात्यासाहेब, केशवसुमार , शेहनशह्-ए-धमालिस्तान , पेठकरसाहेब , डांबिसकाका , विनोबा ठाकरे , चतुरंगशेठ , सॄष्टीलावण्य , धनंजय मिराशी व छोटा टिंगी" यांना धन्यवाद ....
भविष्यात सुध्धा माझ्या हातून आपली अशीच 'सेवा (????)' धडत राहील अशी ग्वाही देतो ..........

पिवळा डांबिस Wed, 02/27/2008 - 08:02

कायहो, 'महामहिम तात्यासाहेब, केशवसुमार , शेहनशह्-ए-धमालिस्तान , पेठकरसाहेब , डांबिसकाका , विनोबा ठाकरे , चतुरंगशेठ , सॄष्टीलावण्य , धनंजय मिराशी व छोटा टिंगी"

या डॉन्याचा एन्काऊंटर करायचा का?  :))

In reply to by पिवळा डांबिस

सृष्टीलावण्या Wed, 02/27/2008 - 08:31

छोटे, वैसे भी १२ मुल्को की पुलिस डॉन को तलाश रही है.... 
उनका काम खुद-ब-खुद हो जाएगा...

एन्कौंटरसे पहले तनिक मेरी तरफसे भी दे दो थोडा खर्चा पानी...

In reply to by सृष्टीलावण्या

छोटा डॉन Wed, 02/27/2008 - 09:12

डॉन का एन्काऊंटर मुश्कील ही नही बल्की नामुमकीन है ...."

थोडे करेक्शन ........
"डॉन का इंतजार ११ मुक्लोकी पुलीस कर रही और १२ वे मुल्क से बात चल रही है ........"

"और एक बात जान लो सोनिया , डॉन के दुश्मन की सबसे बडी गलती ये है के , वो डॉन का दुश्मन है ..........."

याला खरोखरची संध्या करायला लावायची(केशवाय नमः| नारायणाय नमः| वाली संध्या. आणि आचमने पाण्याची घ्यायला लावायची. :) ) आणि सर्वांनी त्याच्या समोर आपापले आवडते पेय चषकात घेऊन त्याच्यासमोर बसून जशन-ए-बहार करायचा.

त्याचा आपोआप एन्काऊन्टर होईल.  :) :) 

पुण्याचे पेशवे

In reply to by रंजन

छोटा डॉन Sat, 03/01/2008 - 11:47

झालेल्या त्रासाबद्दल मी दिलगीर आहे. नामसाध्र्म्याचा घोळ टाळण्यासाठी "नविन ब्लोग" उघडावा लागला, त्याचा पत्ता खालीलप्रमाणे ...........
" http://chhota-don.blogspot.com/ "

धन्यवाद ..........

छोटा डॉन
[ आम्हाला इथे भेट द्या http://chhota-don.blogspot.com/ ]

छोटा डॉन Sat, 03/01/2008 - 11:53
डांबिस काका,
असे थेट "हा" म्हणू नका , कारण आपल्या 'प्रचलित मराठीत ' "हा" या शब्दाचा अर्थ वेगळा आहे [  अजून सांगायचे झाल्यास तो लिंगभेदासाठी वापरतात ]
त्यामूळे हा म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचे ते सांगा .......

पिवळा डांबिस Sat, 03/01/2008 - 12:01

अरे हा म्हणजे मी 'आत्ता गं बया!" या अर्थी 'हा' असं म्हटलं नव्हतं!

मी 'हा' म्हणजे चक्रम या अर्थी म्हटलं होतं. :))))

पण तुला हे रजिष्टर झाल्याचं पाहून आनंद झाला!!  डोकं चालवणारी माणसं आम्हाला नेहमीच आवडतात! :))

In reply to by पिवळा डांबिस

छोटा डॉन Sat, 03/01/2008 - 12:17
"मी 'हा' म्हणजे चक्रम या अर्थी म्हटलं होतं. :))))"
लहाणपणापासूनच आहे . [ ही पूणेरी मराठीत कुठल्याही अशा प्रकारच्या प्रश्नाला उत्तर देण्याची पद्धत.]

च्यायला चांगलाच घोळ घातला की मी. असो ....
आम्हाला कायरती येगळचं वाटलं ना राव..... असो... मज्जा आली

छोटा डॉन
[ आम्हाला इथे भेट द्या http://chhota-don.blogspot.com/ ] याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

वरदा Fri, 03/07/2008 - 23:08
असं कसं झालं चुकून तेवढे १-२ दिवस मी ऑफिसमधे काम करत होते की काय?????? झकास आहे हे एकदम... मी 'ऑफिसमध्ये काम नसल्यावर टाईमपास करायचे १०० उपाय' नावाचे पूस्तक काढले असते वा वा!! वरदाताई, पहा, कर विचार..प्रकाशक शोधतो :)) अगदी करतेच विचार..तुमच्या सगळ्यांच्या भन्नाट आयडीया एकत्र करुन १०० काय १००१ उपाय लिहेन....(तेवढा वेळ मला असतो हे सांगायला नकोच) :)

वरदा Fri, 03/07/2008 - 23:11
मी जर 'वरदा' असतो तर 'प्रेम म्हणजे काय?' ह्या वादात कधीतरी 'मुलांच्या' बाजूने विचार केला असता व 'प्रॅक्टिकल लाईफ' चा विचार न करता 'भावनेच्या' आधारे मुलांचे बरोबर आहे असा निर्वाळा दिला असता. मी हेच जर मी प्राजु असते तर केलं असतं...दोन चार चारोळ्यांचही पाहीलंच असतं....

लेखनविषय:
3

स्वगत

निनाद ·

प्राजु Tue, 02/26/2008 - 07:51

किती काही आहे त्यात... वाक्य बोलण्यामध्ये सकारण स्प्ष्टीकरण पण येते. मग ते साधेसे बोल विरून जातात् नि उरतात शब्दांचे बुडबुडे.
त्यापेक्षा ते बोबडे पण खरे खुरे बोलच बरे.

हे वाचून मी अंतर्मुख झाले. माझ्या मुलाची तो ९-१० महिन्याचा असताना "बात्लाफात्ला...काकाल्काअब्दाला" हे असे बोल ऐकून त्याला मला किती सांगू आणि किती नको असं झालेलं असायचं.. मला मात्र एक अक्षर कळायचं नाही. अजूनही ते बोल आठ्वले की मन त्या इवल्या आठवणीत रमतं. इवल्याच म्हणायला हव्यात ना त्या आठवणी किती अत्यल्प काळासाठी असतात ते क्षण..

- (सर्वव्यापी)प्राजु

प्रभाकर पेठकर Tue, 02/26/2008 - 12:17

माझ्या पुतण्याने त्याच्या वडिलांना (माझ्या भावाला) सांगितलं, 'आपण ते तिथे जातो नं....'
भाऊ: 'कुठे?  कुठे जातो आपण?'
पुतण्या: ' अहो तिथे नाही का 'गंडलगुल्ली' आहे?....'

आता हे 'गंडलगुल्ली' प्रकरण काय आहे हे कळायला दोन दिवस गेले. मेंदूचा भुगा झाला. त्यालाही एक्स्प्लेन करता येईना, आम्हालाही समजेना. शेवटी आम्ही नाद सोडला. 

दोन दिवसांनी एक लहान मुलांचे सचित्र पुस्तक चाळताना तो अचानक ओरडला, 'बाबा, गंडलगुल्ली' आम्ही ते चित्र पाहिलं आणि हसतच सुटलो.....

ती होती 'घसरगुंडी' (बागेतली). 

"बाबा तू येना... बाबा तू ये. मला तू हवाय""

इतकेच म्हणते ही फोनवर. दुसरे काहीच नाही!
काय करावे. मन हेलकावतय. जाण्याची इच्छा तर खूप आहे. पण कसे जमवावे...

इतके दिवस झालेत. इतके म्हणजे किती, तर ती बोबड्या बोलां नंतर चक्क व्यवस्थित बोलू लागलीय.
अरे मग त्यात काय? एका आठवड्यात होते ही प्रोसेस.
फक्त प्रोसेस? आठवड्यात होणारी एक प्रोसेस्?
किती काही आहे त्यात... वाक्य बोलण्यामध्ये सकारण स्प्ष्टीकरण पण येते. मग ते साधेसे बोल विरून जातात् नि उरतात शब्दांचे बुडबुडे.
त्यापेक्षा ते बोबडे पण खरे खुरे बोलच बरे.

स्वातंत्र्यवीराचे पुण्यस्मरण

सर्वसाक्षी ·

विकास Tue, 02/26/2008 - 00:00

२६ फेब्रुवारी १९६६ ला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी प्रायोपवेशनाने प्राणत्याग केला.  मिपाने सावरकर पुण्यतिथीची आठवण ठेवल्याबद्दल धन्यवाद.  वास्तवीक सावरकरांबद्दल बरेच काही लिहून येते. जालावर पण "झाल्या ही बहू , होतील ही बहू" असे त्यांच्या विषयीच्या चर्चांबद्दल बोलता येईल. पण आत्ता मला कवी शंकर वैद्यांची एक कविता आठवली, जी त्यांना सावरकरांचे वक्तृत्व सभेमधे  ऐकल्यावर स्फुरली होती. आपल्याला आवडेल अशी आशा करतो. (जशी आठवते तशी! तेंव्हा चु.भू. द्या.घ्या.) (लाईन स्पेसींग जास्त येत असल्याने, प्रत्येक कडव्याला रंग दिले आहेत)

लाखांचा समुदाय लोटला घुमवीत कोलाहल, त्या नादाने वरी सरकले गगनांचे मंडल |

व्यासपिठावर परंतु होता दिव्य तुझी चाहूल, श्वास रोधूनी खिळूनी बसले अवघे भुमीतल |

शब्द तुझा अन पहीला जेंव्हा कानावर पडला, रोमांच्याचा शेला अंगावरती फडफडला ||

नयनांच्या जाळ्यात ठेवले जरी तुला पकडून, शब्दांच्या जाळ्यात चालले अडकत सारे जन |

तव वदनातून फुटू लागल्या हस्तामधल्या सरी, लखलखली अन चल्लख जिभली, चलाख बिजली परी|

नभ फोडून नग लंघित गंगा ओघ जणू आला, रोमांच्याचा शेला अंगावरती फडफडला ||

शकले पडता भारतभू ने जी किंकाळी दिली, तव हृदयातील कोटरात ती दडूनीया बसली |

पंख उभारून आक्रंदून ती, येताना बाहेर, लाख वीजा गगनात लोटल्या, कोसळले अंबर |

हाय भारत भू हाय हुंदका हेलावत गेला, रोमांच्याचा शेला अंगावरती फडफडला ||

तू सिंधूचे स्तोत्र गायले गहीवरूनी अंतरी, वात्सल्याचा तवंग फिरला जनसंमर्दावरी |

स्वातंत्र्याचे गान नाचता वदनी ओसंडून, अद्भूत शक्ती लहरत गेली, अंगाअंगातून |

छेडीलेस तू हृदयामधल्या जणू प्रत्यंचेला, रोमांच्याचा शेला अंगावरती फडफडला ||

प्राजु Tue, 02/26/2008 - 00:13

काय अफाट कविता आहे ही! रोमांच उभे राहिले...  इथे दिल्याबद्दल धन्यवाद.

कोटी कोटी प्रणाम या भूमीपुत्राला...

- (सर्वव्यापी)प्राजु

चतुरंग Tue, 02/26/2008 - 00:59

"हिंदुभूमीच्या स्वातंत्र्याकरिता मारिता मारिता मरेतो झुंजेन!" अशी जाज्ज्वल्य प्रतिज्ञा करणार्‍या आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण ती जगणार्‍या स्वातंत्र्यवीरांच्या स्मृतीस अभिवादन.

हे काव्य त्या महाकवीस अर्पण -

हिंदुभूमिचा पुत्र असे हा लढवय्या सेनानी

हसत जाई तो पोहुन तेही शिक्षा 'काळे पाणी'

अमोघ वाणी असे तयाची ज्वलंत ती लेखणी

आंग्लतख्त ते फोडुन टाकी बलशाली हातांनी

दूरदृष्टिता तरी तयाची ना ओळखली कुणी

श्रध्दांजलि ही तुला अर्पिता नयनी येई पाणी

चतुरंग

विसोबा खेचर Tue, 02/26/2008 - 03:24

साक्षीदेवा,

तुझ्यासारख्या, भारतीय स्वातंत्र्य युद्धाच्या आणि काळाच्या पडद्याआड गेलेल्या, 'नाही चिरा नाही पणती!' अश्याही अवस्थेतल्या काही स्वातंत्र्यवीरांची आमच्यासारख्यांना ओळख करून देणार्‍या डोळस अभ्यासकाने सावरकरांवर दोन शब्द लिहिणे हेच केव्हाही उचित आहे!

स्वात्रंत्र्यदेवतेकरता अंदमानात कोलू पिसणार्‍या या महामानवास मिसळपाव परिवारातर्फे विनम्र आदरांजली!

शंकर वैद्य आणि चतुरंग, दोघांचीही काव्ये अतिशय उत्तम!

आपला,
(सावरकरभक्त) तात्या.

प्राजु Tue, 02/26/2008 - 06:43

अप्रतिम कविता आहे तुमची. तुम्ही इथे द्यायला नको होती.  ती वेगळी जे न देखे रवी मध्ये लिहायला हवी होती. अजूनही लिहा. मी ही कविता माझ्या संग्रही ठेवली तर चालेल का?

- (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

चतुरंग Tue, 02/26/2008 - 09:10

खरं तर ही कविता नाही. सर्वसाक्षींचे विचार आणि शंकर वैद्यांची स्फूर्तिदायक कविता वाचून लगेच स्फुरलेल्या ह्या ओळी इथे देण्यामागे स्वातंत्र्यवीरांना अभिवादन करण्याचीच इच्छा होती.

तू संग्रही ठेवणारच असलीस तर जरुर ठेव.

चतुरंग

In reply to by चतुरंग

सुधीर कांदळकर Tue, 02/26/2008 - 21:57

साधले. अशी तेजस्वी कविता या वेळी या धाग्यात येणे हे खरोखर उचित होय.  अपलीअभिवादन करण्याच्या इच्छेचे कौतुक करतो.

आपल्या संवादामध्ये ताँड घातल्याबद्दल क्षमस्व.

माझे पण स्वावी ना अभिवादन.

धमाल मुलगा Tue, 02/26/2008 - 10:55
जाज्वल्य देशाभिमानी, प्रखर बुद्धीमत्तेचा महामेरु, केवळ अशक्यप्राय ह्या एकमेव शब्दाने मोजली जाईल अशी दूरदृष्टी असलेल्या अख॑ड भारतवर्षाच्या ह्या सुपुत्रास त्रिवार प्रणाम.
तात्याराव सावरकरा॑च्या चरणि माझा साष्टा॑ग द॑डवत.

वा !!! यथोचित वर्णन.

मदनबाण Tue, 02/26/2008 - 11:13
||स्वातंत्रलक्ष्मी की जय||

 सावरकरया पुस्त्कातील मला आवडलेला काही भाग खाली देत आहे :-----

प्रत्येकाने स्वातंत्रलक्ष्मीची उपासना का केली पाहीजे,हे एकदा स्पष्टपणे सांगितले पाहिजे असे
सावरकरांना वाटले आणि त्यातून त्यांचे "स्वतंत्रेचे स्तोत्र" जन्म पावले.
स्वातंत्रलक्ष्मीची मह्ती गाताना सावरकरांनी सांगितले :----
मोक्ष-मुक्ति ही तुझीच रुपे तुलाच वेदान्ती
स्वतंत्रते भगवती,योगिजन परब्रम्ह वदति
जे जे उत्तम्,उदात्त्,उन्नत्,मह्न्मधुर ते ते
स्वतंत्रते भगवती,सर्व तव सहचारी होते
आणि म्हणुन
तुजसाठि मरण ते जनन
तुजवीण जनन ते मरण
तुज सकल चरचर शरण
भरत भूमीला द्रढालिंगना कधी देशील वरदे
स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे
---------------------------------------------------------------------------------------
मदनलाल आणि सावरकर यांची शेवटची भेटः-----
सावरकर २२ तारखेला मदनलालना भेटायला गेले.
मदनलालनाही फार बरे वाटले.
पोलिसांच्या देखतच दोघांचे बोलणे चालले होते.
सावरकर ,मदनलाल दिसताच उद्द्गारले " मी तुमचं दर्शन घ्यायला आलेलो आहे."
दर्शन !
गुरुकडून एवढा गौरव झाल्यानंतर  मदनलालना आणखी कही नको होते.
मदनलाल म्हणाले माझी 'मला फाशीची शिक्षा होणार हे ठरलेलंच आहे त्यामुळे ही आजची भेट शेवटचीच भेट ठरणारआहे. म्हणुन मी तुम्हाला माझी अंतीम ईच्छा  सांगतो.माझा अंत्यविधी,ब्राम्हणाकडून मंत्राग्नी देउन केला जावा.माझ्या मृत देहाला  माझ्या भावाचा,तसेच  कोणत्याही अहिंदू चा स्पर्श  होउ नये.माझे कपडे आणि पुस्तकं-सारं काही विका आणि ते पैसे इथल्या आपल्या राष्ट्रीय निधीला द्या."
मदनलालांचा निरोप घेताना सावरकरांना गहिवरुन आले.

(स्वातंत्र्य वीर सावरकर भक्त:-- मदनबाण )

शेखर Tue, 02/26/2008 - 12:58

जयोऽस्तुते जयोऽस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे,

स्वतंत्रते, भगवती, त्वामहम्,

यशोऽयुतां वंदे, यशोऽयुताम् वंदे ||१||

राष्ट्राचे चैतन्यमूर्त तू, नीतिसंपदांची,

स्वतंत्रते भगवती श्रीमती, राज्ञी तू त्यांची,

परवशतेच्या नभात तूची, आकाशी होशी,

स्वतंत्रते भगवती, चांदणी चमचम लखलखली,

वंदे त्वामहम्, यशोऽयुताम् वंदे, यशोऽयुताम् वंदे ||२||

गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली,

स्वतंत्रते भगवती, तूच ती विलसतसे लाली,

तू सूर्याचे तेज, उदधिचे गांभीर्यही तूही,

स्वतंत्रते भगवती, योगीजन परब्रम्ह म्हणती,

वंदे त्वामहम्, यशोऽयुताम् वंदे, यशोऽयुताम् वंदे ||३||

हे अधमरक्तरंजिते, हे अधमरक्तरंजिते, सुजनपूजिते,

श्री स्वतंत्रते! श्री स्वतंत्रते! श्री स्वतंत्रते!

तुजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण,

तुज सकळचराचरशरण, चराचरशरण,

श्री स्वतंत्रते! श्री स्वतंत्रते! श्री स्वतंत्रते! ||४||

यशोऽयुतां वंदे, यशोऽयुताम् वंदे ||५||

--कवि - विनायक दामोदर सावरकर

वरील गीत हे स्वतंत्रतेचे स्त्रोत म्हणून पिढ्यांनपिढ्या देशभक्तांच्या मनात जाज्वल्य निर्माण करत आले आहे.
स्वातंत्रवीर सावरकरांना त्रिवार मुजरा.
 
- राष्ट्रभक्त शेखर

In reply to by शेखर

ऋषिकेश Tue, 02/26/2008 - 23:33

कोणाकडे जयोस्तुते संपूर्ण आहे का? मला अजून एक कडवं हवे आहे. वर शेखर यांनी दिलेला भाग हा केवळ गेय भाग आहे. मूळ काव्यात एकूण तीन भाग आहेत मला दोन मिळाले ते इथे वाचता येतील. कोणाला याबद्दल माहिती असल्यास कृपया द्यावी

-(अनेक दिवस पूर्ण गाण्याच्या शोधात) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

विकास Wed, 02/27/2008 - 02:19

मूळ काव्यात एकूण तीन भाग आहेत मला दोन मिळाले ते इथे वाचता येतील.

मला वाटते ते तेव्हढेच आहे. आपण सावरकर.ऑर्ग वर पाहीले तरी ते तेव्हढेच दाखवतात (जे त्यांनी समग्र सावरकरपुस्तकातून घेतलेले आहे).

सृष्टीलावण्या Tue, 02/26/2008 - 17:36
  • हिन्दुस्थानच्या स्वातन्त्र्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रांतिकारक चळवळ संघटित करणारे आद्य क्रांतिवीर
  • दोन देशांच्या सरकारांनी ज्यांच्या ग्रंथावर प्रसिद्धिपूर्वीच प्रतिबन्ध घातला असे जगातील आद्य लेखक
  • हिन्दुस्थानच्या स्वातन्त्र्यलढ्यात भाग घेतला म्हणून ज्यांची पदवी विद्यापीठाने काढून घेतली असे आद्य पदवीधर
  • हिन्दुस्थानच्या स्वातन्त्र्यलढ्यात सहभागी झाल्यामुळे ज्यांना बॅरिस्टर पदवी नाकारण्यात आली असे आद्य विधिज्ञ
  • विदेशी कपड्यांची निर्भयपणाने प्रकट होळी आयोजित करणारे आद्य देशभक्त
  • हिन्दुराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सर्वस्पर्शी विचार करणारे, अस्पृश्यता व जातिभेद यांच्याविरुद्ध बंड पुकारणारे आद्य क्रांतिवीर
  • ब्रिटिश न्यायालयाचा अधिकार नाकारणारे आद्य भारतीय बंडखोर नेते
  • पन्नास वर्षे सीमापारीची काळ्यापाण्याची शिक्षा झालेले आणि ती पुरुन उरल्यानंतर सक्रिय कार्य करणारे जगातील आद्य राजबंदी
  • कारागृहात लेखनसाहित्य न मिळाल्यामुळे काट्याकुट्यांनी कारागृहाच्या भिंतींवर सुमारे दहा सहस्त्र ओळींचे काव्य कोरून लिहिणारे आणि ते सहबंदिवानांकडून मुखोद्गत करवून घेऊन प्रसिद्ध करविणारे जगातील आद्य कवी
  • हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात ज्यांची अटक गाजली असे हिन्दुस्थानचे आद्य राजबंदी
  • योगशास्त्राच्या उत्तुंग परंपरेनुसार प्रायोपवेशनाने मृत्युला कवटाळणारे आद्य आणि एकमेव क्रांतिकारक महायोगी

आभारः-

http://www.savarkar.org/mr/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0

दि. २६ फेब्रुवारी २००८ - स्वातंत्र्यवीर सावरकरांची ४२ वी पुण्यतिथी!

पावाच्या पांचशे पंचावन्न पौष्टिक पदार्थांची पाककृती

आनंद घारे ·

प्राजु Mon, 02/25/2008 - 23:06

तुम्ही गंमत म्हणून या ५५५ रेसिपिज् करून पाहिल्यात कि काय?

बाकी आपले गणित विषयातील ज्ञान चांगले आहे बरं का.. :) ह. घ्या.

- (सर्वव्यापी)प्राजु

स्वाती राजेश Tue, 02/26/2008 - 01:26
एवढ्या ट्राय करायला जवळ्जवळ दिड ते दोन वर्ष पुरेल.....
पण छान आहे, असे  वर दिले त्याप्रमाणे एक कोष्टक तयार करून किचन मध्ये लावावे म्हणजे ऐनवेळी घरात काय आहे काय नाही याचा अंदाज येऊन सँडविचकरता येते.

हे ब्येस झालं.....आता दर्रोज येकेक पदार्थ ट्राय करीन.....
बाकी '५५५'  म्हंजे आमच्यासारख्या सडाफटिंग लोकांसाठी संजीवनीच की हो......

आपला,
(सदा'फुकिंग') छोटी टिंगी ;)

Taxonomy upgrade extras

मिसळपाव डॉट कॉमचा सदस्य झाल्यापासून खाद्यसंस्कृतीबद्दल मला जास्तच आस्था वाटायला लागली आहे. त्यावर निर्माण होत असलेल्या अनमोल साहित्यात आपणही अल्पशी भर घालावी असे वाटल्यामुळे हा लेख लिहिला आहे. वेळ वाचवण्यासाठी 'गागरमें सागर' म्हणतात ना तसे पांचशे पंचावन्न पदार्थ एका पोटळीत बांधून सादर करायचे ठरवले आहे.

"मेड इन चायना'पाठीमागचे रहस्य यात आहे!

मीनल ·

सुधीर कांदळकर Mon, 02/25/2008 - 20:25

मुख्य म्हणजे संशोधकाचा आव न आणता. साधे सोपे व सहज. एवढा कठीण विषय आणि एवढी सोपी मांडणी. हे सोपे नाही महोदया. 

चिनी व्यापारी तसे चतुर आहेत. चीनमध्ये स्थानिक मिळणा-या वस्तूंचा दर्जा व निर्यात केल्या जाणा-या वस्तूंचा दर्जा यात तफावत केली जाते. शिवाय प्रत्येक देशात जाणा-या मालाच्या प्रकारात व दर्जात विषमता जाणवते. स्पष्ट करून सांगायचे म्हणजे चीनने अमेरिकेला पाठवलेला माल व भारतात पाठवलेला माल यांच्यात बराच फरक असतो.

हे निरीक्षण उल्लेखनीय. ठाऊक नव्हते. अभिनंदन व शुभेच्छा.

सर्वसाक्षी Mon, 02/25/2008 - 21:30

आपली स्वतःची चीनी भाषा सोडता इतर कोणत्याही भाषेचा गंधही नसलेले चीनी उद्योजक, त्यांचे प्रचंड कारखाने, दहा वर्षांनंतरचे चित्र डोळ्यापुढे ठेवुन केलेली जागा/ यंत्रसामुग्री यातील गुंतवणुक हे निश्चितच थक्क करणारे आहे.

चीन मध्ये उत्कृष्ठ, चांगल्या, बर्‍या आणि सुमार अशा चार दर्जाच्या वस्तू बनतात असे माझे निरिक्षण आहे. कोणत्याही ग्राहकाला नाही म्हणायचे नाही हे त्यांचे धोरण. बि.एम.डब्ल्यु/ बेंझ सारख्या मोटारी, संगणक चीन मध्ये बनतात. डिसेंबर मध्ये गेलो असता २१ तारखेला सर्व प्रसारमाध्यमांना एकच विषय होता- शांघायच्या प्रदर्शनात ठेवेलेले ७२ आसनी ए आर जे २१ विमान! येत्या काही वर्षातच ही संपूर्ण देशांतर्गत बांधणीची विमाने अंतर्गत वाहतूकीपैकी ६०% वाटा उचलतील अशी अपेक्षा आहे!

प्रचंड संख्येने उत्पादन, तुलनेने स्वस्त श्रम, कमी आयात कर, अधिकाधीक कच्चा माल/ यंत्रे देशातच उपलब्ध, अत्यंत प्रगत अशी वाहतूक व्यवस्था, सुसज्ज बंदरे, अत्याधुनिक साधने यामुळे (व एके काळी सरकारकडुन कर्ज घेउन बुडविण्याची असलेली सवलत) यामुळे त्यांची उत्पादने स्वस्त नसली तरच नवल. शिवाय अनुसंधानावर युरोप्-अमेरिकेच्या तुलनेने नगण्य खर्च (तुम्ही शोधा आम्ही बनवतो:)) यामुळे किमतीच्या बाबतीत हे किफायती ठरतात.

ब्रुक बॉण्डचा चहा अगदी रुपया-दोन रुपयाच्या पाकिटातही मिळतो. ज्याच्या खिशात रोज सकाळी असलेल्या पाच रुपयात चहा-साखर-दूध हे समिकरण बसवायचे आहे त्याला चहाची किंमत किती रुपये किलो हे गौण असते तर त्याला असलेल्या रुपयात चहा मिळणे हे महतत्त्वाचे असते तदवत ५० रुपयांना विजेवर चालणारी आगगाडी अगदी गरिबालाही परवडणारी असते हे ओळखून अशा वस्तू दर्जावर तडजोड करून अशा ग्राहकांचे प्राबल्य असलेल्या बाजारपेठांसाठी आवर्जुन बनविल्या जातात. या वस्तु विकत घेणार्‍याला त्या फार टिकणार नाहीत हे माहित असते पण खिशाला परवडणार्‍या किमतीत त्याला आपल्या पोराना निदान चार दिवस का होइना पण आनंद देता येतो हे महत्त्वाचे असते. शिवाय मुले खेळणी हाताळणार आणि मोडणार तेव्हा भारीची खेळणी आणुन मुलांना खेळु न देता दुरुन पाहायला लावण्यापेक्षा वा मोडल्यावर ओरडण्यापेक्षा अशी खेळणी आणुन देणे अनेक पालक पसंत करतात. तीच गोष्ट दिवाळिच्या विजेवर चालणर्‍या माळांची. हल्ली घरात वसू जोंबाळायला जागा व वेळ नसतो. ४० रुपयंची माळ आणली आणि एक सण साजरा झाला तरी पैसा वसूल!

अनेकदा व्यापारी ग्राहकांना आकर्षित करण्याकरीत जाणुन बुजुन कमी दराच्या व अर्थातच कमी प्रतिच्या व उत्पादन बंद होउ घातलेल्या वस्तू मागतात. यात आपले दिल्लीचे व्यापारी आघाडीवर. मात्र तुमची दोन पैसे अधिक द्यायची तयारी असेल तर तुमच्या तपशिलाबरहुकुम व मागाल त्या दर्जाच्या वस्तू चीनमध्ये मिळतात.

जगात काय चालते आहे, कशाला मागणी आहे हे पाहण्यासाठी चीनी उद्योजक देशोदेशी प्रदर्शने पाहायला जातात, बाजारपेठांमध्ये काय वस्तु व किती किमतीला विकल्या जातात ते पाहायला जातात व आपल्या देशात त्याच वस्तू अल्पदरात बनवुन त्याच देशांना देउ करतात.

तात्पर्य सरकार, उद्योजक व कामगार या तिघांनीही प्रगतिचा ध्यास घेतलेला आहे असे दिसते.

प्राजु Mon, 02/25/2008 - 21:38

हे अगदी खरे. मिनल तुझे निरिक्षण खूप जबरदस्त आहे.

- (सर्वव्यापी)प्राजु

मीनल Mon, 02/25/2008 - 22:09

ज्यांनी चीन पहीला आहे त्यांना तो आश्चर्य कारक वाटतोच.ज्यांनी पाहिला नाही त्यांनाही चीनचे कुतुहल असते असे मला वाटते. तेव्हा आणि आत ही माझी चीनची background कुणाला सांगितली की भुवया उंचावतात. हो ,अय्या ,कसं,काय अश्या अनेक प्रश्नांचा भडीमार सुरु होतो.

आपण भारतीयांनी चीनचा फारसा अभ्यास केलेला नसतो. खोल इतिहास ही महिती नाही.शिवाय बरेच वर्ष तो देश `closed ` होता. आता ची प्रगती पाहुन चीनचे सर्वांना  कुतुहल  आहे.

त्यामानाने ब्रिटीश म्हणा ,अमेरिका म्हणा आपल्याला चांगलीच परिचयाची आहे.त्यामुळे त्याचे काहींना  आकर्षण असले तरी  कुतुहल  नाही.

चीनचे  कुतुहल  आहे पण   आकर्षण नाही. दोघातिघांना विचारल की अमेरिका जातोस की चीनला? तर प्रगती झालेला देश आणि प्रगती करणारा देश हा मुद्दा सोडला तर कुणीही चीन म्हणणार नाही.

मी बीजिंगला राहिले.It was very luxurious life .but I knew Chinese well. I mean at least communicable .Otherwise daily life  is also difficult even after living there for years.

But I feel it this is valid for any NonEnglish speaking countires.German,Russia ,French-- all same !You must know their language well to make your life not luxurious but easy.

Compared to that English speaking countries are easy to get in  routine and to settle.

Typing in English is faster ,so used English  words!

sorry for  that.

मदनबाण Mon, 02/25/2008 - 23:42
"मागणीनुसार उत्पादन' हे समीकरण अचूक अवलंबले गेलेले दिसते. जपानसारख्या नावीन्यपूर्ण वस्तूंचा शोध लावणा-या देशाकडून माहिती मिळवणे, त्यातील बारकावे समजून घेणे व त्याची चक्क नक्कल करण......

भारतीय बाजारातील अनेक चीनी वस्तु पाहुन मनोमन याची खात्री पटते.

-------------------------------------------------------------------------------
फेंगशुई (आर्ट ऑफ प्लेसमेंट) या वस्तूंच्या रचनेच्या कलेचा वापर आपल्या समृद्धी व उत्कर्षासाठी करण्याचे फॅड भारतातही एवढे पसरले आहे की आपले भारतीय वास्तुशास्त्र सोडून लोक या चिनी कलेच्या नादी लागले आहेत.
------ १००% सहमत..... बांबुची रोपे,लाफिंग बुद्धा, तोंडात नाणे घेतलेला बेडुक,,,,पाण्याच्या थाळील कासव,,,,(हे अनेक व्यापार्र्‍यांकडे दुकानात ठेवलेले पाहीले आहे.) आणि आपल्या घरा समोरील तुळ्स मात्र कुठेतरी हरवली आहे.
-----------------------------------------------------------------------
सरकारनेही अंतर्गत राजकीय खेळी न खेळता, स्वहिताचे उद्दिष्ट गुंडाळून ठेवून जनहिताचे कार्य चालू ठेवले----------
आपले नेता मंड्ळी (विधान सभा ,राज्यसभा इथे कश्या प्रकारे कुस्ती खेळतात हे अनेक जणानी पाहीले असेलच्.....एक मेकांवर फेकलेले मईक आठवा.) या ड्ब्लु
ड्ब्लु एफ साठी कोण्ता बेल्ट द्यायचा यांना?
---------------------------------------------------------------            
कडक नियम, नियमांचे उल्लंघन करणा-यांविरुद्ध कारवाई व त्वरित शिक्षा यामुळे कायदा व सुव्यवस्था राखणे सोपे झाले.:--------
 आपल्या इथे :----- काय द्यायच ते बोला !!!!!(हे सोप्या भाषेत समजवणे फार कठीण आहे.)

हा माझा ई सकाळ्मधे प्रकाशित झालेला अजून एक लेख .चीनमधे राहत असताना लिहिला होता.

सूर्यास्त ३ - (उडता/ बुडता)

सर्वसाक्षी ·

धनंजय Mon, 02/25/2008 - 19:14
विमानातून ही दृश्ये नेहमी मन मोहतात. तुम्ही ही चित्रे टिपण्याचा प्रयत्न केला याबद्दल कौतुक वाटते. (नाहीतरी तुमची चित्रे आवडतात, हे वेगळे काय सांगावे?)

परंतु ही चित्रे जमणे अतिशय कठिण. टिपायचे काय तर खिडकीतून जे दिसेल ते, आणि तेही  क्षणभरच! शिवाय खिडकीच्या दुहेरी काचांवरची पुसट प्रतिबिंबे टाळायची तुम्ही घेतलेली काळजी म्हणजे ++.

पण खरे सांगावे, तर मजा नाही आली.

प्रभाकर पेठकर Mon, 02/25/2008 - 19:53

खल्लास, श्री. सर्वसाक्षी, एकूण धडपड कौतुकास्पद.

पण तुम्ही टेक्निकल सिक्रेट्स (लेन्स, स्पीड, ऍपरचर वगैरे वगैरे) शेअर करीत नाही, ह्याचे वाईट वाटते.

प्राजु Mon, 02/25/2008 - 20:16

कवितेते सुर्याला ठेवून सर्वसाक्षी  असे तुमचे जे वर्णन केले ते सर्थकी लागले... :)

- (सर्वव्यापी)प्राजु

विसोबा खेचर Mon, 02/25/2008 - 21:00

साक्षीदेवा,
धन्य आहे तुझी! चित्रे आणि वर्णन केवळ अप्रतिम...!

आकाश आभ्राच्छादित होते आणि सूर्य आकाशात नाही तरी खाली जमिनीवरच्या खाचरांमध्ये प्रतिबिंबीत झालेला होता.

हे चित्र तर लाजवाब...!

आपला,
(भास्करप्रेमी) तात्या.

चतुरंग Mon, 02/25/2008 - 21:22

कॅमेर्‍याच्या माध्यमावरची तुमची हुकुमत वाखाणण्याजोगी आहे. उडत्या विमानातून, खिडकीवरचे प्रतिबिंब टाळून अचून चित्र पकडणे केवळ कौतुकास्पद!

चतुरंग

ऋषिकेश Mon, 02/25/2008 - 23:50

दुसरे चित्र लाजवाब :).. खूप खूप आवडले.. बाकी चित्रेही मस्त आहेते हे वेसांनल
-ऋषिकेश

तो अजस्त्र पक्षी उंचावरची निळाई सोडुन अलगद ढगांच्या दुलईत शिरला तेव्हाच लक्षात आले की उतरायची वेळ जवळ आली. मस्तपैकी जांभई देत जरा आखडलेले अंग ताणले आणि मांडीवरचा कॅमेरा सटकता सटकता वाचला. संध्याकाळ होत आली होती. कॅमेरा हाती लागताच विचार चमकला, चला संधी मिळाली तर आज उडता सूर्यास्त टिपावा! मी कॅमेरा सज्ज करुन ढग पार व्हायची आतुरतेने वाट पाहु लागलो. मात्र आणखी थोडे खाली येताच भ्रमनिरास झाला. आज मळभ होते, आकाशात ढगांचे राज्य होते. सूर्यनारायण आज दर्शन द्यायला राजी नसावेत. अचानक काळ्या ढगांचा पडदा किंचितसा उसवला आणि झरोक्याला इंद्रधनुष्यी छटा देत सूर्यनारायण हळूच डोकावले आणि परत गायब झाले.

क्रिकेटचं चांगभल

मोहन ·

जुना अभिजित Mon, 02/25/2008 - 18:50

हे म्हणजे अगदी मल्लिका शेरावत सारखं झालं. लोकांना बघायला आवडतं म्हणून मी दाखवते. किती दाखवायचं काय दाखवायचं ह्याला काही ताळतंत्र?.

१. रोजगार-  नगण्य फरक पडेल.  या बद्दल कोणाच्या रोजगारात फरक पडण्याची अपेक्षा आहे? किंवा आधी किती रोजगारनिर्मिती होत होती?  क्रिकेटचे मैदान, स्टेडीयम वगैरेची देखभाल करणार्‍यांना रोजगार मिळेल.  चार्टर्ड अकौंटंटना रोजगार मिळेल.

२. मित्रहो जाहीरातींचा हा खर्च आपण सर्व उत्पादनांच्या वाढीव किमती देवून उचलणार आहोत : बरोबर आहे. ही जाणीव आली तर लोक आरोग्याला आणि खिशाला अनावश्यक खर्च टाळण्याच्या मागे लागतील.

३. क्रिकेटची प्रगती ?  हे काय असते? क्रिकेटची प्रगती होणे न होणे हे त्या खेळाशी संबंधित संस्था म्हणजे बीसीसीआय बघून घेईल. देश जेव्हा एखादा खेळ पुरस्कृत करतो तेव्हा त्याची चिंता आपण करू उदा कबड्डी, हॉकी. मुळात क्रिकेटर लोक बीसीसीआय साठी खेळतात. उदा: कपिल देव हा वर्ल्ड कप जिंकणार्‍या संघाचा कर्णधार होता. पण आय्सीएलमध्ये गेल्यावर बीसीसीआयने त्याची पेन्शन बंद केली.  

४. तयार रहा, कंबर कसा, पोटाला चिमटा काढण्यास तयार रहा: इच्छा नसताना ज्या जनतेला या सर्वाची झळ बसणार आहे त्या बद्दल वाईट वाटते. क्रिकेट आवडणार्‍यांनी पुन्हा एकदा विचार करावा की हेच ते क्रिकेट आहे का जे आपल्याला बघायला आवडते.

तात्पर्यः सर्वांना कळकळीची विनंती आतातरी शहाणे व्हा. देशबिश मध्ये आणू नका. अनावश्यक खर्चाला आळा घाला. कोक, पेप्सीला कळू द्या की क्रिकेट त्यांचे सेल्स वाढवू शकत नाही.

ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

या विषयावर मागल्यावेळेला म्हणजे जेव्हा इंग्लंडमधे विश्वचषक चालू होता तेंव्हा एक लेख 'सकाळ' मधे छापून आला होता. त्यात क्रिकेटच्या प्रेमाला 'स्वप्निल नशा' असे म्हटले होते. तेव्हा कारगिलचा संघर्ष गाजत होता. तेव्हा त्याच्या अनुषंगाने 'स्वप्निल नशा' हा शब्द वापरण्यात आला होता. त्यात जेवढा मानमरातब क्रिकेट खेळाडूना देतात त्याच्या १/१० तरी आपल्या जवानांच्या वाट्याला येतो का? असा सवाल विचारण्यात आला होता.

ता.क. नक्की कोणत्या विश्वचषकाच्या वेळेला कारगिल संघर्ष झाला हे मला नक्की आठवत नाही पण हा लेख मात्र आठवतो आहे.

पुण्याचे पेशवे

विसोबा खेचर Mon, 02/25/2008 - 21:18

तर मित्रहो तयार रहा, कंबर कसा, पोटाला चिमटा काढण्यास तयार रहा  कारण  आपल्या सगळ्यांना मुकेशभाई, शाहरुखभाई, प्रितीताईं  ईत्यादींना ( आणि हो शरदभाऊ राहिलेच)  क्रिकेट्च भलं करायला मदत करायची आहे.  

पूर्ण सहमत..!

सध्या खेळाडूखरेदी, त्यांचा लिलाव, वगैरे जे प्रकार सुरू आहेत ते पाहून हसावे की रडावे हेच कळत नाही. माझ्या मते या प्रकारांना कायद्यानेच पूर्ण बंदी घालावयास हवी. कारण मध्यम ते दूरच्या भविष्यात सामान्य माणसाच्याच खिशाला या सर्वाची अप्रत्यक्ष झळ बसणार आहे हे निश्चित!

मोहनरावांनी अतिशय चांगला विषय चर्चेस घेतला आहे!

तात्या.

चतुरंग Mon, 02/25/2008 - 22:06

व्यथित व्हायला झाले आहे. उत्तम पैदाशीचे घोडे जसे विकले जातात तसे हे खेळाडू विकले गेले आहेत. सगळ्याच गोष्टींचे व्यावसायीकरण करून शेवटी सर्वसामान्य माणसाच्या जीवनातला साधा खेळाचा आनंदही हिरावला जाणार आहे आणि त्याची जागा महागाईचे चटके घेणार आहेत. असा विषय चर्चेला आणल्याबद्दल मोहनरावांचे आभार.

चतुरंग

विजुभाऊ Tue, 02/26/2008 - 13:14

जुन्या काळी गुलाम विकले जायचे......

केरि पेकर ने खेळाडुम्ची सर्कस काढली होती...

बाकी आपले क्रुषी मंत्रि ह धन्द छान करतात.....

मला वाटते की त्याना त्या पैशातुन शेतकर्यांचे काही तरी भले करायचे असेल

केशवराव Tue, 02/26/2008 - 14:25

मला वाटते कि त्याना त्या पैशतून शेतकर्‍यांचे काही तरी भले करायचे असेल.

  विजूभाऊ,  एकदम त्यांच्या मनातले  ओळखलेस. कमाल आहे तुझी.

                                                  --------  केशवराव.

गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटपेक्षा त्यातल्या  "कोटींची" चर्चा वाचून / पाहून बरेच विचार मनात येताहेत. आयपीएल नामक क्रिकेट-व्यापार आता सूरू झाला आहे. खर पाहिलं तर व्यापार हा समाजाच्या भरभराटीचा निर्द्शक समजला जातो.  नफा कमावण्याचा मुख्यहेतू असुनही, रोजगार निर्मिती, क्षेत्रिय विकास, सामाजीक व पर्यावरणाचा विकास  इत्यादि हेतू  साध्य करायचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवायचे अभिप्रेत असते. 

आयपीएल क्रिकेट-व्यापार काय साध्य करेल ?

क्रिकेटची प्रगती ? -   क्रिकेट तज्ञच या बद्दल साशंक आहेत. आपण काय लिहीणार?

हे शब्द कोठे गेले

विजुभाऊ ·

अवलिया Mon, 02/25/2008 - 16:56

अडचण - हल्ली लोक सर्रास प्रोब्लेम असा आंग्ल शब्द वापरतात

मंडळी - मिसेस (उच्चार मिशेस)

कुटुंब - फ्यामिल्ली

सोडुन दे - ड्रोप कर

भोजन, जेवण - लंच डिनर

भेटायला कुणी आले आहे - गेस्ट आले आहेत

पाहुणे  - रिलेटिव

डोके दुखत आहे - डोक्याला हेडेक आहे

नाना

विजुभाऊ Mon, 02/25/2008 - 17:05

नाना आपण मराठी शब्दांबद्दल बोलुया....

उदा:मातेरं...... त्याने चांगल्या गोश्टीचे मातेरं केलं ( मातेरं नेहमी चांगल्या गोश्टीचे च होते.....वाइट  गोश्टीचे होत नाही)

 मातेरं हा शब्द कोणत्या भाशेतुन मराठीत आला? त्याचा नक्की अर्थ काय?

In reply to by विजुभाऊ

जुना अभिजित Mon, 02/25/2008 - 19:20

माझ्या माहितीप्रमाणे चांगलं कापड वापरून जूनं झालं की पाय पुसणी म्हणून किंवा फरशी पुसायला वापरतात त्याला मातेरं म्हणतात.

ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

In reply to by चतुरंग

पोतेरं : घरातल्या भिंतीना कापडाच्या सहाय्याने मातीचा लेप देणे.. बहुतेक वेळा चुलीच्या खोलीत देतात कारण तिथे भिंत काळी होते

In reply to by विजुभाऊ

सृष्टीलावण्या Tue, 02/26/2008 - 13:31

म्हणजे कुठल्याही गोष्टीला मुठमाती देणे, ती गोष्ट पूर्ण मातीत गाडणे...

मातेरं नेहेमी चांगली गोष्ट वाईट होण्याबद्दल म्हटले जाते पण जर एखादी गोष्ट चांगली झाली तर त्याला त्या गोष्टीचे सोने झाले असे म्हणतात.

वडापाव Mon, 02/25/2008 - 17:55
हा शब्द सर्वजण विसरलेच आहेत जणू.
आता तर कपाट हा शब्द सुध्दा 'कप्बोर्ड' या नावाने संबोधला जातो. अर्थातकपाट हा शब्द याच इंग्रजी शब्दामुळे अस्तित्वात आला.
        
In reply to by वडापाव

धनंजय Mon, 02/25/2008 - 18:53
कपाट शब्द महाभारतात सापडतो. तिथे आणि जुन्या मराठीत, अर्थ दरवाजा. (म्हणजे द्वार नव्हे, तर जे उघड-बंद होते ते.)
दरवाजे असलेल्या फडताळाला कपाट म्हणू लागले असावेत.

विजुभाऊ Mon, 02/25/2008 - 18:26

मित्रानो आपण फक्त मराठी शब्दांबद्दल बोलुया

कपाट याला फडताळ हा अस्सल मराठी शब्द आहे.

पण फडताळ हा शब्द तरी कोठुन आला?

पण अंमळ आणि खुश्की हे दोन शब्द हल्ली वापरातच नाहीत

कोडगा  : मारावयाचे एक साधन(Hunter) 

हा शब्द निगरगट्ट या अर्थाने केंव्हा पासुन वापरायला सुरुवात झाली?

रोडगा म्हणजे काय? आणि तो मरिआई ला का वहातात?

In reply to by विजुभाऊ

धनंजय Mon, 02/25/2008 - 19:02
कोडगा म्हणजे लाथाबुक्क्यांचा मार, चाबकाचा नव्हे
चाबकासाठी "कोरडा" असा शब्द प्रचलित आहे.

कोडगेखाऊ म्हणजे मार=कोडगे खाऊन निर्ढावलेला, निर्लज्ज. कोडगा शब्दाचा तोही अर्थ - लघुकरण असावे.

रोडगा रोट शब्दापासून, कणकेत थोडे बेसन आणि मसाले घालून त्याची जाडी पोळी. तो मरीआईला का वाहातात माहीत नाही - एकनाथांच्या भारुडात तसा उल्लेख आहे.

सुधीर कांदळकर Mon, 02/25/2008 - 20:52
तस्मै नमः। दुसरे काय? ज्ञानेश्वरांच्या काळचे शब्द आता अस्तंगत झालेले आहेत. शतपत्रांतील भाषा, टिळक आगरकारांची भाषा आठवा. किती वेगळी आहे. आपले वय ठाऊक नाही. पण किमान २५ धरतो. १५ वर्षापूर्वीची भाषा आता तशीच कशी राहील. जशी शेकस्पीअरची इंग्रजी बदलली तशीच ज्ञानदेवांची मराठी देखील  बदलली. तिने मोगलाईत फारसी शब्द उचलले. इंग्रजांच्या राज्यात इंग्रजी शब्द उचलले. गोव्यात तिने पोर्तुगीज शब्द उचलले. उदा. शेटजी या अर्थाने बोलला जाणारा पात्रांव हा शब्द. भाषा बदलणारच. बदल हे जिवंतपणाचे लक्षण आहे. नाही बदलली तर ती मृत होईल. काळजी करू नये. आता तर मराठी बोलणारांची कॉल सेंटर्स उघडत आहेत. या बदलाला सम्यक दृष्टीने सामोरे जायला हवे. नव्हे बदलाचे स्वागतच करायला हवे.

प्राजु Mon, 02/25/2008 - 21:33

सुधिर कांदळकर म्हणतात ते खरंच आहे. बदल हे जिवंतपणाचे लक्षण आहे.

- (सर्वव्यापी)प्राजु

चतुरंग Mon, 02/25/2008 - 21:51

बी.बी.सी. रेडियोच्या अनेक भाषातील वाहिन्या आहेत त्यातल्या हिंदी वाहिनीवर एकदा एका चर्चेत एक इंग्लिश माणूस हिंदीतून बोलत होता अचानक त्याने असा एक शब्द वापरला की जो हिंदी वाटावा, पण तो हिंदी नव्हता. लगेच तिथल्या हिंदी भाषक भारतीयाने त्याला सांगितले "आप ने जो शब्द अभी इस्तेमाल किया उस तरह का शब्द हिंदी में नहीं हैं." ताबडतोब इंग्लिश माणसाने उत्तर दिले "नहीं हैं तो होना चाहिये!" आणि ते खरं आहे. इंग्लिश भाषा वेगाने विकसित होण्यामागचे एक मोठे कारण त्या भाषेने स्वीकारलेले नवनवीन शब्द - धोती, कुर्ता, पजामा, गुरु असे कितीतरी शब्द आज इंग्लिश भाषेने आत्मसात केलेले आहेत.

चतुरंग

पिवळा डांबिस Mon, 02/25/2008 - 23:33

किंबहुना = परंतु = पण

पोशाख

मतलई = खारे वारे आणि मतलई वारे

एकसमयावेच्छेदेकरून = ?

वस्तुतः

सध्या इतकेच आठवतात, आज रात्री "पण लक्षात कोण घेतो?" उघडून बसतो, बख्खळ शब्द मिळतील! :))

चतुरंग Tue, 02/26/2008 - 01:16

माझे आजोबा वापरत ते काही शब्द -

काळोख (अंधार)

रुची (चव) (आज तोंडाला रुची नाही.)

भुरका (कढीचा वैगेरे मारतात तो भुरका, घोट मधे ती मजा नाही:)

कढत (गरम. पण कढत ह्या शब्दात एक वाफाळलेपणाची छटा आहे उदा. ऊनून भातावर कढत पिठले वाढले!:)

थट्टा (चेष्टा, मस्करी.) ह्या मधे मित्रत्वाने केलेली असल्याचा भास आहे.

स्नेही (मित्र). ह्या मधे आपलेपणा, जिव्हाळा अशाही छटा जाणवतात.

चतुरंग

प्राजु Tue, 02/26/2008 - 06:37

माझ्या आजीचे शब्द :

मोरी : बाथरूम्/न्हाणीघर
शिंकाळं : वरती टांगून ठेवलेलं मडकं
परसदार : बॅक यार्ड
चुलवण : चूल्(बहुतेक)

- (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

जुना अभिजित Tue, 02/26/2008 - 09:27

ह्या चित्रात बाजूची कढई ज्यावर ठेवली आहे त्याला चुलवण म्हणतात.

जाळाच्या नुसत्या धगीवर कढई गरम राहते. स्लो हीटींग.

ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

In reply to by जुना अभिजित

धनंजय Tue, 02/26/2008 - 19:02
छान आठवण आली चित्र बघून. आमच्याकडे त्या शेजारच्या जागेला "वैल" म्हणतात.

विजुभाऊ Tue, 02/26/2008 - 11:00

घोट घोट घेतात ते वेग्ळेच असते रे चतुरंगा

उसासे टाकणे म्हणजे काय?

माळवद म्हणजे काय?

वानगी म्हणजे उदाहरण्...उदः वानगी दाखल.

दाखल.....दखल आणि दाखला हे समानार्थी शब्द आहेत काय?

त्यांचे नक्कि अर्थ काय? ते कोणत्या भाषेतुन आले?

In reply to by विजुभाऊ

चतुरंग Tue, 02/26/2008 - 20:49

उसासे टाकणे म्हणजे काय?
उसासे टाकणे = म्हणजे तात्या आणि डांबिसकाका छानपैकी मैफिल जमवून 'घेत' बसले आहेत आणि विजुभाऊ नुसतेच बघत बसले आहेत त्यावेळी जे सुस्कारे टाकतील त्याला म्हणतात ;)

ह्या शिवाय शिवकालीन किंवा पेशवेकालीन खापरी नळांमधून जे पाणी गावात आणीत असत त्या नळांतून मधे अडकलेली हवा बाहेर निघून जाण्यासाठी नळांवर उंच जागी दीपमाळेसारखे झरोके ठेवलेले असत त्याला 'उसासे' म्हणत (आजच्या तांत्रिक भाषेत "एअर रिलीज वॉल्व")

माळवद म्हणजे काय?
माळवद = गच्ची (हा शब्द अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक इ. भागात प्रचलित आहे)

दाखल = हजर होणे / भरती करणे (शिपाई सैन्यात दाखल झाला),
(रोग्याला इस्पितळात दाखल केले)

दखल = नोंद घेणे  (इस्पितळात आलेल्या रोग्याची डॉक्टरांनी दखलही घेतली नाही)

दाखला = उदाहरण/सर्टिफिकेट (हा महाराजांच्या मुत्सद्देगिरीचा दाखला होता) (त्याने जन्माचा दाखला मागितला).
चतुरंग

In reply to by चतुरंग

पिवळा डांबिस Wed, 02/27/2008 - 02:28

क्या बात है चतुरंगजी, आज नुसती फटकेबाजी चाललीये!! :))

सृष्टीलावण्या Tue, 02/26/2008 - 13:24

म्हणजे मोक्षाची इच्छा करणारा (आणि अर्थातच त्यासाठी कठोर तपाचरण 

करणारा असा)

असाच एक सध्या निर्वापरातला शब्द म्हणजे निर्जळा जो संकष्टी, 
एकादशीला उपासासाठी वापरत असत. 

पूर्वी उपास साबुदाणा खिचडी, शेंगदाणा आमटी, वेफर्स असा चविष्ट न 
करता शरीराला झीज होईल असा केला जायचा, निर्जळा एकादशी ही 
त्यापैकी एक. 

निर् +जल = पाणी सुद्धा न घेता.

रिकामटेकडा Tue, 02/26/2008 - 13:46
चुलीच्या बाजूला आहे तीला वैल म्हणतात.
सध्या
किल्ली या ऐवजी चावी आणि कुंचा या शब्दा ऐवजी झाडू हे शब्द प्रचलित आहेत

विजुभाऊ Tue, 02/26/2008 - 16:23

दळभद्री : ह शब्द खरेतर हद्दपार झालेला....पण तो टिकवण्याचे श्रेय मात्र थोरल्या ठाकर्यांचे.

पण हा शब्द ही कसा कोठुन आला?

विजुभाऊ Tue, 02/26/2008 - 16:24

सुधीर कांदळकर Tue, 02/26/2008 - 21:24
दोन शब्द आताच कळले. चुलवण वाचला होता. पण अर्थ आता कळला. माळवद हा शब्द अडगळ ठेवलेला पोटमाळा या अर्थाने वाचल्याचे आठवते. एका कथेत आजी नैवेद्यासाठी फराळ शिजवईत असते. त्यात आजोबा हात घालू नये म्हणून ती आजोबांना माळवदावर चढून काहीतरी काढायला सांगते. व ते चढले की शिडी काढून घेते. शेजारचा ८ वर्षाचा मुलगा तेथे असतो. शिडी लावावी म्ह्णून आजोबा वरून तर लावू नये म्हणून आजी खालून त्याला दटावत असतात. अशी गंमतीदार गोष्ट होती. म्हणून खास लक्षात राहिली.

प्रभाकर पेठकर Tue, 02/26/2008 - 23:17

मॅनिला = सदरा = शर्ट
विजार = पँट
श्मश्रू = केस कापणे
जाजम = गालिचा = कार्पेट
ओगराळं = आमटी वाढण्याचं पात्र
डोया = माठातून पाणी काढण्याचा डाव किंवा दांडी असलेलं भांडं
परस = घराची मागची बाजू
घडवंची = तिवई = तीनपायी (ज्यावर माठ, छोटे पिंप ठेवतात)
छबिना = आरसा (?)
चंची = कमरेला अडकवायची पानाची कापडी पिशवी.
कसा = कमरेला अडकवायची पैशाची कापडी पिशवी.
चंबू = लहान मुलांचे विशिष्ट आकाराचे पाण्याचे भांडे.
गुडदाणी = गुळ आणि दाण्याची चिक्की (?).
छकडा = अच्छादित बैलगाडी.
पांगुळगाडा = लहान मुलांस चालायला शिकण्यास मदत करणारा गाडा
अवजारं = व्यावसायिक हत्यारं (शेतीची, सुताराची, नाव्ह्याची इ.)

प्रमोद देव Wed, 02/27/2008 - 08:45
घडवंची(स्त्री): चार पायांची व वर फळी असलेली लाकडी वस्तू
(राजहंस व्यावहारिक मराठी शब्दार्थकोश... प्रमाणे)

विजुभाऊ Wed, 02/27/2008 - 12:59

त्याला गडु  हाही शब्द आहे.

गडगा हाही शब्द आहे......तो बहुधा समानाअर्थी असावा

विजुभाऊ Wed, 02/27/2008 - 13:00

गुडदाणी = गुळ आणि दाण्याची चिक्की (?).

होका.मी गुड्दाणी म्हणजे गुडगुडी समजायत होतो....

विजुभाऊ Wed, 02/27/2008 - 13:11

छबिना = आरसा (?)

छबिना = देवाचा छबिना असतो......त्याची पालखीत मिरवणुक कढतात

विजुभाऊ Wed, 02/27/2008 - 13:12

प्रमोद देव Wed, 02/27/2008 - 13:19
म्हणजे..... १. देवाच्या पालखीची मिरवणूक. २. राजाची मिरवणूक.
३. घोडेस्वाराचा रात्रीचा पहारा.

लिखाळ Wed, 02/27/2008 - 16:03

छान चर्चा !

खण = कप्पा किंवा ड्रॉवर

खरेतर फडताळ हा शब्द शेल्फ या शब्दाला वापरला जातो असे मला वाटते. ज्या फडताळाला दारे आहेत ते कपाट. उघडे असेल तर फडताळ. किंवा मांडणी.

-- लिखाळ.

'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

विजुभाऊ Sat, 05/17/2008 - 15:25
फोकलीच्या या शब्दाचा अर्थ काय. शिंदळी हा शब्द फक्त शिवी साठे राहीला आहे. शिंदळी म्हणजे चहाडी चुगली चहाडी हा अस्सल देशी शब्द. चुगली हा शब्द चुगाली असा हिंदी मध्ये वापरला जातो .पण चुगाली चा अर्थ रवंथ करणे असा होतो

विजुभाऊ गुरुवार, 02/28/2008 - 15:06

जाजम = सतरंजी

सोवळे  म्हणजे काय माहीत आहे...पण

ओवळे म्हणजे काय?

उदा: तिने ओवळ्याने सगळा स्वयंपाक केला.

In reply to by विजुभाऊ

धनंजय गुरुवार, 02/28/2008 - 18:24
प्रत्यक्षात अंघोळ न करता, ती स्वयंपाकाला लागली.

या शब्दात अमंगलता आणि अस्वच्छता दोन्ही ध्वनित होतात.

विजुभाऊ गुरुवार, 02/28/2008 - 18:41

 हरताळ :पूर्वी सावकारांच्या पेढ्यांवर जे हिशोब लिहिले जायचे त्यात कही भाग खोडुन दुरुस्त करायचा असेल तर त्या लिखाणावर पिवळी पावडर फासली जायची.त्या पिवळ्या पावडर ला हरताळ म्हणत.

आपण मात्र हरताळ फासणे...शब्द संप्/बंद या आर्थाने वापरतो..

मंडळी....हा विषय मस्त चालला आहे........झकास प्रतिसाद आहे.....सर्वांचे धन्यवाद्........छान माहिती आणि मनोरंजन होतय्.....अजुन शब्द येउद्यात....मराठी मनोरंजन कोश बनवुया.....

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 02/28/2008 - 21:23

हा शब्द कोणाला माहीत आहे का?

'किंतान' म्हणजे तागाच्या कापडापासून तयार करतात. त्याचाही उपयोग बसण्यासाठीच होतो. कोणाला अधिक माहीती आहे का?

पुण्याचे पेशवे

In reply to by विजुभाऊ

मस्त कलंदर Sat, 08/01/2009 - 02:02
जरत्कारू म्हणजे बायको.... गजानन महाराजांच्या ग्रंथात हा शब्द वाचला होता... नि किंतान म्हणजे अनेक गोणपाटे एकत्र जोडून बनवलेले आच्छादन... शेतकरी हे मल्टीपर्पज म्हणून वापरतात.. हवे तर बसायला.. हवं तर धान्य, कडबा किंवा तत्सम वस्तू झाकायला.... मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

In reply to by मस्त कलंदर

प्रमोद देव Mon, 08/03/2009 - 12:51
जरत्कारू म्हणजे बायको नाही. जरत्कारू चा शब्दकोशातील अर्थ आहे....अशक्त व हडकुळा(मनुष्य) हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

विजुभाऊ Fri, 02/29/2008 - 11:36

जाणता.......याचा अर्थ सगळे जाणतात

याच्या जोडिने येणारा शब्द म्हणजे "नेणता"

काहिवेळा " नेणिवेच्या पलिकडले " असाही शब्द प्रयोग करतात

नेणता / नेणीव  म्हणजे काय

विजुभाऊ Sat, 03/01/2008 - 09:47

मळभ = ढग ? मळभ दाटले .....

मळवट या शब्दाचा नक्की अर्थ काय?

माळणे = गजरा माळणे........याच्याशी काही संबंध आहे का?

मदनबाण Sat, 03/01/2008 - 10:51

गावो गाव जाणारी एसटी ही कुठल्या ना कुठल्या आगारा तुन येते वा जाते...

आगार या शब्दाचा नेमका अर्थ काय?

संजय अभ्यंकर Sat, 03/01/2008 - 21:21
वाघिण = मालगाडीचा डब्बा (इंग्रजी वॅगन वरुन) शिस्त = systematics (शिस्त मॅटिक चा अपभ्रंश) अपभ्रंश = चूकीचा उच्चार यच्च्यावत = सर्व (पूर्ण समूह) एकसमयावच्छेद = एकाचवेळी व्यतिरीक्त = ...च्या शिवाय (...ला सोडुन) उपरोक्त, उपरोल्लेखित, उपरनिर्दीष्ट = वर लिहिलेले, आधी सांगितलेले पेला = पाण्याचे भांडे लोटी = पाण्याचे पात्र घंगाळ = पाणिसाठवण्याचे मोठे भांडे (पात्र) माठ = पाणी साठवण्याचे मातीचे पात्र. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

In reply to by संजय अभ्यंकर

लिखाळ Sat, 03/01/2008 - 21:58
शिस्त = systematics (शिस्त मॅटिक चा अपभ्रंश) अरेच्या ! असे आहे होय हे. कमालच आहे. मला वाटले होते की शास्ता = शासन करणारा अश्या कोणत्यातरी शब्दातून शिस्त, शिस्तप्रिय हे शब्द आले असतील. शिस्त हा शब्द इंग्रज येण्या आधी नव्हताच का म्हणजे? कृपया अधिक प्रकाश टाकावा ही विनंती. --लिखाळ. 'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

मगो Sun, 03/02/2008 - 04:20
माजघर, ओटी, पडवी, दिवाणखाना हेही शब्द प्रचलित नाहित. बहुदा घराच्या मुख्य दरवाजान॑तरची जागा पडवी , न॑तर ओटी- जीथे आसनव्यवस्था असते, माजघर म्हणजे सध्याचा hall आणि दिवाणखाना म्हणजे 'बेडरूम'... पूर्वि बाहेरील लोका॑चा वावर जास्तीतजास्त ओटी पर्यन्त असायचा. शिवाय तुळई-भाल॑(घराचे आधारस्त॑भ), तसराळ॑ (कडईसारख॑ पसरट॑ मोठ॑ भा॑ड॑), कु॑चा (झाडु), सारवण (शेण), फाटी (लाकडाचे उभे तुकडे), पायताण(चपला), पायजमा (ले॑गा), मोची (चा॑भार), गवळी (दूधवाला), कडी-कोय॑डा (दाराची कडी, कुलुप), खापर॑ (नळीची कौल॑, मडक्याचा तुकडा), चोपडी (हिशोबाची वही), बोळ॑ (गल्ली), दुचाकि (सायकल), घ॑गाळ॑ (आ॑घोळीच॑ भा॑ड॑), चेन्डुफळी (क्रिकेट), फलक॑ (बोर्ड ), फाटक॑ (दार, गेट)शिकवणि (क्लास), स॑दूक (पेटारा), दौत्(शाई), खु॑टी (काही अडकवण्यासाठी लाकडी हूक),चिमणी (लहान दिवा) ......ई. ई. ई आठवत॑ बसलो तर॑ खुप आठ्वतील असे शब्द॑.... ...पण॑ आठवताना माझ॑ मन॑ मात्र नकळत॑ माझ्या गावात एक फेर॑फटका मारुन॑ आल॑... असो, खुप मजा येतेय॑ ... - मोकळ्या मनाचा मगो (महेश गोविलकर)

In reply to by मगो

चतुरंग Sun, 03/02/2008 - 12:02
कडी-कोयंडा मधली कडी म्हणजे एकमेकात अडकवलेल्या सर्वसाधारणपणे तीन लांबट दुव्यांची असे. आणि कोयंडा म्हणजे आजच्या भाषेत 'बोल्ट' जो आडवा सरकवून दरवाजा लावला जातो आणि त्यामधून नंतर कुलूप लावतात. ओघातच आठवलेला आणखी एक शब्द म्हणजे 'आडसर' - पूर्वी वाड्यांमधे अनेक बिर्‍हाडे असत. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी वाडयाला एकच मुख्य मोठे दार असे ते रात्रीच्या वेळी बंद केले जाई आणि त्याला आतून एक मोठा जाडच्या-जाड लाकडाचा ओंडका सरकवून लावला जाई त्याला म्हणत. तो दाराच्या पाठीमागेच भिंतीत सरकवून बसवण्याची सोय असे. चतुरंग

विजुभाऊ Mon, 03/03/2008 - 13:26
तसराळ॑ नाही...तरसाळे..... मराठीत काही शब्द जोडिजोडीनेआले कि त्यान्चे अर्थ बदलतात. दळण म्हणजे काहीत आहे वळण म्हणजे काहीत आहे दळणवळण याचा अर्थ मात्र संदेशवहन /प्रवास (वाहून नेणे)असा होतो... हे असे का?

In reply to by विजुभाऊ

प्रमोद देव Mon, 03/03/2008 - 13:49
हा शब्द बरोबर आहे. तसराळे असेही म्हणू शकतो. दळण: दळण्याची क्रिया ; जे दळायचे ते धान्य वळण: वाकडे होणे,वळणे(रस्त्याचे वळण); विशिष्ट पद्धतीने आकार देणे अथवा सवयी लावणे( मुलाला अथवा मुलीला चांगले वळण लावणे)

विजुभाऊ Mon, 03/03/2008 - 13:29
शिस्त = systematics (शिस्त मॅटिक चा अपभ्रंश) हे चूक आहे. शिस्त हा शब्द शास्ता = शासन करणारा ("कंट्रोल "या अर्थाने)आणि त्याला शासन करण्यसाठी आवश्यक घटक

सृष्टीलावण्या Mon, 03/03/2008 - 16:36
पूर्वी तेलाचा अथवा तुपाचा दिवा विझला की एक उग्र जळकट वास नाकात शिरायचा तेव्हा माझी आजी म्हणायची दीपुष्टणाचा वास सुटलाय... दीप+उष्टावण असा मूळ शब्द असावा बहुदा... > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

विजुभाऊ Tue, 03/04/2008 - 12:21
दळणवळण याचा अर्थ मात्र संदेशवहन /प्रवास (वाहून नेणे)असा होतो... हे असे का?

विजुभाऊ गुरुवार, 03/06/2008 - 16:50
वदतोव्याघात... मला वाटत होते की वदतोव्याघात म्हणजे बोलायला आणि ती गोष्ट व्ह्यायला एकच गाठ ( कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक गाठ)

विजुभाऊ Sat, 03/08/2008 - 11:01
पारणे म्हणजे काय? डोळ्याचे पारणे फिटणे........म्हणजे नेत्रसूख अनुभवणे ( फर्गुसन रोड वर अनुभवास होते तसे नव्हे) पारणे म्हणजे काय? पारणे फिटते म्हणजे काय होते?(पारणे हे नेसूचे वस्त्र आहे असे एक खौट पुणेकर म्हणतो....तो चूक असावा)

In reply to by विजुभाऊ

(पारणे हे नेसूचे वस्त्र आहे असे एक खौट पुणेकर म्हणतो....तो चूक असाव) सहीच मस्त. हे पारणे सुधा फिटले तर डोळ्याचे पारणे फिटत असेल. ;) च्यामारी फार झाला वात्रटपणा. (ह.घ्या.) पुण्याचे पेशवे

संदूक = छोटी पेटी ज्यात मौल्यवान वस्तू वगैरे ठेवतात. उदा. दागिने, ठेवणीतले उंची कपडे, अत्तरे इ. हडपा = मोठा पेटारा ज्यात साठवणूकीच्या वस्तू किंवा मोठ्या कार्यक्रमाच्या दिवशी लागणार्‍या वस्तू ठेवतात. देवाची पालखी, मोठी पातेली, तपेल्या, गणपतीचे चौरंग, मखर इ. पुण्याचे पेशवे

सुधीर कांदळकर Fri, 03/21/2008 - 18:33
नवरे असलेली स्त्री म्हणजे चवचाल स्त्री. परंतु छप्पन्न टिकल्यांची आवा असे म्हणतात. आवा म्हणजे कजाग स्त्री. २. पारणे फेडणे म्हणजे उपकाराच्या ओझ्यातून मुक्त होणे. पूर्वजांच्या/देवाच्या उपकाराच्या ओझ्यातून मुक्त होण्यासाठी कठोर व्रत करतात. त्या व्रताची सांगता पूजाअर्चा करून नंतर अन्नभक्षण करून करतात. यालाच पारणे फेडणे असे म्हणतात. यावेळी पौरोहित्य करणारे भटजी व मेहुण म्हणून दांपत्य बोलावण्याची व या दांपत्याचा भेटवस्तु देऊन आदरसत्कार करण्याची रीत आहे. ज्ञानसंपन्न पुरूष व त्याची पत्नी किंवा गरीब दांपत्य बोलावितात. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

आंबोळी Sat, 03/22/2008 - 15:58
पायताण = पादत्राण = चपला बारदाण = गोणपाट = पोते लुगड = साडी = पातळ (नेसायचे) फोक = लवचीक काठी (हा साधारण चिन्चेचा आसतो, २-३ पिढ्यामागे शिक्शा करण्यसाठी घरी वडिल व शाळेत गुरुजी याचा वापर करीत असत) परस = घराची मागची बाजू इतिहासजमा झाल्यने परसाकडला जायची सोय राहिली नाही. तम्बाखू पुडीतून मिळायला लागल्यापासून चन्ची सुध्धा इतिहास जमा होत आहे.

ईश्वरी Sun, 05/18/2008 - 02:46
विसण = आंघोळीसाठी तापवलेल्या अति गरम पाण्यात गार पाणी घालून ते भाजणार नाही इतपत ठेवतात. त्या गार पाण्याला विसण म्हणतात. ताटली = जेवणाच्या ताटापेक्षा थोडी लहान सांडशी = चिमटा.. गरम भांडे धरण्यासाठी वापरतात कुंचला = चित्रकाराचा रंगवायचा ब्रश हाळी = हाक मारणे / आवाज देणे रांजण = आकाराने मोठा असलेला पाण्याचा माठ गंठण = मंगळसूत्र (बहुतेक ) वरवंटा = ओला मसाला वाटण्याचे साधन पारोसा = आंघो़ळ न करता ..(आज पारोशानेच बाहेर जावे लागले) टपाल = पत्र दिवेलागणी = संध्याकाळची वेळ ..देवासमोर दिवा लावण्याची आमोशा पोटी = काहीही न खाता , उपाशी आवंढा = ? तोबरा भरणे = तोंडात मोठा घास घेणे वामकुक्षी = दुपारची झोप, दुपारचे जेवण झाल्यानंतर काढलेली डुलकी ईश्वरी

In reply to by ईश्वरी

विसण = आंघोळीसाठी तापवलेल्या अति गरम पाण्यात गार पाणी घालून ते भाजणार नाही इतपत ठेवतात. त्या गार पाण्याला विसण म्हणतात. त्याला आमची आजी विसावण म्हणते. वाईनः (प्यायची नव्हे) मुसळाचा वापर करून कुटण्यासाठीचे दंडगोलाकृती दगडी भोक. वायनाचे तोंड शक्यतो जमिनीच्या समपातळीत असते आणि उर्वरीत भाग जमिनीखाली. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

In reply to by ईश्वरी

सातारकर Mon, 08/03/2009 - 12:40
हे आमोशा पोटी अस आहे का अनुशा पोटी असं आहे ? ----------------------------------------------------------------------------------------- I have seen GOD. He bats at no. 4 for India Matthew Hayden

विजुभाऊ Fri, 07/31/2009 - 16:28
अलगूज = पावा = बासरी भडीमार करणे हा शब्द कशावरून आला असावा? आम्बोण याचा नक्की अर्थ काय? विदर्भात एखाद्या मतीमंदाला भैताड असे म्हणतात. भैताड हा शब्द कशावरुन आला? हारा = टोपली पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

In reply to by विजुभाऊ

पक्या Sun, 08/02/2009 - 13:11
>>पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे मिंग्लीश किंवा इंग्राठी :D

ललिता Fri, 07/31/2009 - 17:40
कशिदा = भरतकाम = embroidery उदा.: आशाताईंचं भावगीत.... घालू कशी "कशिदा" मी होती किती सांगू चुका बोचे सुई फिरफिरुनी येथ उभे राहू नका डोळे हे जुलमी गडे......

दत्ता काळे Fri, 07/31/2009 - 20:07
१.कह्यात वागणे ( एखाद्याच्या अंमलाखाली राहणे ) २. कुपाटी काढणे - ( निष्कारण खोडी काढणे ) ३. लांगालुंगा गोळा करणे - (शेतातल्या तोडणीनंतर राहिलेल्या उरल्यासुरल्या पिकांची वाढे, चारा, वाळलेले शेण इ. आणि जे विकून पैसे मिळतील अश्या गोष्टी गोळा करणे. ) ४.निपुर - (एखादा निकाल विरुध्द जाणे किंवा माघार घ्यावी लागणे ) ५. बेबुदी - (पोटापाण्यापुरती किंवा तात्पुरती सोय करणे ) ( एखाद्या शेतकर्‍याला काळी म्हणजे जमीनअजिबात नसली किंवा त्याच्या खटल्याला निपुर आली तर गांवकरी दुसर्‍याच्या शेतातून त्याला जमीन मिळवून देत आणि त्याची व त्याच्या मुलाबाळांची बेबुदी करीत. ६. वाटखर्ची नसणे - (भटकंती करणार्‍याकडे पैसा नसणे).

In reply to by तर्री

प्रमोद देव Mon, 08/03/2009 - 13:30
१. बेगमी=तरतूद,पुरवठा,साठा २. आगोट(ठ)=पावसाळ्याची सुरुवात किंवा सुरुवातीचा काळ ३. सराई=धर्मशाळा,विश्रांतीस्थान ४. घ(घि)रट=भात भरडण्यासाठी वापरावयाचे मोठे जाते. ५. लळित=देवाच्या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी सोंगे आणून सादर केलेला कार्यक्रम. वरील सर्व शब्दार्थ ’राजहंस व्यावहारिक शब्दार्थ कोशा’तून साभार. लग्न सराई=लग्नाचा हंगाम समारत्न= समापन,समाराधना=व्रताची/उत्सवाची सांगता हे दोन शब्दार्थ माझ्या समजूतीप्रमाणे दिलेत. चुभूदेघे. हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

मराठी मधे अनेक शब्द वापरले जातात्.त्यातले काही टिकतात्.काही विसरले जातात.

उदा: अंमळ आणि खुश्की हे दोन शब्द कोठे गेले

अंमळ हा जरा/ थोडेसे या अर्थाने वापरला जायचा तो ही दे जरा अंमळ थोडेसे...किंवा मी जरा अंमळ झोपतो थोडसा. अशा प्रकारे वापरात होता. 

हा शब्द कोणत्या भाशेतुन मराठीत आला? त्याचा नक्की अर्थ काय?

खुश्की हा फारशी शब्द्..जमीन(कोरडे ठिकाण) या अर्थाने वापरला जायचा .इतिहासात तुर्कानी इस्तान्बुल शहाराचा ताबा घेतला आणि युरोपियन लोकना भारातात येण्याचा खुश्कीचा मर्ग बन्द झाला.( या एकमेव वाक्याशिवाय हा शब्द मी कोठिही ऐकला नाही)

कलिन्दर या प्राण्या बद्दल कोणाला काही माहित आहे का?

विजुभाऊ ·

In reply to by ध्रुव

लिखाळ Tue, 12/09/2008 - 15:01
बहुधा उदमांजरच असे वाटते. इंग्रजी मध्ये सिवेट कॅट असे म्हणतात. -- लिखाळ.

चतुरंग Mon, 02/25/2008 - 22:46

हा प्राणी आणि शब्द मी मिरजेत पहिल्यांदा पाहिला आणि ऐकला. हे प्राणी गूळ फार खातात असे ऐकले आहे. फार म्हणजे किती तर एका वेळेला संपूर्ण मोठी ढेपच्या ढेप फस्त करतात म्हणे! :)

चतुरंग

प्राजु Mon, 02/25/2008 - 22:56

मी तर हा शब्द आणि हा प्राणी दोन्हीही पहिल्यांदाच ऐकते आहे. आणि इतका गूळ खाणारा हा प्राणी घरात असणे म्हणजे घरमालकाला गुर्‍हाळच सुरू करावं लागेल..:)

- (सर्वव्यापी)प्राजु

विजुभाऊ Tue, 02/26/2008 - 11:06

चतुरंग तुम्ही बरोबर आहात. मी हा प्राणी सातारा भागात पाहिला

प्राजु मल वाटते मिरजेत सातार्यात गुर्हाळे भरपुर आहेत.

मैत्र Tue, 12/09/2008 - 13:59
मला वाटतं कलिंदर म्हणजे रानमांजर. मीही सातार्‍यात पाहिलं आहे आणि कलिंदर हे नावही तिथलंच. पण सातार्‍याबाहेर या नावाने कोणाला हा प्राणी माहीत नसावा. लहानपणी भीती दाखवायला सांगायचे की कलिंदर येइल :)

वेताळ Tue, 12/09/2008 - 17:50
ह्याला ईझाट हेच नाव इकडे कोल्हापुर भागात आहे.ज्यादा करुन अंधार्‍या भागात हे राहतात.खाण्याबद्दल ज्यादा माहिती नाही. वेताळ

अनंत छंदी Tue, 12/09/2008 - 20:18
हे रानमांजरच आहे त्याच्या आणखी दोनतीन जाती आहेत, एकाचा रंग फिकट खाकी असतो शेपटीवर काळे आडवे पट्टे असतात, एक नुसतेच फिकट खाकी असते आणि एक वरील चित्रात दाखविल्याप्रमाणे काळेकुट्ट असते. अजूनही कोकणात ह्या जाती आढळतात. आमच्या घराजवळ असलेल्या सुरमाडावर येणारी फळे खाण्यासाठी रात्री काळ्या रानमांजरांची एक जोडी आजही नित्यनेमाने येते.

पिवळा डांबिस गुरुवार, 12/11/2008 - 04:25
काय खबर नाय बॉ!!! आमी शाला मुंबयकर.... आमाला ते गॅसचा "सिलिंडर" मालूम हाय..... ते घराघरामदी ओटेच्याखाली दडून बसते.... कवा पायला होता के? -दांबिसअंकल

प्रिती करन्दिकर गुरुवार, 12/11/2008 - 08:08
मला हा प्राणी अगदी चा॑गलाच महीत आहे. मी मुळची साताराचीच असल्यामुळे मला हेच नाव महीत आहे. अमच्या घरी प्रच॑ड कली॑दर॑ होती वरच्या माळ्यावर , आम्ही त्याला 'कली॑दराची खोली 'च म्हणायचो. आणि अम्हाला शिक्षा म्हणजे कली॑दराच्या खोलीत को॑डणे! :( हा प्राणी नुसता गुळ नही सगळ गोड खातो. आणखीन एक गोष्ट अशी की हा प्राणी आपल्या साध्या मा॑जरा॑ना प्रच॑ड घाबरतो. त्यामुळे आम्ही नेहमी झोपताना अमच्या माऊला जवळ घेउनच झोपायचो :)

In reply to by प्रिती करन्दिकर

योगी९०० गुरुवार, 12/11/2008 - 16:04
तुमचे नाव करंदिकर ऐवजी कलींदरकर असे असायला पाहिजे होते.. आणि एक गोष्ट...माझ्या नावात पण माऊ आहे.. (हलकेच घ्या).. ;) आपलाच खादाडमाऊ

दत्ता काळे गुरुवार, 12/11/2008 - 15:20
माझा मित्र सुयोग प्रभुणे ( हा मिपा सदस्य देखील आहे ) हा वाईचा (सातारा जिल्हा ) आहे. त्याने कलींदराबद्दल सांगितलेली माहिती. एकतर कलींदर म्हणजे उदमांजर नव्हे. कलींदर हा प्राणी आस्तित्वात होता. वाईला खूप कलींदर होती. आकार साधारणपणे मांजरीएवढा, रंग काळा, ह्याला गूळ आवड्तो. विशेष म्हणजे ह्याच्या शेपटीच्या टोकाशी धोत्र्याच्या फळासारखा गुंडा असतो. लहानमुलांना भिती दाखवायला कलिंदर येइल असं सांगत असत.

मी लहान असताना आमच्याकडे घराना पोटमाळे असत. त्यात कलिन्दर नावाचे प्राणि वसति साठी असत. काळा रन्ग , लाम्ब शेपटी , लाल डोळे, माकड आणि मांजर सद्रुश हा प्राणी पोटमाळे असलेली घरे संपली तसा नहिसा झाला.

या प्राण्या बद्दल कोणास काही माहित असल्यास सांगावी