✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

हे शब्द कोठे गेले

व
विजुभाऊ यांनी
Mon, 02/25/2008 - 16:49  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
47094 वाचन

💬 प्रतिसाद (99)

प्रतिक्रिया

जाजम =

विजुभाऊ
गुरुवार, 02/28/2008 - 15:06 नवीन

जाजम = सतरंजी

सोवळे  म्हणजे काय माहीत आहे...पण

ओवळे म्हणजे काय?

उदा: तिने ओवळ्याने सगळा स्वयंपाक केला.

  • Log in or register to post comments

ओवळे=ओंगळ<<अमंगळ

धनंजय
गुरुवार, 02/28/2008 - 18:24 नवीन
प्रत्यक्षात अंघोळ न करता, ती स्वयंपाकाला लागली.

या शब्दात अमंगलता आणि अस्वच्छता दोन्ही ध्वनित होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

हरताळ

विजुभाऊ
गुरुवार, 02/28/2008 - 18:41 नवीन

 हरताळ :पूर्वी सावकारांच्या पेढ्यांवर जे हिशोब लिहिले जायचे त्यात कही भाग खोडुन दुरुस्त करायचा असेल तर त्या लिखाणावर पिवळी पावडर फासली जायची.त्या पिवळ्या पावडर ला हरताळ म्हणत.

आपण मात्र हरताळ फासणे...शब्द संप्/बंद या आर्थाने वापरतो..

मंडळी....हा विषय मस्त चालला आहे........झकास प्रतिसाद आहे.....सर्वांचे धन्यवाद्........छान माहिती आणि मनोरंजन होतय्.....अजुन शब्द येउद्यात....मराठी मनोरंजन कोश बनवुया.....

  • Log in or register to post comments

जाजमाप्रमाणे किंतान पण एक शब्द आहे.

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 02/28/2008 - 21:23 नवीन

हा शब्द कोणाला माहीत आहे का?

'किंतान' म्हणजे तागाच्या कापडापासून तयार करतात. त्याचाही उपयोग बसण्यासाठीच होतो. कोणाला अधिक माहीती आहे का?

पुण्याचे पेशवे

  • Log in or register to post comments

किंतान =

विजुभाऊ
Fri, 02/29/2008 - 11:32 नवीन

किंतान = गोणपाट

याला पोते असे ही म्हणतात..

जरत्कारू...... म्हणजे काय

  • Log in or register to post comments

जरत्कारू म्हणजे

मस्त कलंदर
Sat, 08/01/2009 - 02:02 नवीन
जरत्कारू म्हणजे बायको.... गजानन महाराजांच्या ग्रंथात हा शब्द वाचला होता... नि किंतान म्हणजे अनेक गोणपाटे एकत्र जोडून बनवलेले आच्छादन... शेतकरी हे मल्टीपर्पज म्हणून वापरतात.. हवे तर बसायला.. हवं तर धान्य, कडबा किंवा तत्सम वस्तू झाकायला.... मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

नव्हे..

प्रमोद देव
Mon, 08/03/2009 - 12:51 नवीन
जरत्कारू म्हणजे बायको नाही. जरत्कारू चा शब्दकोशातील अर्थ आहे....अशक्त व हडकुळा(मनुष्य) हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

नेणता / नेणीव म्हणजे काय

विजुभाऊ
Fri, 02/29/2008 - 11:36 नवीन

जाणता.......याचा अर्थ सगळे जाणतात

याच्या जोडिने येणारा शब्द म्हणजे "नेणता"

काहिवेळा " नेणिवेच्या पलिकडले " असाही शब्द प्रयोग करतात

नेणता / नेणीव  म्हणजे काय

  • Log in or register to post comments

जरत्कारू..

प्रमोद देव
Fri, 02/29/2008 - 11:38 नवीन
म्हणजे अशक्त आणि हाडकुळा मनुष्य
  • Log in or register to post comments

नेणता

फ्रॅक्चर बंड्या
Fri, 07/31/2009 - 19:39 नवीन
नेणता म्हणजे प्रौढ किंवा वयाने थोराड उदा. एवढा नेणता झाला तरी तुला काही कसे समजत नाही ( असे मला घरी सुनावतात )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

मळभ = ढग ?

विजुभाऊ
Sat, 03/01/2008 - 09:47 नवीन

मळभ = ढग ? मळभ दाटले .....

मळवट या शब्दाचा नक्की अर्थ काय?

माळणे = गजरा माळणे........याच्याशी काही संबंध आहे का?

 

  • Log in or register to post comments

मळवट

पिवळा डांबिस
Sat, 03/01/2008 - 10:10 नवीन
मळवट = माथ्यावर भरलेला भंडारा वा कुंकू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

आगार ?

मदनबाण
Sat, 03/01/2008 - 10:51 नवीन

गावो गाव जाणारी एसटी ही कुठल्या ना कुठल्या आगारा तुन येते वा जाते...

आगार या शब्दाचा नेमका अर्थ काय?

 

  • Log in or register to post comments

आगार =

विजुभाऊ
Sat, 03/01/2008 - 11:24 नवीन

आगार = कोठार

डेपो = कोठार.........

  • Log in or register to post comments

वाघिण

संजय अभ्यंकर
Sat, 03/01/2008 - 21:21 नवीन
वाघिण = मालगाडीचा डब्बा (इंग्रजी वॅगन वरुन) शिस्त = systematics (शिस्त मॅटिक चा अपभ्रंश) अपभ्रंश = चूकीचा उच्चार यच्च्यावत = सर्व (पूर्ण समूह) एकसमयावच्छेद = एकाचवेळी व्यतिरीक्त = ...च्या शिवाय (...ला सोडुन) उपरोक्त, उपरोल्लेखित, उपरनिर्दीष्ट = वर लिहिलेले, आधी सांगितलेले पेला = पाण्याचे भांडे लोटी = पाण्याचे पात्र घंगाळ = पाणिसाठवण्याचे मोठे भांडे (पात्र) माठ = पाणी साठवण्याचे मातीचे पात्र. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

शिस्त.

लिखाळ
Sat, 03/01/2008 - 21:58 नवीन
शिस्त = systematics (शिस्त मॅटिक चा अपभ्रंश) अरेच्या ! असे आहे होय हे. कमालच आहे. मला वाटले होते की शास्ता = शासन करणारा अश्या कोणत्यातरी शब्दातून शिस्त, शिस्तप्रिय हे शब्द आले असतील. शिस्त हा शब्द इंग्रज येण्या आधी नव्हताच का म्हणजे? कृपया अधिक प्रकाश टाकावा ही विनंती. --लिखाळ. 'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय अभ्यंकर

रांजण =

फ्रॅक्चर बंड्या
Fri, 07/31/2009 - 19:44 नवीन
रांजण = पाणी साठवण्याचे मातीचे मोठे पात्र
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय अभ्यंकर

माझा अंदाज

भडकमकर मास्तर
Sun, 03/02/2008 - 03:20 नवीन
माझा अंदाज ---------- जाणीव = कॉन्शस नेणीव = सबकॉन्शस
  • Log in or register to post comments

शहरी भाषेत...

मगो
Sun, 03/02/2008 - 04:20 नवीन
माजघर, ओटी, पडवी, दिवाणखाना हेही शब्द प्रचलित नाहित. बहुदा घराच्या मुख्य दरवाजान॑तरची जागा पडवी , न॑तर ओटी- जीथे आसनव्यवस्था असते, माजघर म्हणजे सध्याचा hall आणि दिवाणखाना म्हणजे 'बेडरूम'... पूर्वि बाहेरील लोका॑चा वावर जास्तीतजास्त ओटी पर्यन्त असायचा. शिवाय तुळई-भाल॑(घराचे आधारस्त॑भ), तसराळ॑ (कडईसारख॑ पसरट॑ मोठ॑ भा॑ड॑), कु॑चा (झाडु), सारवण (शेण), फाटी (लाकडाचे उभे तुकडे), पायताण(चपला), पायजमा (ले॑गा), मोची (चा॑भार), गवळी (दूधवाला), कडी-कोय॑डा (दाराची कडी, कुलुप), खापर॑ (नळीची कौल॑, मडक्याचा तुकडा), चोपडी (हिशोबाची वही), बोळ॑ (गल्ली), दुचाकि (सायकल), घ॑गाळ॑ (आ॑घोळीच॑ भा॑ड॑), चेन्डुफळी (क्रिकेट), फलक॑ (बोर्ड ), फाटक॑ (दार, गेट)शिकवणि (क्लास), स॑दूक (पेटारा), दौत्(शाई), खु॑टी (काही अडकवण्यासाठी लाकडी हूक),चिमणी (लहान दिवा) ......ई. ई. ई आठवत॑ बसलो तर॑ खुप आठ्वतील असे शब्द॑.... ...पण॑ आठवताना माझ॑ मन॑ मात्र नकळत॑ माझ्या गावात एक फेर॑फटका मारुन॑ आल॑... असो, खुप मजा येतेय॑ ... - मोकळ्या मनाचा मगो (महेश गोविलकर)
  • Log in or register to post comments

कोयंडा म्हणजे कुलूप नाही.

चतुरंग
Sun, 03/02/2008 - 12:02 नवीन
कडी-कोयंडा मधली कडी म्हणजे एकमेकात अडकवलेल्या सर्वसाधारणपणे तीन लांबट दुव्यांची असे. आणि कोयंडा म्हणजे आजच्या भाषेत 'बोल्ट' जो आडवा सरकवून दरवाजा लावला जातो आणि त्यामधून नंतर कुलूप लावतात. ओघातच आठवलेला आणखी एक शब्द म्हणजे 'आडसर' - पूर्वी वाड्यांमधे अनेक बिर्‍हाडे असत. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी वाडयाला एकच मुख्य मोठे दार असे ते रात्रीच्या वेळी बंद केले जाई आणि त्याला आतून एक मोठा जाडच्या-जाड लाकडाचा ओंडका सरकवून लावला जाई त्याला म्हणत. तो दाराच्या पाठीमागेच भिंतीत सरकवून बसवण्याची सोय असे. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मगो

तसराळ॑

विजुभाऊ
Mon, 03/03/2008 - 13:26 नवीन
तसराळ॑ नाही...तरसाळे..... मराठीत काही शब्द जोडिजोडीनेआले कि त्यान्चे अर्थ बदलतात. दळण म्हणजे काहीत आहे वळण म्हणजे काहीत आहे दळणवळण याचा अर्थ मात्र संदेशवहन /प्रवास (वाहून नेणे)असा होतो... हे असे का?
  • Log in or register to post comments

तसराळं!

प्रमोद देव
Mon, 03/03/2008 - 13:49 नवीन
हा शब्द बरोबर आहे. तसराळे असेही म्हणू शकतो. दळण: दळण्याची क्रिया ; जे दळायचे ते धान्य वळण: वाकडे होणे,वळणे(रस्त्याचे वळण); विशिष्ट पद्धतीने आकार देणे अथवा सवयी लावणे( मुलाला अथवा मुलीला चांगले वळण लावणे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

शिस्त =

विजुभाऊ
Mon, 03/03/2008 - 13:29 नवीन
शिस्त = systematics (शिस्त मॅटिक चा अपभ्रंश) हे चूक आहे. शिस्त हा शब्द शास्ता = शासन करणारा ("कंट्रोल "या अर्थाने)आणि त्याला शासन करण्यसाठी आवश्यक घटक
  • Log in or register to post comments

दीपुष्टण

सृष्टीलावण्या
Mon, 03/03/2008 - 16:36 नवीन
पूर्वी तेलाचा अथवा तुपाचा दिवा विझला की एक उग्र जळकट वास नाकात शिरायचा तेव्हा माझी आजी म्हणायची दीपुष्टणाचा वास सुटलाय... दीप+उष्टावण असा मूळ शब्द असावा बहुदा... > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।
  • Log in or register to post comments

दळणवळण

विजुभाऊ
Tue, 03/04/2008 - 12:21 नवीन
दळणवळण याचा अर्थ मात्र संदेशवहन /प्रवास (वाहून नेणे)असा होतो... हे असे का?
  • Log in or register to post comments

वदतोव्याघात

विजुभाऊ
गुरुवार, 03/06/2008 - 13:00 नवीन
वदतोव्याघात म्हणजे काय
  • Log in or register to post comments

वदतोव्याघात...

प्रमोद देव
गुरुवार, 03/06/2008 - 15:08 नवीन
म्हणजे.. प्रतिपादनातील स्पष्ट विसंगती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

वदतोव्याघात...

विजुभाऊ
गुरुवार, 03/06/2008 - 16:50 नवीन
वदतोव्याघात... मला वाटत होते की वदतोव्याघात म्हणजे बोलायला आणि ती गोष्ट व्ह्यायला एकच गाठ ( कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक गाठ)
  • Log in or register to post comments

पारणे म्हणजे काय?

विजुभाऊ
Sat, 03/08/2008 - 11:01 नवीन
पारणे म्हणजे काय? डोळ्याचे पारणे फिटणे........म्हणजे नेत्रसूख अनुभवणे ( फर्गुसन रोड वर अनुभवास होते तसे नव्हे) पारणे म्हणजे काय? पारणे फिटते म्हणजे काय होते?(पारणे हे नेसूचे वस्त्र आहे असे एक खौट पुणेकर म्हणतो....तो चूक असावा)
  • Log in or register to post comments

ह. ह. पु. वा.

llपुण्याचे पेशवेll
Sat, 03/08/2008 - 21:24 नवीन
(पारणे हे नेसूचे वस्त्र आहे असे एक खौट पुणेकर म्हणतो....तो चूक असाव) सहीच मस्त. हे पारणे सुधा फिटले तर डोळ्याचे पारणे फिटत असेल. ;) च्यामारी फार झाला वात्रटपणा. (ह.घ्या.) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

पारणे!

प्रमोद देव
Sun, 03/09/2008 - 09:22 नवीन
पारणे: १.उपास सोडणे. २ समाधान पारणे फिटणे(क्रि.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

एकादशीचा उपास दुसर्‍या दिवशी सोडतात

चतुरंग
Sun, 03/09/2008 - 00:08 नवीन
त्याला पारणे फेडणे असे म्हणतात. त्यावरुन अर्थ ध्यानात यावा. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

हडपा आणि संदूक

llपुण्याचे पेशवेll
Sat, 03/08/2008 - 21:29 नवीन
संदूक = छोटी पेटी ज्यात मौल्यवान वस्तू वगैरे ठेवतात. उदा. दागिने, ठेवणीतले उंची कपडे, अत्तरे इ. हडपा = मोठा पेटारा ज्यात साठवणूकीच्या वस्तू किंवा मोठ्या कार्यक्रमाच्या दिवशी लागणार्‍या वस्तू ठेवतात. देवाची पालखी, मोठी पातेली, तपेल्या, गणपतीचे चौरंग, मखर इ. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

छप्पन टिकल्यांची

विजुभाऊ
Tue, 03/18/2008 - 12:08 नवीन
छप्पन टिकल्यांची किंवा छप्पन छूरी म्हणजे नक्कि काय?
  • Log in or register to post comments

१. म्हणजे छप्पन्न ........

सुधीर कांदळकर
Fri, 03/21/2008 - 18:33 नवीन
नवरे असलेली स्त्री म्हणजे चवचाल स्त्री. परंतु छप्पन्न टिकल्यांची आवा असे म्हणतात. आवा म्हणजे कजाग स्त्री. २. पारणे फेडणे म्हणजे उपकाराच्या ओझ्यातून मुक्त होणे. पूर्वजांच्या/देवाच्या उपकाराच्या ओझ्यातून मुक्त होण्यासाठी कठोर व्रत करतात. त्या व्रताची सांगता पूजाअर्चा करून नंतर अन्नभक्षण करून करतात. यालाच पारणे फेडणे असे म्हणतात. यावेळी पौरोहित्य करणारे भटजी व मेहुण म्हणून दांपत्य बोलावण्याची व या दांपत्याचा भेटवस्तु देऊन आदरसत्कार करण्याची रीत आहे. ज्ञानसंपन्न पुरूष व त्याची पत्नी किंवा गरीब दांपत्य बोलावितात. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments

पायताण =

आंबोळी
Sat, 03/22/2008 - 15:58 नवीन
पायताण = पादत्राण = चपला बारदाण = गोणपाट = पोते लुगड = साडी = पातळ (नेसायचे) फोक = लवचीक काठी (हा साधारण चिन्चेचा आसतो, २-३ पिढ्यामागे शिक्शा करण्यसाठी घरी वडिल व शाळेत गुरुजी याचा वापर करीत असत) परस = घराची मागची बाजू इतिहासजमा झाल्यने परसाकडला जायची सोय राहिली नाही. तम्बाखू पुडीतून मिळायला लागल्यापासून चन्ची सुध्धा इतिहास जमा होत आहे.
  • Log in or register to post comments

विसण =

ईश्वरी
Sun, 05/18/2008 - 02:46 नवीन
विसण = आंघोळीसाठी तापवलेल्या अति गरम पाण्यात गार पाणी घालून ते भाजणार नाही इतपत ठेवतात. त्या गार पाण्याला विसण म्हणतात. ताटली = जेवणाच्या ताटापेक्षा थोडी लहान सांडशी = चिमटा.. गरम भांडे धरण्यासाठी वापरतात कुंचला = चित्रकाराचा रंगवायचा ब्रश हाळी = हाक मारणे / आवाज देणे रांजण = आकाराने मोठा असलेला पाण्याचा माठ गंठण = मंगळसूत्र (बहुतेक ) वरवंटा = ओला मसाला वाटण्याचे साधन पारोसा = आंघो़ळ न करता ..(आज पारोशानेच बाहेर जावे लागले) टपाल = पत्र दिवेलागणी = संध्याकाळची वेळ ..देवासमोर दिवा लावण्याची आमोशा पोटी = काहीही न खाता , उपाशी आवंढा = ? तोबरा भरणे = तोंडात मोठा घास घेणे वामकुक्षी = दुपारची झोप, दुपारचे जेवण झाल्यानंतर काढलेली डुलकी ईश्वरी
  • Log in or register to post comments

विसण =

llपुण्याचे पेशवेll
Fri, 07/31/2009 - 18:19 नवीन
विसण = आंघोळीसाठी तापवलेल्या अति गरम पाण्यात गार पाणी घालून ते भाजणार नाही इतपत ठेवतात. त्या गार पाण्याला विसण म्हणतात. त्याला आमची आजी विसावण म्हणते. वाईनः (प्यायची नव्हे) मुसळाचा वापर करून कुटण्यासाठीचे दंडगोलाकृती दगडी भोक. वायनाचे तोंड शक्यतो जमिनीच्या समपातळीत असते आणि उर्वरीत भाग जमिनीखाली. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ईश्वरी

आमोशा पोटी ?

सातारकर
Mon, 08/03/2009 - 12:40 नवीन
हे आमोशा पोटी अस आहे का अनुशा पोटी असं आहे ? ----------------------------------------------------------------------------------------- I have seen GOD. He bats at no. 4 for India Matthew Hayden
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ईश्वरी

अलगूज =

विजुभाऊ
Fri, 07/31/2009 - 16:28 नवीन
अलगूज = पावा = बासरी भडीमार करणे हा शब्द कशावरून आला असावा? आम्बोण याचा नक्की अर्थ काय? विदर्भात एखाद्या मतीमंदाला भैताड असे म्हणतात. भैताड हा शब्द कशावरुन आला? हारा = टोपली पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
  • Log in or register to post comments

>>पास हा

पक्या
Sun, 08/02/2009 - 13:11 नवीन
>>पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे मिंग्लीश किंवा इंग्राठी :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

कशिदा =

ललिता
Fri, 07/31/2009 - 17:40 नवीन
कशिदा = भरतकाम = embroidery उदा.: आशाताईंचं भावगीत.... घालू कशी "कशिदा" मी होती किती सांगू चुका बोचे सुई फिरफिरुनी येथ उभे राहू नका डोळे हे जुलमी गडे......
  • Log in or register to post comments

बोचे सुई

रम्या
Mon, 08/03/2009 - 14:46 नवीन
बोचे सुई फिरफिरुनी वाचून हसू आलं. :D ठळक शब्द अनेकवचन असल्या सारखं वाटतंय!!! आम्ही येथे पडीक असतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ललिता

उठवळ, भटकभवानी, कजाग, लतकोडगा इ. ह्याची व्युत्पत्ती काय ?

दत्ता काळे
Fri, 07/31/2009 - 20:07 नवीन
१.कह्यात वागणे ( एखाद्याच्या अंमलाखाली राहणे ) २. कुपाटी काढणे - ( निष्कारण खोडी काढणे ) ३. लांगालुंगा गोळा करणे - (शेतातल्या तोडणीनंतर राहिलेल्या उरल्यासुरल्या पिकांची वाढे, चारा, वाळलेले शेण इ. आणि जे विकून पैसे मिळतील अश्या गोष्टी गोळा करणे. ) ४.निपुर - (एखादा निकाल विरुध्द जाणे किंवा माघार घ्यावी लागणे ) ५. बेबुदी - (पोटापाण्यापुरती किंवा तात्पुरती सोय करणे ) ( एखाद्या शेतकर्‍याला काळी म्हणजे जमीनअजिबात नसली किंवा त्याच्या खटल्याला निपुर आली तर गांवकरी दुसर्‍याच्या शेतातून त्याला जमीन मिळवून देत आणि त्याची व त्याच्या मुलाबाळांची बेबुदी करीत. ६. वाटखर्ची नसणे - (भटकंती करणार्‍याकडे पैसा नसणे).
  • Log in or register to post comments

नवरा

अजिंक्य पोतदार
Sat, 08/01/2009 - 02:44 नवीन
नवरा = धनी अरे अरे फरच लांब गेलो !! जाउ द्या !! नवरा = अहो हा शब्द पण एइकायला मिळत नाही
  • Log in or register to post comments

ह्या शब्दांचे / शब्दसमुहांचे अर्थ माहित आहेत काय?

तर्री
Sun, 08/02/2009 - 14:30 नवीन
१. बेगमी करणे २.आगोट ३. सराई (लग्न सराई ) ४. घरट ५.समारत्न ६.लळित
  • Log in or register to post comments

बेगमी...

प्रमोद देव
Mon, 08/03/2009 - 13:30 नवीन
१. बेगमी=तरतूद,पुरवठा,साठा २. आगोट(ठ)=पावसाळ्याची सुरुवात किंवा सुरुवातीचा काळ ३. सराई=धर्मशाळा,विश्रांतीस्थान ४. घ(घि)रट=भात भरडण्यासाठी वापरावयाचे मोठे जाते. ५. लळित=देवाच्या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी सोंगे आणून सादर केलेला कार्यक्रम. वरील सर्व शब्दार्थ ’राजहंस व्यावहारिक शब्दार्थ कोशा’तून साभार. लग्न सराई=लग्नाचा हंगाम समारत्न= समापन,समाराधना=व्रताची/उत्सवाची सांगता हे दोन शब्दार्थ माझ्या समजूतीप्रमाणे दिलेत. चुभूदेघे. हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री

सपक

श्रीयुत संतोष जोशी
Sun, 08/02/2009 - 21:18 नवीन
सपक : मिळमिळीत , अतिशय नीरस. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments

प्रकाटाआ

चित्तरंजन भट
Fri, 08/21/2009 - 20:48 नवीन
प्रकाटाआ
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा