Skip to main content

गर्जा महाराष्ट्र माझा!

लेखक मनस्वी यांनी मंगळवार, 26/02/2008 या दिवशी प्रकाशित केले.

प्रत्येकालाच आपल्या मातीबद्दल अभिमान असतो. आपली मराठी माती म्हणजे आपला महाराष्ट्र!

खानदेश, विदर्भ, मराठवाडा, कोकण... पुणे, जळगाव, मुंबई, नागपूर, सोलापूर, अमरावती, कोल्हापूर, नाशिक एक ना अनेक प्रदेश, शहरे अन् खेडी!

चला तर मग गप्पा मारू आपल्या मातीच्या गप्पा.. ज्या तुम्हाला माहित आहेत.. इतरांना माहित नसतील कदाचित! छोट्या खेड्याबद्दल असेल, निसर्गसौंदर्याबद्दल असेल, तिथल्या माणसांबद्दल असेल, अनुभवांबद्दल असेल.. अगदी काहीही.. जे तुमच्या मनात त्या गावाबद्दल कायमचं घर करून बसलंय........

दिन विशेष

लेखक शेखर यांनी मंगळवार, 26/02/2008 या दिवशी प्रकाशित केले.

माननीय संपादक,

मिसळपाववर 'दिन विशेष' नावाचे सदर चालु करता येईल का?

ह्या सदरा मध्ये त्या दिवशी घडलेल्या घटना संक्षिप्त रुपात देता येतील.

 

शेखर.

 

बा. भ. बोरकर म्हणतात...

लेखक सृष्टीलावण्या यांनी मंगळवार, 26/02/2008 या दिवशी प्रकाशित केले.

देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, 
सावळे की गोमटे या मोल नाही फारसे... 

 

तुमचा ह्या गोष्टीवर थोडातरी विश्वास आहे का?

असल्यास -

गोरी बायको / नवरा हवा हा बालहट्ट सोडणार का? 

किंवा 

आपण विवाहित असल्यास इतरांना हा बालहट्ट  सोडायला प्रवृत्त 
करणार का?

माझे अभंग माझी गाथा

लेखक केशवसुमार यांनी मंगळवार, 26/02/2008 या दिवशी प्रकाशित केले.

तात्यांनी  केशवा, टेक युअर ओन टाईम पण येऊ दे एखादे फर्मास विडंबन... असा आदेश सोडला होता, पण मायदेशी परतण्याच्या गडबडीत खरोखरच टाईम जास्त गेला
आमची प्रेरणा नंदन यांची अप्रतिम कविता तिचे अभंग तिची गाथा..

एक तो 'वीकांत' | तेव्हाव्ही आकांत |
झोपाया निवांत | मिळेचिना ||

उशीरा झोपणे | उशीरा उठणे |
निवांत लोळणे | आळशी मी ||

हसावे मिशीत | थोड्याशा खुशीत |
उशी ही कुशीत | घोरताना ||

स्वगत

लेखक निनाद यांनी मंगळवार, 26/02/2008 या दिवशी प्रकाशित केले.

स्वगत

"बाबा तू येना... बाबा तू ये. मला तू हवाय""


इतकेच म्हणते ही फोनवर. दुसरे काहीच नाही!
काय करावे. मन हेलकावतय. जाण्याची इच्छा तर खूप आहे. पण कसे जमवावे...

इतके दिवस झालेत. इतके म्हणजे किती, तर ती बोबड्या बोलां नंतर चक्क व्यवस्थित बोलू लागलीय.
अरे मग त्यात काय? एका आठवड्यात होते ही प्रोसेस.
फक्त प्रोसेस? आठवड्यात होणारी एक प्रोसेस्?
किती काही आहे त्यात... वाक्य बोलण्यामध्ये सकारण स्प्ष्टीकरण पण येते. मग ते साधेसे बोल विरून जातात् नि उरतात शब्दांचे बुडबुडे.
त्यापेक्षा ते बोबडे पण खरे खुरे बोलच बरे.

पावाच्या पांचशे पंचावन्न पौष्टिक पदार्थांची पाककृती

लेखक आनंद घारे यांनी सोमवार, 25/02/2008 या दिवशी प्रकाशित केले.

मिसळपाव डॉट कॉमचा सदस्य झाल्यापासून खाद्यसंस्कृतीबद्दल मला जास्तच आस्था वाटायला लागली आहे. त्यावर निर्माण होत असलेल्या अनमोल साहित्यात आपणही अल्पशी भर घालावी असे वाटल्यामुळे हा लेख लिहिला आहे. वेळ वाचवण्यासाठी 'गागरमें सागर' म्हणतात ना तसे पांचशे पंचावन्न पदार्थ एका पोटळीत बांधून सादर करायचे ठरवले आहे.

Taxonomy upgrade extras

सूर्यास्त ३ - (उडता/ बुडता)

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 25/02/2008 या दिवशी प्रकाशित केले.

तो अजस्त्र पक्षी उंचावरची निळाई सोडुन अलगद ढगांच्या दुलईत शिरला तेव्हाच लक्षात आले की उतरायची वेळ जवळ आली. मस्तपैकी जांभई देत जरा आखडलेले अंग ताणले आणि मांडीवरचा कॅमेरा सटकता सटकता वाचला. संध्याकाळ होत आली होती. कॅमेरा हाती लागताच विचार चमकला, चला संधी मिळाली तर आज उडता सूर्यास्त टिपावा! मी कॅमेरा सज्ज करुन ढग पार व्हायची आतुरतेने वाट पाहु लागलो. मात्र आणखी थोडे खाली येताच भ्रमनिरास झाला. आज मळभ होते, आकाशात ढगांचे राज्य होते. सूर्यनारायण आज दर्शन द्यायला राजी नसावेत. अचानक काळ्या ढगांचा पडदा किंचितसा उसवला आणि झरोक्याला इंद्रधनुष्यी छटा देत सूर्यनारायण हळूच डोकावले आणि परत गायब झाले.